Cyber Police : सायबर पोलीसातर्फे विदयार्थ्यासाठी सायबर जनजागृती कार्यशाळा संपन्न -NNL
नांदेड| सायबर पोलीस स्टेशन नांदेड यांच्या वतीने प्रतीभा निकेतन विदयालय श्रीनगर, नांदेड येथे विदयार्थ्यासाठी सायबर जनजागृती कार्यशाळा संपन्न झाली. यास विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
दिनांक 29/11/2024 रोजी विदयार्थ्यांमध्ये दिवसेंदिवस वाढत असलेला मोबाईलचा व सोशल मिडीयाचा वापर त्याचे दुष्परीनाम, ऑनलाईन फसवणूक, विविध प्रकारचे सायबर गुन्हे, माहिती तंत्रज्ञान अधिनियम, सायबरचा वापर करताना घ्यावयाची दक्षता व सुरक्षा, एखादा सायबर गुन्हा घडल्यास त्याबाबत कुठे तक्रार करावी या बाबतीत विदयार्थी व शिक्षक यांचेमध्ये जनजागृती करण्यासाठी पोलीस अधीक्षक साहेब, अबिनाश कुमार व अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव, धिरज चव्हाण पो.स्टे. सायबर, नांदेड यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक मारोती चव्हाण, पोकॉ/ काशीनाथ कारखेडे यांनी उपस्थीत शिक्षकवृंद व विदयार्थ्यांना मार्गदर्शन केले आहे.
सदर कार्यशाळेल...
