नांदेडधार्मिक

Pandharpur Dindi Kandhar : “ग्यानबा तुकाराम” चा जयघोष करीत कंधार – पंढरपूर पायी दिंडीचे प्रस्थान

कंधार,सचिन मोरे। तीनशे वर्षापासून अविरत विठ्ठल नामाचा गजर करीत पंढरपूरला जाणारी येथील श्री संत साधू कंधारकर महाराजांची पायी दिंडी दि. १९ जून रोजी गुरुवारी दुपारी पंढरपूरकडे रवाना झाली. १५ दिवसाचा पायी प्रवास करीत ही दिंडी ३ जुलै रोजी पंढरपूरला पोचणार आहे. प्रथमच तयार करण्यात आलेले चांदीचे रथ दिंडीचे आकर्षण ठरले.

श्री साधू महाराज संस्थानचे आठवे वंशज मठाधिपती श्री एकनाथ महाराज साधू यांच्या मार्गदर्शनाखाली व दिंडी चालक श्री ज्ञानेश्वर महाराज साधू यांच्या नेतृत्वात ग्यानबा तुकाराम – ग्यानबा तुकाराम असा जयघोष करीत दिंडीचे पंढरपूरकडे प्रस्थान झाले. शहरातील मुख्य मार्गावरून ही दिंडी मार्गस्थ झाली. दिंडीचा स्वागतासाठी शहरात ठिकठिकाणी कमानी लावण्यात आल्या होत्या. दिंडीच्या दर्शनासाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूस भक्तांनी अलोट गर्दी केली होती. यात मोठ्यासंख्येने महिलांचा समावेश होता.

कंधार न्यायालयासमोर जेष्ठ विधीज्ञ अड. बी. के. पांचाळ यांच्यावतीने पायी दिंडीत सहभागी वारकऱ्यांसाठी पाणी, केळी आणि बिस्कीट वाटप करण्यात आले. अड. पांचाळ यांच्यावतीने यावेळी संत एकनाथ महाराजांचा पुष्पहार टाकून सत्कार करण्यात आला. यावेळी अड. नागेश राठोडकर, अड. कुटे, अड. दिगंबर गायकवाड, अड. रवी केंद्रे, अड. हफीज घडीवाला, अड. श्रेयस धर्मापुरीकर, अड. सुहास मस्के, अड. गजानन बनसोडे आदी उपस्थित होते.

आ. प्रताप पाटील चिखलीकर यांचे समर्थक बाजार समितीचे माजी संचालक राजकुमार केकाटे व राष्ट्रवादीच्या महिला शहराध्यक्षा आंम्रपाली राजकुमार केकाटे यांच्यावतीने छत्रपती शिवाजी चौकात मठाधिपती श्री संत एकनाथ महाराज यांची शर्करातुला करण्यात आली. यावेळी माजी नगराध्यक्ष स्वप्निल लुंगारे, मधुकर डांगे, गंगाधर कांबळे, पोलिस निरीक्षक चंद्रकांत जाधव, निलेश गौर, राजहंस शहापुरे आदी उपस्थित होते. तसेच शिवसेना (ऊबाठा) तालुका प्रमुख परमेश्वर जाधव यांच्याकडूनही महाराजांना पुष्पहार अर्पण करून स्वागत करण्यात आले.

काँग्रेसचे माजी आ. ईश्वरराव भोसीकर, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संजय भोसीकर, शिवसेनेचे माजी आ. रोहिदास चव्हाण, श्री शिवाजी मोफत एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष माजी जि. प. सदस्य प्रा. डॉ. पुरुषोत्तम धोंडगे, भाजपचे तालुकाध्यक्ष विजय धोंडगे यांच्यासह विविध पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते पायी दिंडीत सहभागी होऊन श्री संत साधू महाराजांच्या पादुकांचे दर्शन घेतले. शहराच्या शिवे पर्यंत हजारो महिला, पुरुष व तरुणांनी दिंडीत सहभाग नोंदवला.

ही दिंडी कंधार, लोहा, माळाकोळी, माळेगाव, सांगवी, अहमदपूर, शिरूर, चापोली, चाकुर, घरणी, भातखेडा, लातुर, साकरा, बोरगाव, मुरूड, ढवळाला, तडवळे, येडसी, घारी, जामगाव, बार्शी, म्हैसगाव, कुडूवाडी, कुर्मदास, आरण, आष्टी, आढीव असा पायी प्रवास करून तीन जुलैला पंढरपूरला पोचणार आहे.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button