HomeनांदेडShri Bhagwan Baba's Math : श्री भगवान बाबा यांच्या मठ येथे शारदीय...

Shri Bhagwan Baba’s Math : श्री भगवान बाबा यांच्या मठ येथे शारदीय नवरात्र महोत्सव निमित्त महाप्रसादाचा कार्यक्रम संपन्न -NNL

किनवट, परमेश्वर पेशवे| तालुक्यातील कामठाला जवळच असलेल्या शाकंबरी, लकीशा बंजारा भगवान बाबा मठ येथे शारदीय नवरात्र महोत्सव निमित्त दिनांक 11 ऑक्टोबर शुक्रवारी महाप्रसादांचा कार्यक्रम संपन्न झाला.असून यावेळी बंजारा समाजाचे कवीने समाजप्रबोधनाच्या माध्यमातून उपस्थित असलेल्या सर्व भाविक भक्तांना प्रबोधन केले आहे.

दिनांक 11 ऑक्टोबर शुक्रवारी भगवान बाबा शाकंबरी लकीशा बंजारा भगवान बाबा मठ येथे महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित केला होता त्यानिमित्त अखिल भारतीय बंजारा कवी प्रेमदास महाराज यांचे सुपुत्र ह.भ.प. गोकुळदास महाराज वनोलीकर, ह.भ. प.हिरामण महाराज टिंगनवाडीकर यांनी उपस्थित असलेल्या भावीक भक्तांना सकाळपासूनच आपल्या वाणीतून समाज प्रबोधन केले होते. श्री भगवान बाबा यांच्या शुभहस्ते होम हवन करून देवी देवतांना महाप्रसादांचा भोगप्रसाद लावण्यात आला.

सदरील कार्यक्रमास काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते यादवराव जाधव, ह भ प बन्सी महाराज माजलगाव, ह भ प प्ररसराम महाराज माजलगाव, श्री भगवान बाबा यांचे शिष्य भीमराव महाराज पैठणकर, रोहिदास तांडा येथील नाईक व्यंकट चव्हाण, रोहिदास तांडा येथील ज्येष्ठ नागरिक नामदेव चव्हाण, राजगड तांडा येथील नाईक फुलसिंग राठोड, युवा नेते नवीनभाऊ जाधव, दिलीप जाधव, विलास आडे यांच्यासह कमठाला, रोहिदास तांडा येथील नागरिकांनी व संत महंत व परिसरातील भाविक भक्तांनी सदरील महाप्रसादाच्या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान परिसरात सकाळपासूनच वाजत गाजत चालू असलेल्या समाज प्रबोधनच्या कार्यक्रमामुळे भक्तिमय वातावरण झाले होते.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments