Lok Adalat on 27th July | नांदेडमध्ये 27 जुलै रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन – NNL
नांदेड| राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण नवी दिल्ली यांच्या आदेशान्वये महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, नांदेड तर्फे शनिवार 27 जुलै रोजी राष्ट्रीय लोकअदालतचे आयोजन करण्यात आले आहे. ही राष्ट्रीय लोकअदालत जिल्हा न्यायालय नांदेड व जिल्ह्यातील सर्व तालुका न्यायालयात तसेच कौटुंबिक न्यायालय, नांदेड येथे होत आहे.
या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये प्रलंबीत तडजोडपात्र फौजदारी प्रकरणे, दिवाणी, मोटार अपघात दावा, भूसंपादन, धनादेश अनादरीत झाल्याबाबची प्रकरणे, कौटूंबिक न्यायालयातील तडजोड प्रकरणे, ग्राहक तक्रार निवारण मंच, सहकार न्यायालय व कामगार न्यायालयातील प्रकरणे तडजोडीसाठी ठेवण्यात येणार आहेत. याशिवाय, या लोक अदालतीत दाखलपूर्व प्रकरणे जसे थकीत मालमत्ता कर, थकीत विद्युत बिल, थकीत टेलिफोन बिल, विविध बॅंकाचे कर्ज वसुली प्रकरणे, थकित पाणीबील इत्यादी प्रकरणे तडजोडीद्वार...
