नांदेड| जिल्हा परिषदेच्या वतीने माळेगाव यात्रेत विविध कार्यक्रम घेतले जात असून, आज मोफत महिला आरोग्य तपासणी व पारंपारिक लोककला महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
महिलांनी निरोगी आरोग्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. परंतू विविध कामाच्या व्यापामुळे त्या स्वत:कडे दुर्लक्ष करतात. त्यांच्या आरोग्याच्या काळजीसाठी आज माळेगावा यात्रेत मोफत महिला आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.
आज शुक्रवार दिनांक 3 जानेवारी रोजी सकळी 11 वाजता माळेगाव येथील आयुर्वेदीक रुग्णालयात हे शिबीर होणार आहे. भोकर विधानसभा मतदार संघाच्या आमदार श्रीजया चव्हाण यांच्या हस्ते या शिबीराचे उद्रघाटन करण्यात येणार आहे. यावेळी महिला बाल विकास विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत थोरात व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. या शिबीरात मधुमेह तपासणी, उच्च रक्तदाब, -हदय विकार, पोटाचे विकार, स्तनाचे गाठीचे निदान, फुफूसाचे विकार, रक्त तपासणी, मुखरोग विकार, एचआयव्ही तपासणी, सिकलसेल, क्षयरोग आदींची मोफत तपासणी करण्यात येणार आहे.
यावेळी स्त्रीरोग तज्ञ डॉ. जी.आर. चव्हाण, डॉ. उमाकांत राठोड, डॉ. देबनाथ रिचा, डॉ. एल.एस. पेंडकर, डॉ. ज्ञानेश्वर केंद्रे आदी तज्ञ डॉक्टर तपासणी करणार आहेत. आरोग्य विभाग जिल्हा परिषद नांदेड व प्राथमिक आरोग्य केंद्र माळाकोळी यांच्या संयुक्त विद्यमाने या आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. तरी महिला यात्रेकरु व भाविकांनी या आरोग्य शिबीराचा लाभ घ्यावा असे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
पारंपारिक लोककला महोत्सव
महाराष्ट्राच्या लोककलेचे जतन करण्यासाठी तसेच लोक कलावंतांना प्रोत्साहन देण्यासाठी नांदेड जिल्हा परिषदच्या वतीने दरवर्षी माळेगाव यात्रेत पारंपरिक लोककला महोत्सव घेण्यात येतो. आज शुक्रवार दिनांक 3 जानेवारी रोजी पारंपारिक लोककला महोत्सव आयोजन करण्यात आले आहे.
आज 3 जानेवारी रोजी दुपारी 3 वाजता पारंपारिक लोककला महोत्सव होणार आहे. नांदेड दक्षिण विधानसभा मतदार संघाचे आमदार आनंदराव बोंढारकर यांच्या हस्ते पारंपारिक लोककला महोत्सवाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या अध्यक्षतेखाली होणा-या कार्यक्रमात प्रमुख उपस्थितांमध्ये आमदार डॉ. तुषार राठोड, आमदार बाबुराव कदम कोहळीकर व आमदार राजेश पवार उपस्थिती राहणार आहे.
पाच लोकनाट्य मंडळ दाखल
या पारंपारिक लोककला महोत्सवात माळेगाव योत्रेत येणा-या सर्व कलाकरांना संधी दिली जाणार आहे. तसेच यात्रेत दाखल झालेले रघुवीर खेडकर नाट्य मंडळ सातारा, पांडुरंग मुळे नाट्य मंडळ, आनंद लोकनाट्य मंडळ, शिवकन्या बडे नाट्य मंडळ , सविता पुणेकर नाट्य मंडळाचे बहारदार सादरीकरण होणार आहे.
माळेगाव येथे मिडिया सेंटरचे उद्घाटन
श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा येथे माध्यमांना माहिती देण्यासाठी जिल्हा परिषदेच्या वतीने मिडीया सेंटरची स्थापना करण्यात आली असून गुरुवार दिनांक 2 जोनवारी रोजी माळेगाव ग्राम पंचायतीमध्ये मिडीया सेंटरचे उदघाटन उपसरपंच बालाजी नंदाने यांच्याहस्ते करण्यात आले.
यावेळी मिडीया सेंटरचे प्रमुख मिलिंद व्यवहारे, शिवाजी टोम्पे, डॉ. नंदलाल लोकडे, दत्ता इंदूरकर, लक्ष्मीकांत टाकळकर, विस्तार अधिकारी संभाजी धुळगंडे, पत्रकार प्रेमानंद कांबळे, कीर्तीमाला महाबळे, बाळासाहेब मुद्दे, संतुक मुकनर, ग्राम विकास अधिकारी बी.सी. देवकांबळे, हनमंत धुळगंडे, साहेबराव राठोड, पांडूरंग घोरपडे, टी.एस. घोगरे, देवकत्ते डी.जी., एन.ए. मंदे खंडू साखरे, लक्ष्मण रायबोले, बंडू वाघमारे, अम्रपाली मिलिंद वाघमारे, यांची उपस्थिती होती.
माळेगाव ग्राम पंचायतीमधे मिडीया सेंटरची स्थापना करण्यात आली आहे. माळेगाव यात्रेत जिल्हा परिषदेच्या वतीने चालणा-या विविध उपक्रम व कार्यक्रमाची माहिती खाते प्रमुखांनी मिडीया सेंटरला द्यावी. जणेकरुन माध्यमांना वेळेत माहिती देता येईल असे आवाहन प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे यांनी केले आहे.