उमरखेड, अरविंद ओझलवाल| घरातील थोरामोठ्यांचे वाढदिवस सगळेच साजरे करतात परंतु आपल्या घरात जन्मलेल्या ” नंदु ” बैलाचा तिसरा वाढदिवस तो सुद्धा आतिश बाजी डीजे व केक कापून साजरा करण्यात आला .हा आगळावेगळा वाढदिवस पाहण्यासाठी शहरातील नागरिकांनी गर्दी केली होती .
उमरखेड शहरातील भगतसिंग वार्डात राहणाऱ्या बालाजी भगवान गायकवाड व संजय भगवान गायकवाड या दोन्ही शेतकरी बंधूंनी हा अफलातून वाढदिवस साजरा करत शेतकऱ्याचा नाद करायचा नाय असा जणू संदेश दिला आहे .
शेतकरी हा आपला पशुपाल्यावर आपल्या जन्मदात्या मुलासारखाच प्रेम करतो त्याचं जिवंत उदाहरण आणि प्रतिबिंब उमरखेड शहरातील बालाजी गायकवाड व संजय गायकवाड यांनी तीन वर्षाच्या बैलाचा वाढदिवस साजरा केला. संपूर्ण कुटुंबासमवेत तसेच ईष्टमित्रांना आमंत्रण देऊन वाढदिवस साजरा केला यावेळी छत्रपती शिवाजी महाराज व महादेवाची विधीवत पूजा करून ” नंदू ” ला तिलक लावण्यात आला.नंदू चा वाढदिवस असल्याने त्याला सजवण्यात आले होते .त्यानंतर त्याचा केक कापून वाढदिवस साजरा केला .घरासमोर डीजे वाजत असताना उपस्थित आन सोबत नंदूने सुद्धा नाचण्याचा ठेका धरला होता .
हा अभूतपूर्व सोहळा पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती .दरम्यान नंदू चा वाढदिवस 26 डिसेंबरला असताना शहरात 25 डिसेंबरला गायकवाड बंधूंनी मोठमोठे बॅनर लावल्याने सदर वाढदिवस शहरात चर्चेचा विषय ठरला .सदर वाढदिवसाच्या आयोजनासाठी बालाजी गायकवाड व संजय गायकवाड यांचे सह गंगाराम कवाने अमोल तीवरंगकर अमोल बाभुळकर बंडू वटाणे बालाजी कवाने अमोल वटाणे व अमोल गायकवाड यांनी सहकार्य केले .
नंदूचा जन्म झाल्यापासून आमच्या शेतीच्या उत्पन्नात भरपूर वाढ झाली आहे त्यामुळे त्याच्या पायगुणाने आमची प्रगती झाल्याने घरचा सदस्य म्हणून आम्ही वागणूक देतो 21 डिसेंबरला मुलगा अमोल याचा वाढदिवस छोट्या पद्धतीने साजरा केला परंतु नंदूचा तिसरा वाढदिवस मात्र धुमधडाक्यात साजरा करायचा असे आम्ही बांधवांनी ठरवल्याने आज धुमधडाक्यात वाढदिवस साजरा केला. श्री बालाजी भगवान गायकवाड, शेतकरी उमरखेड, जी.यवतमाळ.