Thursday, May 21

Tag: Pandharpur on foot

Pandharpur Dindi Kandhar : “ग्यानबा तुकाराम” चा जयघोष करीत कंधार – पंढरपूर पायी दिंडीचे प्रस्थान

Pandharpur Dindi Kandhar : “ग्यानबा तुकाराम” चा जयघोष करीत कंधार – पंढरपूर पायी दिंडीचे प्रस्थान

नांदेड, धार्मिक
कंधार,सचिन मोरे। तीनशे वर्षापासून अविरत विठ्ठल नामाचा गजर करीत पंढरपूरला जाणारी येथील श्री संत साधू कंधारकर महाराजांची पायी दिंडी दि. १९ जून रोजी गुरुवारी दुपारी पंढरपूरकडे रवाना झाली. १५ दिवसाचा पायी प्रवास करीत ही दिंडी ३ जुलै रोजी पंढरपूरला पोचणार आहे. प्रथमच तयार करण्यात आलेले चांदीचे रथ दिंडीचे आकर्षण ठरले. श्री साधू महाराज संस्थानचे आठवे वंशज मठाधिपती श्री एकनाथ महाराज साधू यांच्या मार्गदर्शनाखाली व दिंडी चालक श्री ज्ञानेश्वर महाराज साधू यांच्या नेतृत्वात ग्यानबा तुकाराम - ग्यानबा तुकाराम असा जयघोष करीत दिंडीचे पंढरपूरकडे प्रस्थान झाले. शहरातील मुख्य मार्गावरून ही दिंडी मार्गस्थ झाली. दिंडीचा स्वागतासाठी शहरात ठिकठिकाणी कमानी लावण्यात आल्या होत्या. दिंडीच्या दर्शनासाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूस भक्तांनी अलोट गर्दी केली होती. यात मोठ्यासंख्येने महिलांचा समावेश होता. कंधार न्य...
error: Content is protected !!