नांदेड| महाराष्ट्र शासनाचे सामजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय नांदेड यांच्यावतीने 26 नोव्हेंबर रोजी संविधान अमृत महोत्सव दिनानिमित्त घर-घर संविधान रॅली आयोजित करण्यात आली. शेकडो नागरिकांनी संविधान प्रस्ताविकेचे केलेले सामूहिक वाचन लक्षवेधी ठरले.
यानिमित्ताने गिरीष कदम , अतिरिक्त आयुक्त, मनपा नांदेड व संजय जाधव उपायुक्त, मनपा, श्रीमती सुप्रीया टवलारे, उपायुक्त मनपा,शिवानंद मिनगीरे, सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण नांदेड, सतेंद्र आऊलवार जिल्हा समाज कल्याण अधिकारी, डी.वाय पतंगे ,सहय्यक लेखाधिकारी तसेच अशोक गोडबोले, माधव जमदाडे व भिमराव हटकर,सामाजिक कार्यकर्ते नांदेड यांनी महात्मा ज्योतीबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
तद्नंतर गिरीष कदम , अतिरिक्त आयुक्त, शिवानंद मिनगीरे, सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण नांदेड यांनी हिरवी झेंडी दाखवून संविधान रॅलीची सुरुवात केली. सदर संविधान रॅलीचा मार्ग महात्मा ज्योतीबा फुले पुतळा ते शिवाजी नगर, कलामंदिर. मुथा चौक, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ संविधान प्रस्ताविकेचे सामुहिक वाचन करण्यात येवून राष्ट्र गीताने संविधान रॅलीची सांगता करण्यात आली. यावेळी मा.श्री शिवानंद मिनगीरे, सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, नांदेड यांनी भारतीय राज्यघटना ही जगातील सर्वश्रेष्ठ राज्य घटना असून जिल्हयातील सर्व नागरिकांनी त्याचा अभ्यास करावा व घटनेने दिलेल्या अधिकार व कर्तव्य त्यांचे पालन करावे असे मनोगत व्यक्त् केले.
सदर कार्यक्रमास सहाय्यक आयुक्त,समाजकल्याण नांदेड कार्यालयातील अधिकारी कर्मचारी ,जात पडताळणी कार्यालय अधिकारी कर्मचारी , जिल्हा समाज कल्याण जिल्हा परिषद नांदेडचे अधिकारी कर्मचारी तसेच इतर मगासव बहुजन कल्याण विभागाचे अधिकारी ,कर्मचारी, नांदेड जिल्हयतील विविध् महमंडळचे व्यवस्थापक व कर्मचारी तसेच शालेय विद्यार्थी, सामजिक कार्यकर्ते तसेच बार्टीचे प्रकल्प अधिकारी व समतादूत यांची उपस्थिती होती.
सदर संविधान रॅलीमध्ये पोलिस अधिक्षक कार्यालीयातील पोलिस बँड पथक ,कर्मचारी बँड पथक संच यांनी देशभक्ती गिते सादर केले तसेच सदर संविधान रॅली मध्ये, नांदेड जिल्हयातील एन.एस.बी महाविद्यालय नांदेड , सायन्स कॉलेज नांदेड ,नेहरु युवा केंद्र , विद्यार्थी सहभागी झाले होते व वसंतरावनाईक महाविद्यालय, जवाहरलाल नेहरु समाजकार्य महाविद्यालय, सायन्स कॉलेज मधील राष्ट्रीय सेवा योजना विद्यार्थी यांनी सहभाग नोंदविला सदर शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थी शिक्षक ,कर्मचारी तसेच इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या आश्रमशाळेतील कर्मचारी हे संविधान अमृत महोत्सव घर-घर संविधान रॅलीत सहभागी झाले होते. तसेच नांदेड जिल्हयातील नागरीकांची मोठया प्रमाणात उपस्थिती होती. सदर रॅलीची सांगता सविंधानाचे प्रस्ताविकाचे सामुहिक वाचन करुन करण्यात आली.