किनवट,परमेश्वर पेशवे| विज महावितरण कम्पनीच्या अक्षम्य लापरवाह प्रशासनामुळे गुरुवारी (१० आँक्टोबर) तब्बल सात घंटे विज पुरवठा खंडीत झाला. महावितरणच्या ग्रामिण क्र.१ कार्यालयापासून ते गोकुंद्यातील दत्तनगर भागात दुपारी ३ वाजता विज गायब झाली ती रात्री ९.३० वाजताचे आसपास टाकण्यात आल्याने नागरीकांसह ग्राहकांमध्ये तारांबळ उडाली. विद्यूत उपकरणावर आधारीत धंदे खोळंबली. नवरात्रो दुर्गोत्सवाचे दिवस असतांना खोडसाळपणाने कारण नसतांना विज गायब केली जात आहे. अनेकांनी संबंधित अभियंत्यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केल्यास प्रतिसादही मिळत नाही. बार-बार विज पुरवठा खंडीत प्रकरणी चौकशी करुन राजकीय वलय असलेल्या अभियंत्याची तात्काळ बदली करण्याच्या मागणीने जोर धरला आहे.


१० आँक्टोबर रोजी दुपारी जवळपास ३ वाजल्यापासून विज महावितरण ग्रामिण क्र.१ कार्यालय परिसरापासून राष्ट्रीय महामार्गाच्या पुर्वेकडील शहरासह गोकुंद्यातील दत्तनगर भागातील विज पुरवठा खंडीत झाला. रात्री ९.३० वाजताचे आसपास खंडीत झालेला विज पुरवठा सुरु करण्यात आला. सात-सात तास विज गुल होण्या मागचे कारण काय ?, असा नागरीकांसह ग्राहकांचा सवाल आहे. उल्लेखनीय म्हणजे विजेवर अवलंबून असणार्यांची धंदे बंद पडली. घरच्या बोअरवेलच्या पाण्यावर विसंबून असणार्यांना पाणी मिळाले नाही. पिठाच्या गिरण्या बंद पडल्या. टेलरींगची दुकाने, मार्केटमधील संगणकं, झेराॅक्स आदी व्यवसाय करता आली नसल्यामुळे लोकांच्या तिव्र प्रतिक्रीया उमटतांना दिसतात.


सद्या दुर्गोत्सवाचे दिवस आहेत. हिंदूंच्या सणासुदिच्या काळात अखंडीत विज पुरवठा व्हायला हवा अशी लोकांची अपेक्षा आहे. परंतू नेमके याच काळात विज गुल करण्याचे प्रमाण वाढले. संबंधित अभियत्याला राजकीय वरदहस्त असल्याने विज ग्राहकांच्या तक्रारीनंतरही ग्राहकांना अखंडीत सेवा मिळणे दुरापास्त झाले आहे. जुनाट विज वाहिन्या, ढबरे रोहित्र, वाकलेले खांब, लोंबकळत्या विजतारा यापासून किनवट करांची सुटका होणार की नाही ? वाकलेल्या खांबामुळे आणि तारांमुळे तालुक्यातील कित्येकांना विजेचा स्पर्श होऊन प्राणाला मुकावे लागले. महावितरणच्या वरिष्ठांनी १० आँक्टोबर रोजी सात तास विज खंडीत झाल्या प्रकरणी चौकशी करुन कार्यवाही करण्याची मागणी करण्यात येत आहे.




