Homeक्राईमFir Filed ; पतीच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी जावयाविरुद्ध तक्रार : सदोष मनुष्यवधाचा...

Fir Filed ; पतीच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी जावयाविरुद्ध तक्रार : सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

छत्रपती संभाजीनगर| शहरातील गुलमोहर कॉलनीत एका वृद्ध व्यक्तीच्या मृत्यू प्रकरणात धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पतीच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा ठपका ठेवत सासूने जावया विरोधात तक्रार दिली. पोलिसांनी जावयावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे.

फिर्यादी डॉली सुनिल चोप्रा (वय ६२ वर्ष) यांनी दिलेल्या माहितीनुसार, ०१ मे २०२५ रोजी रात्री ११ वाजता त्यांच्या पतीस, सुनिलकुमार दर्शनलाल चोप्रा यांना अचानक प्रकृती बिघडल्याने बेशुद्ध स्थितीत आढळले. तेव्हा आरोपी अखिलेश यादगिरी मूदीराज याने आपली चारचाकी गाडी आणून पतीस उपचारासाठी एमजीएम रुग्णालयात नेतो असे सांगितले. मात्र रुग्णालयात न नेताच पतीस गाडीतच ठेवले.

फिर्यादीच्या म्हणण्यानुसार, आरोपीला माहिती असूनही उपचार न करता गाडीतच ठेवून पतीचा मृत्यू घडवून आणला. त्यामुळे आरोपीने जाणीवपूर्वक निष्काळजीपणा दाखवत त्यांच्या पतीच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी सिडको पोलीस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलिस निरीक्षक दत्तात्रय जाधव यांच्या मार्गदरशनाखाली पोलीस उपनिरीक्षक नाणेकर हे करीत आहेत.

IMG 20250610 WA0056 Fir Filed ; पतीच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी जावयाविरुद्ध तक्रार : सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

हा गुन्हा दाखल होण्यासाठी फिर्यादी सासुला पोलिस आयुक्त यांच्या पर्यंत जावे लागले. पालक मंत्री संजय शिरसाट यांनी सुद्धा लक्ष घातले तेव्हा कुठे या कुटुंबाला न्याय मिळाला. या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्या नंतर आम्हाला न्याय मिळाला अशी प्रतिक्रिया मयत सुनिलकुमार दर्शनलाल चोप्रा यांच्या पत्नी डॉली सुनिल चोप्रा यांनी व्यक्त केली आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments