Thursday, May 14

Tag: on July 8 in the presence of Jarange Patil

आरक्षणाच्या मुद्द्यावरून हिमायतनगर तालुक्यातील पोटा येथे मातंग समाज आक्रमक; रास्ता रोको आंदोलनात हजारो महिला रस्त्यांवर -NNL

आरक्षणाच्या मुद्द्यावरून हिमायतनगर तालुक्यातील पोटा येथे मातंग समाज आक्रमक; रास्ता रोको आंदोलनात हजारो महिला रस्त्यांवर -NNL

नांदेड
हिमायतनगर। मातंग समाज अनुसूचित जाती प्रवर्गातून आरक्षणाचा कागदोपत्री वाटेकरी आहे. परंतु काही विशिष्ट एका जातीनाच या आरक्षणाचा लाभ होत असल्याने, उर्वरित जाती पैकी मातंग समाजाला सामाजिक, शैक्षणिक आरक्षणाचा फायदा होत नाही. या विषयी दिनांक ०१जुलै २४पासून लोकस्वराज्य आंदोलनाचे संस्थापक/अध्यक्ष प्राध्यापक रामचंद्रजी भरांडे सर यांनी जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड समोर विविध मागण्या घेऊन बेमुदत आमरण महाउपोषण सुरू केलेले आहे. ते महाउपोषण मागील पाच दिवसांपासून चालत आहे. त्या उपोषणाला पाठींबा म्हणुन हिमायतनगर तालुक्यातील विविध मागण्यांसाठी रास्तारोको करण्यात आला. भरांडे सरांची तब्येत सतत खालावत आहे. त्यामुळे महाउपोषणाला जाहीर समर्थनार्थ व लाभ वंचित घटकांना स्वतंत्र अबकड आरक्षण वर्गीकरणाचा निर्णय राज्य सरकारने तातडीने घ्यावे.अशी न्यायाची मागणी घेऊन आज दिं.०४जुलै२४ रोजी मौजे पोटा बु.येथील भोकर-हिमायतन...
नांदेडात मराठा आरक्षण जनजागृती व शांतता रॅली… ८ जुलै रोजी जरांगे पाटील यांच्या उपस्थितीत पार पडणार -NNL

नांदेडात मराठा आरक्षण जनजागृती व शांतता रॅली… ८ जुलै रोजी जरांगे पाटील यांच्या उपस्थितीत पार पडणार -NNL

नांदेड
नांदेड। सगे सोयरे कायदा अंमलात आणुन मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातुन आरक्षण मिळावे , महाराष्ट्रातील आत्तापर्यंत झालेल्या मराठा आंदोलकावरील गुन्हे मागे घ्यावेत या मागण्यासाठी मराठा योद्धा मनोज जरंगे पाटील यांच्या नेतृत्वात दिनांक आठ जुलै रोजी नांदेड शहरामधे सकाळी ११.०० राज काॅर्नर तरोडेकर चौक-राजमाता जिजाऊ चौक-श्रीनगर-महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले पुतळा आय.टी.आय.चौक-शिवाजीनगर-एस.पी.ऑफीस चौक ते छत्रपती शिवाजी महाराज स्मारक परिसर या मार्गाने भव्य शांतता रॅली निघणार आहे व मनोज जरांगे पाटील हे समाज बांधवास छत्रपती शिवाजी महाराज स्मारक परिसरातुन संवाद साधणार आहेत.सदरील रॅलीचे नेतृत्व मराठा युद्ध मनोज जरांगे पाटील हे करणार आहेत. मागील पंधरा दिवसापासुन सदरील रॅलीच्या नियोजनासाठी अखंड मराठा समाज नांदेड जिल्हा व जिल्हा नियोजन समिती यांच्याकडुन रॅलीची जय्यत तयारी करण्यात येत आहे. २०जुन २...
error: Content is protected !!