नांदेड| पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्या आदेशाचे पालन करत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने चौघांकडून चार अग्नीशस्त्र (पिस्टल) व तिन जिवंत काडतूस असा एकुण 103000/- रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कार्यवाहीची
याबाबत सविस्तर वृत्त असे कि, अविनाश कुमार, पोलीस अधीक्षक, नांदेड यांनी नांदेड शहरात तसेच जिल्ह्यामध्ये शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अवैध धंद्यावर कार्यवाही करुन तसेच रेकॉर्ड वरील आरोपीतांना चेक करुन कायदेशिर कार्यवाही करण्याचे तसेच विनापरवाना बेकायदेशिर रित्या अग्नीशस्त व शस्त्र ताब्यात बाळगणाऱ्या इसमाविरुद्ध कायदेशिर कार्यवाही करण्याचे आदेश अधिनस्त सर्व अधिकारी व अंमलदार यांना दिले होते. त्या अनुषंगाने दिनांक 09.01.2025 रोजी पोलीस उपनिरीक्षक श्री मिलींद सोनकांबळे व त्यांची टिम विनापरवाना बेकायदेशिर रित्या अग्रीशस्त व शस्त्र ताब्यात बाळगणाऱ्या इसमाविरुद्ध कायदेशिर कार्यवाही करीत असतांना गोपनिय माहिती मिळाली.
यावरून त्यांनी आरोपी आलम गबरु शेख वय 20 वर्षे व्यावसाय बेकार रा. धानोरा ता. लोहा जि. नांदेड हा अग्नीशस्त्र (पिस्टल) ताब्यात बाळगुन विक्री करीत आहे. त्यावरुन आरोपी नामे, विजय प्रकाश बोईनवाड वय 21 वर्षे व्यावसाय बेकार रा. सरस्वती नगर जवळ, धार्माबाद, सूरज शेषेराव वंजारे वय 21 वर्षे व्यावसाय बेकार रा. पिंपळकौठा (मगरे) ता. मुदखेड जि. नांदेड, या दोघांना मामा चौक, नांदेड येथून मुद्देमालासह ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच आरोपी आलम गबरु शेख वय 20 वर्षे व्यावसाय बेकार रा. धानोरा ता. लोहा जि. नांदेड, विजय भास्कर कंधारे वय 23 वर्षे व्यावसाय कार रा. समगा ता.जि. हिंगोली यांना लोहा जि. नांदेड येथून ताब्यात घेतले.
या चौघांच्या ताब्यातून चार अग्नीशस्त्र (पिस्टल) व तिन जिवंत काडतूस असा एकुण 103000/- रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्या सबंधाने पोलीस स्टेशन नांदेड ग्रामीण, नांदेड व पोलीस स्टेशन लोहा जि. नांदेड येथे मिलींद मधुकर सोनकांबळे वय 36 वर्षे व्यावसाय नोकरी पोलीस उपनिरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हे दाखल करण्यात आला आहे. सदर कार्यवाही मध्ये सहभागी असलेले अधिकारी व अंमलदार यांना बक्षिस जाहिर करुन चांगल्या कार्यवाहीचे कौतुक केले आहे.
हि कार्यवाही अबिनाश कुमार, पोलीस अधीक्षक, नांदेड. खंडेराव धरणे, अपर पोलीस अधीक्षक, भोकर मा. श्री. सुरज गुरव, अपर पोलीस अधीक्षक, नांदेड यांचे मार्गदर्शनाखाली उदय खंडेराय, पोलीस निरीक्षक, नेमणुक स्थानिक गुन्हे शाखा, नांदेड, मिलींद सोनकांबळे पोलीस उपनिरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा, नांदेड. रविशंकर बामने, अफजल पठाण, मिलींद नरबाग, चंद्रकांत स्वामी, राहुल लाठकर, तिरुपती तेलंग, सिद्धार्थ सोनसळे, राजेंद्र सिटीकर, दिपक ओढणे यांनी केली आहे.