एक गावठी पिस्टल (अग्नीशस्त्र) व 02 रिकाम्या मॅग्झीनसह एका आरोपीस अटक स्थानिक गुन्हे शाखा, नांदेडची कामगिरी -NNL

नांदेड। शहरासह जिल्ह्यात घडत असलेल्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी देण्यात आलेल्या सूचनांची अंमलबजावणी करत पोलिसांनी एक गावठी पिस्टल (अग्नीशस्त्र) व 02 रिकाम्या मॅग्झीनसह एका आरोपीस अटक केली आहे. ही कार्यवाही स्थानिक गुन्हे शाखा, नांदेडच्या पथकाने केली असून, या कामगिरी बद्दल सर्व स्तरातील नागरिकांतून अभिनंदन केले जाते आहे.

नांदेड शहरात घडत असलेल्या गुन्हयांना आळा बसणेकामी व अग्नीशस्त्र वापरुन गुन्हे करणारे व अवैध अग्नीशस्त्र बाळगणारे गुन्हेगारांवर कायदेशीर कार्यवाही करण्याबाबत पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी पोलीस निरीक्षक, उदय खंडेराय यांना आदेशीत केले होते. त्यानुसार पोलीस निरीक्षक, स्थागुशा, नांदेड यांनी शहरात अवैध अग्नीशस्त्र बाळगणारे आरोपीविरुध्द कायदेशीर कार्यवाही करण्याबाबत स्था.गु.शा. चे पथकाला आदेश दिले होते.

दिनांक 10/06/2024 रोजी गुप्त बातमीदाराकडून कापुस संशोधन केंद्रा समोरील केळी मार्केट टी पॉईंटकडे जाणाऱ्या रोडवर एक इसम गावठी पिस्टल बाळगुन असून तो विक्री करण्यासाठी येणार असल्याची खात्रीशिर माहिती मिळाल्याने सदरची माहिती वरिष्ठांना देवून वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली सपोनि संतोष शेकडे व पोलीस अंमलदार असे कापुस संशोधन केंद्रा समोरील केळी मार्केट टी पॉइंटकडे जाणाऱ्या रोडवर गेले असता सदर ठिकाणी सापळा लावून इसम नामे राधेशाम पंजाबराव भालेराव, वय 24 वर्ष, व्यवसाय मजूरी, रा. सखोजीनगर, नांदेड यास ताब्यात घेवून त्याचेकडून बेकायदेशीरीत्या विक्रीसाठी आणलेली एक गावठी पिस्टल (अग्नीशस्त्र) व 02 रिकाम्या मॅग्झीन असा एकूण 41,000/-रुपये किमंतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे.

सदरची कामगिरी श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधीक्षक, नांदेड,  अबिनाश कुमार, अपर पोलीस अधीक्षक, नांदेड, खंडेराव धरणे, अपर पोलीस अधीक्षक, भोकर यांचे मार्गदर्शनाखाली उदय खंडेराय, पोलीस निरीक्षक, स्था.गु.शा, नांदेड, सपोनि संतोष शेकडे, पोउपनि हरजिंदरसिंघ चावल, पोहेकॉ/ रुपेश दासरवार, पोहेकॉ बालाजी तेलंग, पोकॉ/साहेबराव कदम, पोकॉ/तानाजी येळगे, पोकों/अनिल बिरादार, पोकॉ/मोतीराम पवार, पोकॉ/राजीव बोधगिरे, पोकॉ/अकबर पठाण, पोकॉ/इसराइल शेख, पोकों/गजानन बयनवाड यांनी पार पाडली आहे. सदर पथकाचे मा. पोलीस अधीक्षक यांनी कौतुक केले आहे.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button