श्रीक्षेत्र माहूर, राज ठाकूर| माहूर शहरातील वार्ड क्रमांक दहा मध्ये एका घरात कत्तलीच्या उद्देशाने आणलेले तीन गोवंश आणि हाडा मासाने भरलेले वाहन उभे असल्याची माहिती माहूर पोलीसाना मिळाल्याने सपोनी शिवप्रकाश मुळे यांनी आपल्या कर्मचारीसह अचानकपणे धाड टाकून तीन गोवंश आणि टेम्पो असा एकूण चार लाख दोनशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. तसेच पाच जणांना ताब्यात घेत गुन्हा दाखल केल्याची घटना दि ८ मार्च रोजी घडली.


गोपनीय माहिती दाराकडून माहिती मिळाल्याने माहूर पोलिसांची पोलीस ठाण्याचे सपोनी शिवप्रकाश मुळे यांनी वार्ड क्रमांक दहा येथे एका घरावर छापा मारला असता येथे कत्तलीच्या उद्देशाने आणलेले तीन बैल गोवंश आणि त्या घरासमोर महिंद्रा पिकप टेम्पो एम एच ३० एबि १९९४ मध्ये सहा क्विंटल गोवंशाची हाडे असलेले वाहन व तिन बैल माहूर पोलीस स्टेशनला जमा करण्यात आले असून, एकूण पाच आरोपीवर महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

पुढील तपास पोहेका गजानन चौधरी. पोहेका प्रकाश गेडाम. पोहेका परमेश्वर कनकावाड. गजानन जाधव. संग्राम पवार. ज्ञानेश्वर वेलदोडे. नामदेव इंनकर आणि होमगार्ड संजय चव्हाण अरविंद राठोड आकाश गिनगुले अजय राठोड पंकज मुरकुटे उपस्थित होते सपोनी शिवप्रकाश मुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेका गजानन चौधरी हे पुढील तपास करत आहेत.
