नांदेडसोशल वर्क

Dr. Babasaheb Ambedkar Chowk ; डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक ते वनामा महाविद्यालय दुतर्फा स्ट्रीट लाईट कामाला सुरुवात

नवीन नांदेड l डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक लातूर फाटा ते सिडको वसंतराव नाईक महाविद्यालय पर्यंत बंद असलेल्या दुतर्फा स्ट्रीट लाईट चे काम माजी नगरसेवक भीमराव गायकवाड यांनी मनपा आयुक्त यांच्या कडे केलेल्या प्रयत्ना मुळे अखेर दुरूस्ती कामाला सुरुवात झाली आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून बंद असलेल्या या दुतर्फा स्ट्रीट लाईट मुळे नागरीकासह वाहनाधारक लाईट अभावी त्रस्त झाले होते,तर अनेक अपघात व चोरीच्या घटना ही घडल्या होत्या, बंद असलेल्या लाईट अभावी नागरीकांच्यी होणारी गैरसोय पाहता सामाजिक कार्यकर्ते भि.ना.गायकवाड यांनी मनपा आयुक्त डॉ.महेश‌ कुमार डोईफोडे यांच्याकडे प्रत्यक्ष भेटून निवेदन देऊन लाईट तात्काळ चालू करण्याची मागणी केली होती,‌अखेर गेल्या दोन दिवसांपासून या स्ट्रीट लाईट दुरूस्ती कामाला सुरुवात झाली असून शिवजयंती निमित्ताने ही स्ट्रीट लाईट चालू होणार आहे.

या चालू होणाऱ्या लाईट मुळे सिडको हडको परिसरासह ग्रामीण भागातील जाणाऱ्या येणाऱ्या वाहनधारकांना व‌ नागरीकांना फायदा होणार आहे

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!