किनवट, परमेश्वर पेशवे| नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील आप्पारापेठ येथील नागन्ना कोतुलगाव वय 48 वर्षे हा शेतकरी वैयक्तिक खाजगी कामासाठी बैलगाडीने छोटे गोटे शेताकडे नेत असताना भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकचा बैलगाडीला जोराचा धक्का लागला, यामुळे बैलगाडी सह शेतकरी नागन्ना पोतन्ना कोतुलगाव हा शेतकरी पुलावरून खाली पाण्यात बैलगाडी सह कोसळला (Due to the impact of the truck, the driver along with the bullocks fell into the bridge) या घटनेत एका बैलाचा जागीच मृत्यू झाला तर शेतकरी पुलाच्या पाण्यातून कसा बसा बाहेर निघाला.


या अपघातात किरकोळ जखमी झालेल्या शेतकऱ्यांनी आरडा ओरड केल्याने इतर शेतकऱ्यांनी याकडे धाव घेत दुसऱ्या बैलाला वाचवण्यासाठी विळ्याने दोरखंड कापून गंभीरित्या जखमी झालेल्या बैलाला वाचवले आहे. तर नागन्ना कोतुलगाव हा अपंग शेतकरी या गंभीरघटनेतून बालबाल बचावला आहे.



ही घटना नांदेडच्या किनवट तालुक्यातील आप्पारापेठ ते गोंडजेवली नाक्याकडे जाणाऱ्या रोडवरील श्रीधर रेड्डी यांच्या शेताजवळील अरुंद पुलावर गुरुवारी सकाळी नऊ वाजल्याच्या सुमारास घडली. अशी माहिती येथील माजी जिल्हा परिषद सदस्य सूर्यकांत आरडंकर, माजी तंटामुक्ती अध्यक्ष विनायक देशमुख व सरपंच शेख अब्दुल रब, पोलीस पाटील भुम्मा रेड्डी लोकावार यांनी दिली.




