माजी केंद्रीय राज्यमंत्री सूर्यकांताताई पाटील स्वगृही परतणार ; मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश करणार -NNL
नांदेड जिल्ह्यातील भाजपला मोठा धक्का मानला जात असून, यामुळे मोठं नुकसान होणार आहे

नांदेड,अनिल मादसवार| माजी केंद्रीय राज्यमंत्री सूर्यकांता ताई पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी जिल्हाध्यक्ष किशोर देशमुख यांच्याकडे भारतीय जनता पक्षाच्या सदस्य पदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे भविष्यात कोणत्या राजकीय पक्षात जातील…? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर त्या शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करतील अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु होती, ती खरी होणार असुन, मंगळवारी सकाळी 11 वाजता खासदार शरद पवार यांच्या उपस्थितीत त्यांचा पक्ष प्रवेश होणार आहे.


गेल्या 10 वर्षापासून भाजपात काम करताना शासणाच्या चुकलेल्या निर्णयाच्या विरोधात माजी मंत्री सूर्यकांताताई पाटील यांनी खडे बोल सुनावत ते निर्णय मागे घ्यायला भाग पडले होते. त्या नेहमी सत्याच्या बाजूने राहून ठोस भूमिका बजावतात हि त्यांची ओळख आहे. आता आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करतील अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.

दहा वर्षापासून भाजप पक्षामध्ये काम करत असताना देखील नामदार सूर्यकांत पाटील यांच्यावर भाजपाने कुठलीही मोठी जबाबदारी दिली नाही. त्यामुळेच कि काय..? भारतीय जनता पक्षामध्ये सामील झालेल्या केंद्रीय मंत्री सूर्यकांत पाटील यांनी भाजप पक्षाला रामराम ठोकत सदस्य पदाचा राजीनामा दिला. ऐन विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर सूर्यकांता पाटील यांनी भाजपाला रामराम केल्याने राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. पाटील यांच्या राजीनामा मुळे नांदेड जिल्ह्यात भाजपचे मोठे नुकसान होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यानंतर सूर्यकांताताई पाटील ह्या शरद पवार गटाच्या वाटेवर असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळा सुरू झाल्या होत्या. त्या खऱ्या होताना दिसून येत आहेत आजच्या त्या मुंबईकडे रवाना झाल्या असून, सूर्यकांता पाटील यांचा पक्ष प्रवेश सोहळा उद्या मंगळवारी होण्याची शक्यता आहे.


काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपा असा राजकीय प्रवास केलेल्या नेत्या पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याने आगामी हदगाव हिमायतनगर विधानसभा निवडणुकीतून त्या रिंगणात उतरतील असे चित्र सध्यातरी दिसून येत आहे. ही चर्चा कुठवर खरी ठरते यासाठी विधानसभा निवडणुकीपर्यंत वाट पाहावी लागणार आहे.
हदगाव तालुक्यातील वायफना जी. नांदेड येथील त्या मुळच्या रहिवाशी असून, त्यांना स्वातंत्र्य सैनिक जयवंतराव पाटील यांचा वारसा लाभलेला आहे. सूर्यकांताताई पाटील यांनी काँग्रेस पक्षात मोठा कार्यकाळ गाजविला, राजीव गांधी, शरद पवार, सोनिया गांधी यांच्यासह इतर दिग्गज नेत्यासोबत त्या कार्यरत होत्या त्यांनी 1999 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शरद पवार यांच्यासोबत राष्ट्रवादीत जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर हिंगोली लोकसभा मतदारसंघातून त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर निवडून आल्या. आणि ग्रामविकास तथा संसदीय कार्य राज्यमंत्री म्हणून त्यांनी काम पाहिले. त्यांच्या कार्यकाळात हिंगोली लोकसभा मतदारसंघात केलेल्या विकास कामाचे आजही जिवंत उदाहरण अनेक भागात पायहावयास मिळतात.

त्यांनी केलेल्या प्रधानमंत्री सडक रस्त्यानंतर आतापर्यंत एकही खासदाराने त्या रस्त्यावर खडा टाकला असल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे हिंगोली लोकसभेसह हदगाव विधानसभा क्षेत्रामध्ये विशेषतः शेतकऱ्यांसाठी मोठा योगदान राहिलेलं आहे, त्यांनी उभारलेल्या हुतात्मा जयवंतराव साखर कारखान्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा झाला यामुळेच तालुक्यात त्यांच मोठ नाव आहे. यापूर्वी त्या नांदेड मधून नगरसेवक तसेच हदगाव विधानसभा मतदारसंघातून आमदार झाल्या. तसेच नांदेड लोकसभा मतदारसंघाचे खासदार म्हणूनही त्यांनी काम पाहिले होते. एकूणच त्यांची कारकीर्द हे सर्वसामान्यांना आठवण देणारी असून, आपल्या भागाचा सर्वांगीस विकास साधण्यासाठी त्यांनी राजकीय क्षेत्रात अत्यंत तळमळीने काम केले. त्यांच्या याच कार्याची पावती म्हणून हादगाव विधानसभा मतदारसंघात जनता नक्कीच त्यांना आशीर्वाद देतील असेही जुने जाणकार बोलून दाखवत आहेत.



