नवीन नांदेड। माजलगाव जिल्हा बिड येथे सोनार समाजातील एका अल्पवयीन मुलीवर शिक्षकांनी लैगिक अत्याचार घटनेचा सिडको सराफ असोसिएशन यांच्या वतीने जाहीर निषेध व्यक्त करुन ग्रामीण पोलीस स्टेशन येथे संबधित आरोपीला तात्काळ अटक करून कार्यवाही करावी अशी मागणी पोलीस निरीक्षक ओमकांत चिचोलकर यांना निवेदनाद्वारे यांनी केली आहे.


माजलगाव शहरात सोनार समाजातील एका अल्पवयीन मुलीवर शिक्षकांनी लैंगीक अत्याचार केला त्या लि॑गपीसाट नराधमाचा स॑पुर्ण मराठवाडा सराफ सुवर्णकार फेडरेशन च्या वतीने जाहीर निषेध करण्यात येत आहे व त्या नराधमाला कडक शासन झालच पाहिजे त्याला फाशी देण्यात यावी म्हणून सर्व सोनार समाजातील बा॑धवानी आक्रमक भूमिका घेतली पाहिजे.


सर्व सोनार समाजातील बा॑धवानी जाहीर निषेध व्यक्त केला व संबंधित निवेदन ग्रामीण पोलीस ठाण्यात देण्यात आले, यावेळी सराफा असोशिएशन अध्यक्ष गिरीधर मैड,उपाध्यक्ष रितेश दहिवाल, सचिव गुरुप्रसाद डहाळे, भालचंद्र दिक्षित, प्रमोद शहाणे, सुरेश धानोरकर,दिपक टाक, अतुल धानोरकर, श्रीपाद डहाळे, नागनाथ शहाणे उपस्थित होते.




