Farmer Celebrated Bull Birthday ; शेतकऱ्याने केला धुमधडाक्यात “नंदु ” बैलाचा वाढदिवस -NNL
उमरखेड, अरविंद ओझलवाल| घरातील थोरामोठ्यांचे वाढदिवस सगळेच साजरे करतात परंतु आपल्या घरात जन्मलेल्या " नंदु " बैलाचा तिसरा वाढदिवस तो सुद्धा आतिश बाजी डीजे व केक कापून साजरा करण्यात आला .हा आगळावेगळा वाढदिवस पाहण्यासाठी शहरातील नागरिकांनी गर्दी केली होती .
उमरखेड शहरातील भगतसिंग वार्डात राहणाऱ्या बालाजी भगवान गायकवाड व संजय भगवान गायकवाड या दोन्ही शेतकरी बंधूंनी हा अफलातून वाढदिवस साजरा करत शेतकऱ्याचा नाद करायचा नाय असा जणू संदेश दिला आहे .
शेतकरी हा आपला पशुपाल्यावर आपल्या जन्मदात्या मुलासारखाच प्रेम करतो त्याचं जिवंत उदाहरण आणि प्रतिबिंब उमरखेड शहरातील बालाजी गायकवाड व संजय गायकवाड यांनी तीन वर्षाच्या बैलाचा वाढदिवस साजरा केला. संपूर्ण कुटुंबासमवेत तसेच ईष्टमित्रांना आमंत्रण देऊन वाढदिवस साजरा केला यावेळी छत्रपती शिवाजी महाराज व महादेवाची विधीवत पूजा करून " नंदू " ला तिलक लावण्या...
