नवीन नांदेड l अखेर महामार्गावरील लातूर फाटा चौक येथील ऊडाण पुलासाठी येणारा अडथळा पाहता नियोजित डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याचा जागी असलेला पंचशिल ध्वज व नामफलक विधीवत पूजन भंते यांच्या उपस्थितीत काढण्यात आला तर स्ट्रीट लाईट पोरही काढण्यात आला,यावेळी कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता, सदरील ठिकाणी जेसीबीचा साह्याने गर्डर टाकण्याचे काम चालू करण्यात आले असून सदरील ठिकाणाहून जाणारी येणारी वाहतूक वळविण्यात आली आहे.

राष्ट्रीय महामार्ग मध्ये अडचणी संबंधाने 9 रोजी सर्व संबंधित अधिकाऱ्यांचा बैठकीत डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक ठिकाणी राष्ट्रीय महामार्ग कामामध्ये टाकण्यात येणार असलेले गर्डर काम आठ ते दहा दिवसांत प्रकल्प संचालक भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण हे कल्याण टोल ईफ्रा स्ट्रक्चर या कंपनी मार्फत करून घेणार आहेत, सदरील काम करतांना चौकात पंचशिल ध्वज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक बोर्ड ईतरत्र ठेवण्यात येणार आहे, सदरील काम पुर्ण झाल्यानंतर पुनश्च पंचशिल ध्वज व नामफलक लावण्यात येणार असल्याचे बैठकीचा पत्रात नमूद करण्यात आले आहे, यासाठी एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी विविध खात्यांचे अधिकारी व संबंधित स्मारक समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.

10 जुंन रोजी सकाळी सदरील नामफलक व पंचशिल ध्वज विधीवत पूजन भंते पयाबोधी यांनी केले व यावेळी वंदना घेण्यात आल्या नंतर ध्वज खाली घेण्यात आला होता, यावेळी स्मारक समितीचे देवानंद सरोदे,विठ्ठल गायकवाड,गौतम गजभारे,वामन कंधारे यांच्या सह सामाजिक कार्यकर्ते भि.ना.गायकवाड समाज बांधव नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी सुशीलकुमार नायक, महसूल प्रशासनाचे उपविभागीय अधिकारी डॉ.सचिन खल्लाळ, नायब तहसीलदार स्वप्नील दिंगलवार,मंडळ अधिकारी राजेंद्र शिंदे, ग्रामविकास अधिकारी राम मुंडे, यांच्या सह महामार्ग प्राधिकरणाचे स्वप्निल कासार, अभियंता आंनद पुयड, श्रीकांत बाकले,मोतीलाल बाकले ,सपकाळ,व मनपा प्रशासनाचे कार्यकारी अभियंता अरूण शिंदे,
कनिष्ठ अभियंता किरण सुर्यवंशी, ग्रामीण पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन गढवे,विजय कांबळे, उपनिरीक्षक गायकवाड ज्ञानेश्वर मठवाड यांच्या सह पोलीस अंमलदार,महिला पोलिस यांच्या बंदोबस्त होता,सदरील कार्यवाही मुळे जाणारी येणारी वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती, यावेळी शहर वाहतूक शाखेच्या कर्मचारी यांच्यी नियुक्ती करण्यात येऊन वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे.


