नवीन नांदेड। ग्रामीण पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक पदाचा पदभार दंबग अधिकारी ओमकांत चिचोंलकर यांनी हद्दीत असलेल्या 39 गावांपैकी 28 गावात तंटामुक्त समिती, ग्राम रक्षक दल व व्यसन मुक्ती गाव समिती स्थापन करून जिल्ह्यातील ईतर पोलीस स्टेशन मध्ये आघाडी घेतली असून या समिती मार्फत गावातील दैनंदिन घडामोडी सह कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी मदत होणार असल्याचे पोलीस निरीक्षक ओमकांत चिचोलकर यांनी माहिती दिली.

ग्रामीण पोलीस स्टेशन येथे १ ऑक्टोबर रोजी पदभार घेतल्यानंतर सर्व प्रथम मुख्य बाजार पेठेतील भाजीपाला व हातगाडे केलेले अतिक्रमण तातडीने काढण्याचे आवाहन केल्यानंतर रस्ता मोकळा झाला तर नांदेड परिक्षेत्र उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी प्रत्येक गावात व्यसनमुक्ती गाव समिती स्थापन करून सहभागी होण्याचे आवाहन केले होते या समिती मध्ये एकुण 38 गावांपैकी जवळपास 28 गावानी समिती स्थापन करून सहभाग नोंदविला, तंटामुक्त गाव समिती ही स्थापना केली तर ग्राम रक्षक दल अशा तीन समिती स्थापन केल्या.

पोलीस स्टेशन येथे अंर्तगत असलेल्या इंजेगाव, धनेगाव, बोढांर तर्फे हवेली, सिधदनाथ, भायेगाव, वाडीपुयड, कल्लाळ, गंगा बेट, फतेजंगपुर, नागापूर, खुपसरवाडी, भनगी, पुणे गाव, गाढे गाव, पांगरी, बाभुळगाव हेमलातांडा, बळी रामपुर, वसरणी,मार्कंड, गुडेगांव, वडगाव, पिंपळगाव मिश्री, बाभुळगाव, काकांडी, तुप्पा,राहेगाव, वांगी, पिंपळगाव निमजी,गोपाळ चावडी, किक्की या गावाचा सहभाग आहे.

तर उर्वरित गावातही लवकरच समिती स्थापन होणार आहेत. या तिन्ही समिती मार्फत गावातील सामाजिक बांधिलकी व कायदा सुव्यवस्था अबांधित राहण्यासाठी व व्यसनमुक्ती समिती गाव पुढाकाराने व्यसन मुक्ती कडे वाटचाल होणार आहे, जिल्ह्यातील सर्वात जास्त व सर्व प्रथम मोठया प्रमाणात सहभागी होण्यासाठी ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत गावानी सहभाग नोंदवला आहे.
