Police omkant chincholkar ; ओमकांत चिचोलकर यांनी पदभार घेताच ग्रामीण पोलीस ठाण्यात तंटामुक्त समितीसह, ग्राम रक्षक दल व व्यसन मुक्ती गाव समिती स्थापन -NNL
नवीन नांदेड। ग्रामीण पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक पदाचा पदभार दंबग अधिकारी ओमकांत चिचोंलकर यांनी हद्दीत असलेल्या 39 गावांपैकी 28 गावात तंटामुक्त समिती, ग्राम रक्षक दल व व्यसन मुक्ती गाव समिती स्थापन करून जिल्ह्यातील ईतर पोलीस स्टेशन मध्ये आघाडी घेतली असून या समिती मार्फत गावातील दैनंदिन घडामोडी सह कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी मदत होणार असल्याचे पोलीस निरीक्षक ओमकांत चिचोलकर यांनी माहिती दिली.
ग्रामीण पोलीस स्टेशन येथे १ ऑक्टोबर रोजी पदभार घेतल्यानंतर सर्व प्रथम मुख्य बाजार पेठेतील भाजीपाला व हातगाडे केलेले अतिक्रमण तातडीने काढण्याचे आवाहन केल्यानंतर रस्ता मोकळा झाला तर नांदेड परिक्षेत्र उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी प्रत्येक गावात व्यसनमुक्ती गाव समिती स्थापन करून सहभागी होण्याचे आवाहन केले होते या समिती मध्ये एकुण 38 गावांपैकी जवळपास 28 गावानी समिती स्थापन करून सहभाग नोंदविला...
