125 Android mobiles : नांदेड जिल्हयातील मिसींग मधील 17 लक्ष 73,000 रूपयाचे 125 अँड्रॉईड मोबाईल हस्तगत -NNL

नांदेड| जिल्हयातील सार्वजनिक ठिकाणाहून व बाजारातून महागडे मोबाईल गहाळ झालेल्या मोबाईलचा शोध घेण्याकरीता मा. पोलीस अधिक्षक नांदेड यांनी पो.स्टे. सायबर पोनि धिरज चव्हाण यांना आदेशीत केले होते. त्यानूसार सायबर सेल, स्था.गु.शा. व नांदेड जिल्हयातील सर्व पोस्टेचे पथक तयार करून मिसिंग मोबाईल‌चा शोध घेणेची मोहीम राबविण्यात आली होती.

नांदेड येथील पोलीस स्टेशनचे व स्थागुशाच्या पथकाने जिल्हयातील गहाळ झालेल्या मोबाईलचा शोध वेगवेगळया ठिकाणी जावून नांदेड जिल्यातील एकूण 125 मोबाईल किंमत 17,73,000 /- रूपयाचे हस्तगत केले आहेत, त्यांचे आज एकत्रितरीत्या मा. पोलीस अधीक्षक साहेब यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. शोध झालेल्या मोबाईलचे IMEI क्रमांकाची माहिती नांदेड पोलीस दलाचे “Nanded Police” या Facebook Page व Twitter वर टाकण्यात आली आहे. त्यापैकी नागरीकांनी आपल्या हरवलेल्या मोबाईलचा IMEI क्रमांक ओळखुन सायबर पो.स्टे. नांदेड येथून मोबाईल घेवून जाण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

तसेच खालील तक्रारदार यांनी त्यांचे सोबत ऑनलाईन फसवणूक अनुषंगाने नॅशनल सायबर क्राईम रिपाटींग पोर्टल (NCCRP) व 1930 वर तक्रारी केल्या होत्या सदर तक्रारीमधील फसवणूक रकमेच्या अनुषंगाने सायबर पोलीस स्टेशन येथून विविध बँकाना पत्रव्यवहार व पाठपुरावा करून फसवणूकीची रक्कम होल्ड करून सदरची रक्कम खालील तक्रारदार यांना परत मिळवून देण्यात यश आले आहे.

सदरची कामगिरी ही मा. पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव नांदेड, खंडेराय धरणे भोकर, गृह पोलीस उप अधीक्षक श्रीमती डॉ. अश्विनी जगताप, पोनि उदय खंडेराय स्था.गु.शा, पोनि धिरज चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली, पो. स्टे सायबर पोउपनि एम. बी. चव्हाण, पोलीस अर्मलदार राजेन्द्र सिटीकर, दिपक ओढणे, दाविद पिडगे, मोहम्मद असीफ, विलास राठोड, काशीनाथ कारखेडे, मोहन स्वामी, दिपक शेवाळे, ज्ञानेश्वर यन्नावार, व्यंकटेश सांगळे, दिपक राठोड, मपोकों कांचन कसबे यांनी पार पाडली आहे.

पोलीस अधीक्षक नांदेड यांनी CEIR पोर्टलवर आपले गहाळ झालेल्या मोबाईलची माहिती अपलोड करण्याचे व सायबर क्राईम घडल्यास त्वरीत 1930 या क्रमांकावर फोन करून तक्रार देण्याचे आवाहन केले आहे. सदर कामगीरी बाबत मा. पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी सर्व पथकाचे अभिनंदन केले आहे.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button