नांदेडकरियर

Global Excellence’ award ; माजी विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. विठ्ठलराव जाधव व शांतिदूत परिवारच्या अध्यक्षा विद्याताई जाधव यांना ‘ग्लोबल एक्सलन्स’ पुरस्कार प्रदान

नांदेड l महाराष्ट्र राज्याचे माजी विशेष पोलिस महानिरीक्षक तथा नांदेड जिल्ह्याचे तत्कालीन जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. विठ्ठलराव जाधव व शांतिदूत परिवारच्या संस्थापक अध्यक्षा सौ.विद्याताई जाधव या दाम्पत्याचा ‘ग्लोबल एक्सलन्स’ पुरस्काराने नुकताच सन्मान करण्यात आला.

पणजी (गोवा) येथील फर्न कदंबा येथे पार पडलेल्या कार्यक्रमादरम्यान जाधव दाम्पत्याचा शाल, सन्मानचिन्ह, गौरवपत्र, पदक व वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड इंग्लंड या संस्थेची स्मरणिका देऊन गौरव करण्यात आला.

अभिनेते करण मेहरा, संस्थेचे अध्यक्ष मनीषकुमार, उपाध्यक्ष डॉ. दीपक हारके यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करत सत्कार करण्यात आला. या वेळी अभिनेत्री हिमानी शिवपुरी, अभिनेते सचिन पारीख, हितेश भारद्वाज, निखिलेश राठोड, अक्षदा मुदगल, रूपाली शर्मा, सुशील पराशर, हनीफ, अस्लम, पत्रकार अमित त्यागी व देशाच्या विविध भागातील पुरस्कारार्थी व शांतीदूत परिवार पुणे अध्यक्षा रोहिनी कोळेकर, मधू चौधरी, शीतल चौधरी आदी उपस्थित होते.

शांतिदूत परिवार चे नांदेड जिल्हा अध्यक्ष तथा वरिष्ठ पत्रकार श्री पंढरीनाथ बोकारे, नानक साई फाऊंडेशन च्या जनरल सेक्रेटरी सौ प्रफुल्ला बोकारे पाटील, पदाधिकारी, सदस्य, हितचिंतक, अधिकारी व मित्र परिवारासह अनेकांनी जाधव दाम्पत्य व शांतिदूत परिवाराचे अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!