HomeनांदेडLok Adalat on 27th July | नांदेडमध्ये 27 जुलै रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे...

Lok Adalat on 27th July | नांदेडमध्ये 27 जुलै रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन – NNL

लोक अदालतीमध्ये प्रलंबित प्रकरणाचा निपटारा होण्यासाठी वाहनचालक - मालक यांनी उपस्थित राहावे –उप प्रादेशिक परिवहन अधिकारी

नांदेड| राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण नवी दिल्ली यांच्या आदेशान्वये महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, नांदेड तर्फे शनिवार 27 जुलै रोजी राष्ट्रीय लोकअदालतचे आयोजन करण्यात आले आहे. ही राष्ट्रीय लोकअदालत जिल्हा न्यायालय नांदेड व जिल्ह्यातील सर्व तालुका न्यायालयात तसेच कौटुंबिक न्यायालय, नांदेड येथे होत आहे.

या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये प्रलंबीत तडजोडपात्र फौजदारी प्रकरणे, दिवाणी, मोटार अपघात दावा, भूसंपादन, धनादेश अनादरीत झाल्याबाबची प्रकरणे, कौटूंबिक न्यायालयातील तडजोड प्रकरणे, ग्राहक तक्रार निवारण मंच, सहकार न्यायालय व कामगार न्यायालयातील प्रकरणे तडजोडीसाठी ठेवण्यात येणार आहेत. याशिवाय, या लोक अदालतीत दाखलपूर्व प्रकरणे जसे थकीत मालमत्ता कर, थकीत विद्युत बिल, थकीत टेलिफोन बिल, विविध बॅंकाचे कर्ज वसुली प्रकरणे, थकित पाणीबील इत्यादी प्रकरणे तडजोडीद्वारे निकाली काढण्यासाठी ठेवण्यात येणार आहेत.

या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये झालेल्या निवाड्याविरुध्द अपील नाही. प्रलंबीत प्रकरणात भरलेली कोर्ट फीची रक्कम 100 टक्के परत मिळते, नातेसंबंधात कटुता निर्माण होत नाही अशा प्रकारे लोक न्यायालयाच्या माध्यमातून सुलभ, जलद व मोफत न्याय मिळतो. तरी या राष्ट्रीय लोकअदालतीत मोठया संख्येने प्रकरणात तडजोड होण्यासाठी सर्वानी सहकार्य करावे असे आवाहन सुरेखा कोसमकर, नांदेड व न्यायाधीश श्रीमती डी.एम.जज, सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, नांदेड यांनी केले आहे. सर्व पक्षकारांनी येताना त्यांनी आपले अधिकृत ओळखपत्र घेवून येणे गरजेचे असुन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाने सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. तसेच सर्व संबंधित पक्षकारांनी दिनांक 27 जुलै रोजी होणाऱ्या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये प्रकरणे ठेवुन आलेल्या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

लोकअदालतीमध्ये प्रलंबित प्रकरणाचा निपटारा होण्यासाठी वाहनचालक – मालक यांनी उपस्थित राहावे –उप प्रादेशिक परिवहन अधिकारी
नांदेड जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्यावतीने शनिवार 27 जुलै 2024 रोजी लोकअदालतीचे आयोजन केले आहे. या लोकअदालत मध्ये प्रादेशिक परिवहन कार्यालयातील प्रलंबित प्रतिवेदन, ई-चालन यासंदर्भातील प्रलंबित प्रकरणाचा निपटारा करण्यासाठी करण्यात येणार आहे. तरी वाहनचालक – मालक यांनी या लोकअदालतीत उपस्थित राहावे आणि तडजोड पध्दतीने आपल्या वाहनासंबंधी प्रकरणाचा निपटारा करावा. प्रलंबित प्रकरणे निपटारा करण्यासाठी वाहन चालक-मालक यांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी नांदेड यांनी केले आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments