Release of Zilla Parishad Monitoring App : जिल्हा परिषद मॉनिटरिंग ॲपचे विमोचन

नांदेड, अनिल मादसवार| जिल्हा परिषदेच्या कामात सुसूत्रता यावी तसेच कारभार अधिक पारदर्शक होण्यासाठी विकसित करण्यात आलेल्या जिल्हा परिषद मॉनिटरिंग सिस्टीम ॲपचे विमोचन नुकतेच राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी आमदार श्रीजया चव्हाण, मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक डॉ. संजय तुबाकले, सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार मुक्कावार तसेच सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते.

जिल्हा परिषदेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी तयार करण्यात आलेले हे विशेष ॲप माहिती संकलन तसेच आढावा घेण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. यामुळे जिल्हा परिषदेचे कामकाज अधिक पारदर्शक होईल, असे मत खासदार अशोकराव चव्हाण यांनी यावेळी व्यक्त केले. या ॲपमध्ये जिल्हा परिषद अंतर्गत असलेल्या सर्व आस्थापनांमधील विभागनिहाय भरलेली व रिक्त पदांची माहिती संकलित करण्यात आली आहे. बदली प्रक्रियेदरम्यान पदस्थापनेचा समतोल राखण्यासाठी हे ॲप उपयोगी ठरणार आहे.

याशिवाय ग्रामपंचायत अधिकारी, शिक्षक व आरोग्य कर्मचारी यांची उपस्थिती क्युआर कोडद्वारे नोंदवलेली उपस्थितीची माहिती कळणार आहे. शिक्षण विभागाच्या माध्यमातून शाळा निहाय मुलांच्या भाषा व गणित विषयातील गुणवत्ता स्तराची माहिती सहज मिळणार आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या संकल्पनेतून नागरिकांच्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या व्हिआर टाईम बाॅण्ड प्रणालीची माहितीही या ॲपमध्ये समाविष्ट करण्यात आली आहे. बांधकाम विभागातील सर्व प्रगतीपथावरील प्रकल्पांच्या टप्प्यांची माहिती या प्रणालीद्वारे मिळणार आहे. तसेच जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायत स्तरावर 15 व्या वित्त आयोगाच्या निधीतून झालेल्या विकास कामांचा आढावा घेता येणार आहे. निधीचा खर्च व शिल्लक रक्कम याबाबतही स्पष्टता राहणार आहे.

यासोबतच जिल्हा परिषदेच्या विविध विभागांमधील संचिका प्रवासाचे सुलभ व्यवस्थापन करण्यासाठी फाईल ट्रॅकिंग सिस्टीम विकसित करण्यात आली आहे. या नव्याने सुरू केलेल्या मॉनिटरिंग सिस्टीममुळे जिल्हा परिषदेचा कारभार अधिक पारदर्शक व प्रभावी होईल असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button