नांदेड

नांदेडात मराठा आरक्षण जनजागृती व शांतता रॅली… ८ जुलै रोजी जरांगे पाटील यांच्या उपस्थितीत पार पडणार -NNL

लाखोंच्या संख्येने समाज बांधव माता भगिनींनी उपस्थित राहावे; तयारी अंतिम टप्प्यात

नांदेड। सगे सोयरे कायदा अंमलात आणुन मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातुन आरक्षण मिळावे , महाराष्ट्रातील आत्तापर्यंत झालेल्या मराठा आंदोलकावरील गुन्हे मागे घ्यावेत या मागण्यासाठी मराठा योद्धा मनोज जरंगे पाटील यांच्या नेतृत्वात दिनांक आठ जुलै रोजी नांदेड शहरामधे सकाळी ११.०० राज काॅर्नर तरोडेकर चौक-राजमाता जिजाऊ चौक-श्रीनगर-महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले पुतळा आय.टी.आय.चौक-शिवाजीनगर-एस.पी.ऑफीस चौक ते छत्रपती शिवाजी महाराज स्मारक परिसर या मार्गाने भव्य शांतता रॅली निघणार आहे व मनोज जरांगे पाटील हे समाज बांधवास छत्रपती शिवाजी महाराज स्मारक परिसरातुन संवाद साधणार आहेत.सदरील रॅलीचे नेतृत्व मराठा युद्ध मनोज जरांगे पाटील हे करणार आहेत.

मागील पंधरा दिवसापासुन सदरील रॅलीच्या नियोजनासाठी अखंड मराठा समाज नांदेड जिल्हा व जिल्हा नियोजन समिती यांच्याकडुन रॅलीची जय्यत तयारी करण्यात येत आहे. २०जुन २०२४ रोजी अखंड मराठा समाज नांदेड जिल्ह्याची एक सामुहिक बैठक पार पडली सदरील बैठकीत अनेक ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आले जसे की जिल्हा बैठक,तालुका बैठक, गावागावातील बैठक घेऊन जनजागृती करण्याचं काम समाज बांधवांनी हाती घेतले, तसेच रॅलीच्या नियोजनासाठी लागणारे सर्व साधणांची जबाबदारी सुद्धा वाटुन देण्यात आली अखंड मराठा समाज नांदेड च्या सर्व कार्यकर्त्यांनी व समाजातील सर्व प्रतिष्ठित व्यक्तींनी आपापली जबाबदारी पार पाडण्यासाठी मागील पंधरा दिवसापासून अथक परिश्रम घेतले आहे.

IMG 20240706 133733 नांदेडात मराठा आरक्षण जनजागृती व शांतता रॅली... ८ जुलै रोजी जरांगे पाटील यांच्या उपस्थितीत पार पडणार -NNL

आज पत्रकार परिषदेच्या माध्यमातून अखंड मराठा समाज नांदेड जिल्ह्याला तसेच सर्व प्रशासकीय यंत्रणेला जाहीर आवाहन करण्यात येत आहे की, आठ जुलै च्या रॅली संदर्भात ज्या काही सोई सुविधा लागतील त्या सर्व उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाला विनंती करण्यात येत आहे. जिल्हाभरातील सर्व तालुक्यातील, गावागावातील समाज बांधवांना आग्रहाची विनंती करण्यात येत आहे की, मराठा समाजाला ओबिसीतुन कायम टिकणारे आरक्षण मिळण्यासाठी आपण लाखोच्या संख्येने रॅलीमध्ये सहभागी व्हायचं आहे.गाव खेड्यातुन तालुक्यातुन येणाऱ्या सर्व समाज बांधवांसाठी योग्य त्या सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत.

नवा मोंढा मैदान, शासकीय तंत्र निकेतन, कॅनॉल रोड , नागार्जुन पब्लिक स्कुल या ठिकाणी पार्किंग ची व्यवस्था करण्यात आली आहे जेवणाची व्यवस्था,पाण्याची व्यवस्था, तसेच रॅली निघणाऱ्या मार्गात जागोजागी खिचडी वाटप रॅलीच्या समारोपाच्या ठिकाणी योग्य अशी साऊंड सिस्टिम ची व्यवस्था, जरांगे पाटील यांच्या ताफ्यामध्ये आंतरवाली सराटी पासुन येणाऱ्या पाहुण्यांची मुक्कामाची व जेवणाची व्यवस्था, मुक्कामाच्या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था, रॅली मार्गात जागोजागी सत्कार समारंभ असे सर्व नियोजन जिल्हा नियोजन समितीच्या मार्फत करण्यात आले आहे.

IMG 20240706 WA0029 नांदेडात मराठा आरक्षण जनजागृती व शांतता रॅली... ८ जुलै रोजी जरांगे पाटील यांच्या उपस्थितीत पार पडणार -NNL

प्रशिक्षित मराठा स्वयंसेवकांची एक मोठी फळी सुद्धा तयार करण्यात आली आहे मराठा सेवकांना लागणारी साधन सामग्री जसे की, टी-शर्ट, गळ्यामध्ये आयडी कार्ड आणि संपुर्ण रॅलीला कव्हर करण्यासाठी शंभर वाकी टॉकीची व्यवस्था सुद्धा करण्यात आली आहे तरी मराठा समाज बांधवांनी लाखोंच्या संख्येने पावसाळा असल्याने छत्री,रेणकोट घेऊन शांतता संवाद रॅलीत सहभागी व्हावे असे आवाहन अखंड मराठा समाज बांधवांच्या वतीने करण्यात येत आहे.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!