नांदेड| सायबर पोलीस स्टेशन नांदेड यांच्या वतीने प्रतीभा निकेतन विदयालय श्रीनगर, नांदेड येथे विदयार्थ्यासाठी सायबर जनजागृती कार्यशाळा संपन्न झाली. यास विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
दिनांक 29/11/2024 रोजी विदयार्थ्यांमध्ये दिवसेंदिवस वाढत असलेला मोबाईलचा व सोशल मिडीयाचा वापर त्याचे दुष्परीनाम, ऑनलाईन फसवणूक, विविध प्रकारचे सायबर गुन्हे, माहिती तंत्रज्ञान अधिनियम, सायबरचा वापर करताना घ्यावयाची दक्षता व सुरक्षा, एखादा सायबर गुन्हा घडल्यास त्याबाबत कुठे तक्रार करावी या बाबतीत विदयार्थी व शिक्षक यांचेमध्ये जनजागृती करण्यासाठी पोलीस अधीक्षक साहेब, अबिनाश कुमार व अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव, धिरज चव्हाण पो.स्टे. सायबर, नांदेड यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक मारोती चव्हाण, पोकॉ/ काशीनाथ कारखेडे यांनी उपस्थीत शिक्षकवृंद व विदयार्थ्यांना मार्गदर्शन केले आहे.
सदर कार्यशाळेला शाळेच्या मुख्याध्यापीका श्रीमती कुंरूमभटटे, श्रीमती दलजीतकौर, सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, नांदेड व सदस्य अॅड. चव्हाण सर, अॅड. भारकड मॅडम व शाळेचे शिक्षकवृंद व पालक व विद्यार्थी उपस्थीत होते. पोलीस अधीक्षक साहेब नांदेड यांनी आवाहन केले आहे की, आपल्या सोबत ऑनलाईन फसवणुक झाल्यास तात्काळ 1930 या सायबर क्राईम हेल्पलाईन नंबरवर कॉल करून आपले सोबत फ्रॉड झाल्याची सविस्तर माहिती देण्यात यावी. अथवा cybercrime.gov.in या वेबसाईटवर जावून आपले सायबर क्राईम फ्रॉडची तक्रार करावी.