नांदेड| नांदेड ग्रामीण पोलीसांची कामगीरी विश्वासघात करुन पळवुन घेवुन गेलेला टाटा कंपनीचा ट्रक (Tata company’s truck was seized from the accused) क्रमांक MH-24-AB-9595 किमंती 3,50,000/- रुपयाचा तोडुन भंगार मध्ये विक्री करण्यापुर्वी तेलंगणाचे आरोपी समीर खान शमशेर खान वय 25 वर्ष, व्यवसाय चालक रा. हनुमान मंडी वानकीडी ता. वानकीडी जि. असिफाबाद राज्य तेलंगणा याच्याकडुन जप्त करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे कि, अबिनाश कुमार, पोलीस अधिक्षक नांदेड. यांनी ऑपरेशन फ्लश आउट अंतर्गत गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश सर्व पो.स्टे. प्रभारी अधिकारी यांना दिले होते. त्या अनुषंगाने पोलीस स्टेशन नांदेड ग्रामीण, पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पो.स्टे. नांदेड ग्रामीण गु.र.नं. 34/2025 कलम 406 भा.द.वि. दाखल गुन्हयांत पोउपनि मटवाड व सोबत टिम यांनी तपासाचे चक्र फिरवुन आरोपी समीरखान शमशेरखान वय 25 वर्ष, व्यवसाय चालक रा. हनुमान मंडी वानकीडी ता. वानकीडी जि. असिफाबाद यांचा शोध घेवुन गुन्हयांतील विश्वास घात करुन नेलेला व लपवुन ठेवलेला ट्रकचे भंगार करुन विक्री करण्यापुर्वी टाटा कंपनीचा ट्रक क्रमांक MH-24-AB-9595 किमंती 3,50,000/- रुपयाचा हा जप्त करण्यात आला आहे. सदरची कामगीरी करणाऱ्या पथकाचे वरिष्ठांनी कौतुक केले आहे. नमुद गुन्हयांचा तपास पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर मटवाड हे करीत आहेत.

अबिनाश कुमार, पोलीस अधिक्षक, नांदेड, खंडेराव धरणे अपर पोलीस अधिक्षक, भोकर, सुरज गुरव, अपर पोलीस अधिक्षक, नांदेड, सुशील कुमार नायक, उपविभागीय पोलीस अधिकारी, उपविभाग, इतवारा, नांदेड यांच्या मार्गदर्शनाखाली ओमकांत चिंचोलकर, पोलीस निरीक्षक पो.स्टे. नांदेड ग्रामीण, ज्ञानेश्वर मटवाड, पोलीस उपनिरीक्षक, पो.स्टे. नांदेड ग्रामीण, पोलीस अमंलदारपाहेकॉ. गटलेवार, पोकों. जमीर अहमद, पोकॉ. धम्मपाल कांबळे पोकॉ. शेख आसीफ सर्व नेमणुक पो.स्टे. नांदेड ग्रामीण, पोहेकॉ. सिटीकर (सायबर सेल नांदेड पो.अ. कर्यालय नांदेड) यांनी हा गुन्हा उघडकीस आणण्यासाठी परिश्रम घेतला आहे.
