श्रीक्षेञ माहूर, कार्तिक बेहेरे| विधानसभा निवडणूक झाल्यानंतर महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. यात महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी पुन्हा एकनाथ शिंदे यांची निवड व्हावी व मा.खा.हेमंत पाटील हे नांदेडचे पालकमंञी व्हावे यासाठी शिंदेसेनेच्या पदाधीकार्यांनी व कार्यकर्त्यांनी माहूरगड येथे श्री रेणुका मातेला साकडे घातले आहे.यावेळी माहूर – किनवट येथील शिंदे सेनेच्या पदाधिकाऱ्यांचा सहभाग होता.
राज्यात विधानसभा निवडणूक नुकतीच पार पडली आहे. या निवडणुकीच्या निकालात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. यात भाजपच्या सर्वाधिक जागा निवडून आल्या आहेत. यामुळे मुख्यमंत्री भाजपचा करायचा कि एकनाथ शिंदे यांना पुन्हा मुख्यमंत्री पदावर बसवायचे याबाबत चर्चा सुरु आहे. शिवाय यामुळे सरकार स्थापन करण्यावर देखील अद्याप निर्णय होऊ शकलेला नाही.
त्यामुळे पुढचा मुख्यमंञी एकनाथ शिंदेच व्हावे व मा.खा.हेमंत पाटील हे नांदेडचे पालकमंञी व्हावे यासाठी शिंदे सेनेच्या कार्यकर्त्यांकडून दि.२७ नोव्हेबर रोजी साडे तीन शक्तीपीठा पैकी एक पीठ असलेल्या माहूरगड येथील श्री रेणुका मातेला महाआरती करुण प्रार्थना केली आहे.यावेळी शिदेसेनेचे माहूर ता.प्रमुख सुदर्शन नाईक,शहर प्रमुख विकास कपाटे,ज्योतिताई टिपकर,विनोद सुर्यवंशी,मनोज टिपकर,सुनिल गरड,विलास टिपकर,आरविंद जयस्वाल,आदेश लांडगे,विशाल चौधरी,विशाल चव्हाण,सोनु पाटील,ज्ञानेश्वर गुजलवाड,संजय जोशी,अनिकेत चव्हाण,आतुल खंजारे,पवन शर्मा,राणा हजारी,कैलास चव्हाण,दिलीप पवार,अनिल राठोड,रुपेश आराध्ये,वैभव जाधव यांची उपस्थिती होती.