सागवानाची तस्करी करणारी कार किनवट वन विभागाच्या ताब्यात सागवान तस्कर मात्र फरार -NNL

किनवट,परमेश्वर पेशवे। दिनांक 15 /06/ 2024 रोजी किनवट – गोकुंदा रोडवर किनवट वन विभागाची कर्मचारीगस्त करत असतांना पांढऱ्या रंगाची टाटा इंडिका कार मध्ये सागवानाची तस्करी होत असल्याची माहिती गुप्त खबऱ्याच्या माध्यमातून वन विभागाच्या कर्मचाऱ्याला मिळाल्याने वाहनाचा पाठलाग करून पकडण्याचा प्रयत्न केला.

पण सागवान तस्कर नेहमीप्रमाणे अंधाराचा फायदा घेऊन पसार होण्यात यशस्वी झाले व वाहन सोडून आरोपी पळून गेले . सदरील सागवान तस्करी प्रकरणी टाटा इंडिका कार जवळ जाऊन तपासणी केली असता त्यामध्ये अवैधसागी कटसाईज नग -21 आढळून आले. आज्ञात आरोपी विरुद्ध वन कायद्याअंतर्गत किनवट वन विभागाने गुन्हा दाखल केला .

या कार्यवाहीत उपवनसंरक्षक नांदेड केशव वाबळे, सहाय्यक वनसंरक्षक जी. डी.गिरी वनपरिक्षेत्र अधिकारी प्रा.किनवट पी. एल.राठोड यांच्या मार्गद्शनाखाली वनपरिमंडळ अधिकारी चिखली एम.एन.कतुलवार , एस. एम. कोम्पलवार , एस. एम. यादव वनरक्षक अनिल फोले , बी. एस. झंपलवाड ओ. एन. शिंदे, व्ही एस मुळे तसेच कर्तव्यदक्ष वाहन चालक बाळकृष्ण आवले शेख नूर यांचा या कार्यवाहीत सक्रिय सहभाग होता. या कारवाईत एकूण 44 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असल्याची माहिती वन विभागाकडून मिळाली.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button