नांदेड | आज दि.20 ऑगस्ट रोजी यशवंतराव चव्हाण सभागृह, जिल्हा परिषद नांदेड येथे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख मॅडम यांच्या अध्यक्षतेखाली नांदेड जिल्ह्यातील सर्व तालुका आरोग्य अधिकारी व सर्व वैद्यकीय वैद्यकीय अधिकारी यांचे आढावा बैठक घेण्यात आली.
डॉ. संगीता देशमुख मॅडम यांनी विविध कामकाजाविषयी सविस्तर आढावा घेतला.


माता बाल संगोपन, हाय रिस्क मता, कायाकल्प, सुमन, कुष्ठरोग, क्षयरोग संसर्गजन्य व असंसर्गजन्य आजार, राष्ट्रीय किटक रोग नियंत्रण कार्यक्रम, लसीकरण डीएचआयएस, 2 (DHIS2) रिपोर्टिंग, स्टेट हेल्थ आईशी ब्युरो महाराष्ट्र ज्या पोस्ट सोशल मीडियावर पोस्ट केल्या जातील त्यांना लाईक शेअर व सबस्क्राईब करणे याविषयी चर्चा करण्यात आली. तसेच महाआरोग्य आय इ सी नांदेड नावाने फेसबुक पेज तयार करण्यात आले आहे. यावर चर्चा झाली. मंकी बॉक्स या आजाराचा प्रसार, घ्यावयाची काळजी, प्रतिबंध नियंत्रण, उपाययोजना करणे बाबत सूचना देण्यात आल्या.



यावेळी अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष सूर्यवंशी, माता बाल संगोपन अधिकारी डॉ.शिवशक्ती पवार, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. सतिश कोरपूरवाड, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. राजेश्वर माचेवार, हत्तीरोग अधिकारी डॉ आकाश देशमुख, जिल्हा विस्तार माध्यम अधिकारी श्रीमती दराडे, जिल्यातील तालुका आरोग्य अधिकारी व वैद्यकीय अधिकारी आदी उपस्थित होते.




