Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त
  • Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ
  • 12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन
  • illegal sand mafia : हदगावात अवैध वाळू माफियांवर तहसील प्रशासनाचा धडाकेबाज प्रहार
  • Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?
  • railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - Chief Minister’s Relief Fund : मुख्यमंत्री सहाय्यता निधी ; गरजू रुग्णांसाठी जीवनदायी आधार !
नांदेड लेख August 7, 2025

Chief Minister’s Relief Fund : मुख्यमंत्री सहाय्यता निधी ; गरजू रुग्णांसाठी जीवनदायी आधार !

NNL TeamBy NNL TeamAugust 7, 20250
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

राज्यातील गरजू व पात्र रुग्णांना दुर्धर आजारांवरील उपचारासाठी मदत म्हणून मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष यांच्याकडून मदत करण्यात येत आहे. या कक्षाकडून मिळणारी मदत गरजू व पात्र रुग्णांच्या जीवनात आशेचा किरण ठरत असून, अनेक गरजू रुग्णांना या निधीच्या माध्यमातून मदतीचा ओघ दिवसेंदिवस वाढताना दिसून येत आहे.

नांदेड जिल्ह्यातही मागील सात महिन्यात 483 रुग्णांना 3 कोटी 99 लाख 49 हजार रुपयांचे अर्थसहाय्य मुख्यमंत्री सचिवालय, मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष, मंत्रालय मुंबई यांच्यामार्फत करण्यात आले. नुकताच नांदेड जिल्ह्यातील लोहा येथे राहणारा रंगनाथ संतराम पवार या 27 वर्षीय युवकाला अपघातात गंभीर झाल्यानंतर त्यांच्यावर शस्त्रक्रीया व उपचारासाठी 1 लाख रुपयांची मदत कक्षाकडून करण्यात आली आहे.

ही योजना गरजू पात्र रुग्णांसाठी खूप लाभदायक ठरत असून योग्य वेळी उपचारासाठी मदत तात्काळ करण्यात येत आहे. याबाबत रंगनाथ संतराम पवार यांच्या कुटूंबियानी या मदतीबाबत शासनाचे व मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाचे आभार मानले आहेत.

लोहा येथील रंगनाथ संतराम पवार हा युवक घरची दोन एकर शेती करुन छोटे मेडीकलचे दुकान चालवितो. दैनंदिन कामकाज करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवितो. अचानक काही दिवसांपूर्वी त्यांचा लोहा येथील शिवाजी चौक येथे त्यांच्या दुचाकीला अपघात होवून डोक्याला गंभीर दुखापत झाली. यामुळे कुटूंबियानी यांना तात्काळ नांदेड येथील यशोसाई क्रिटीकल केअर सेंटर रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल केले. उपचारासाठी रुग्णांला जास्तीचे पैसे लागणार होते. एवढे पैसे रंगनाथ पवार यांच्या कुटुंबाकडे नव्हते. रुग्णांच्या घरात त्यांच्याशिवाय कमविणारे दुसरे कोणीही नाही.

नातेवाईकांनी पैशांची जुळवाजुळव करुन बाकीच्या पैशासाठी त्यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाकडे मदतीसाठी अर्ज केला. या कक्षाकडे सर्व आवश्यक कागदपत्रांची पुर्तता केली व या युवकांच्या उपचारासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष, नांदेड यांच्याकडून 1 लाख रुपयांची आर्थीक मदत मिळाली अशी माहिती रुग्णांचे काका गोपाल पवार यांनी दिली. ही बाब आमच्यासाठी व आमच्या कुटूंबासाठी खूप समाधानकारक होती. या मदतीमुळे माझ्या पुतण्यावर यशस्वी उपचार करण्यात आल्याने तो आता सुखरुप आहे.

मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष नांदेड यांच्या मदतीमुळे माझ्यासारख्या अनेक गरजू रुग्णांना अडचणीच्या वेळी मदतीचा हा हात म्हणजे खूप मोठा आधार मिळत असल्याचे असल्यांचे रुग्णांच्या कुटूंबियांनी सांगितले. आमच्या सारख्या अल्पभुधारक शेतकऱ्यांच्या कुटूंबातील व्यक्तीला मोठा आजार, गंभीर अपघात झाल्यास अशा घटनेतून जीव वाचवण्यासाठी कुटुंबातील व्यक्तीना वेळप्रसंगी उसनवारी, घर, शेत गहाण टाकून पैशाची जुळवाजुळव करावी लागते. मात्र मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष नांदेड यांच्या मदतीमुळे आम्हाला उपचारासाठी 1 लाख रुपयांची जी मदत झाली, यामुळे आम्ही शासनाचे खूप आभारी आहोत असे रुग्णाच्या नातेवाईकांनी सांगितले. ही मदत अर्ज केल्यानंतर व कागदपत्रांची पूर्ण पुर्तता केल्यानंतर तात्काळ देण्यात आली याचेही समाधान त्यांनी व्यक्त केले.

राज्यभरात अशा अनेक गरजू रुग्णांना मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष वरदान ठरत आहेत. जिल्हास्तरावर हे मदत कक्ष स्थापन झाल्यामुळे जिल्ह्यातील गरजू रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना मुंबई मंत्रालय येथे जाण्याची आवश्यकता राहीली नाही. त्यांना आता आपल्या स्वत:च्या जिल्ह्यातच मदतीसाठी अर्ज करता येत आहे. तसेच प्रस्तावाची सद्यस्थिती येथेच पाहण्यास मिळत आहे.

या योजनेअंतर्गत कोणकोणत्या आजारावर मदत मिळते ?
कॉक्लियर इम्प्लांट, हृदय प्रत्यारोपण, यकृत प्रत्यारोपण, मूत्रपिंड प्रत्यारोपण, फुफ्फुस प्रत्यारोपण, अस्ती मज्जा प्रत्यारोपण, हाताचे प्रत्यारोपण, खुब्याचे प्रत्यारोपण, कर्करोग शस्त्रक्रिया, कर्करोग औषधोपचार किरणोपचार, अस्थिबंधन, नवजात शिशूंचे संबंधित आजार, गुडघ्याचे प्रत्यारोपण, रस्ते अपघात, लहान बालकांच्या संबंधित शस्त्रक्रिया,मेंदूचे आजार, हदयरोग, डायलिसिस, जळीत रुग्ण, विद्युत अपघात, विद्युत जळीत रुग्ण या आजारावर मदत मिळते.

मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी अर्ज कसा करावा ?
मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाच्या अधिकृत वेबसाइटवरून किंवा मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष जिल्हाधिकारी कार्यालयातून अर्ज मिळवता येतो. आवश्यक कागदपत्रांसह संपूर्ण तपशील भरावा. अर्ज मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष जिल्हाधिकारी कार्यालयात किंवा मंत्रालय मुंबई येथे ईमेलद्वारे aao.cmrf-mh@gov.in सादर करावा. त्यानंतर अर्ज प्राप्त झाल्यावर कागदपत्रांची व पात्रतेची पडताळणी करुन मंजुरीनंतर मदतीची रक्कम थेट रुग्णालयाच्या खात्यात जमा केली जाते.

…..अलका पाटील, उपसंपादक, जिल्हा माहिती कार्यालय, नांदेड

Chief Minister's Relief Fund Life-giving support for needy patients!
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleAundha Nagnath : जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्याकडून श्रीक्षेत्र औंढा नागनाथ तीर्थक्षेत्र विकास आराखड्याचा आढावा
Next Article Incidence of red rot : पावसामुळे नुकसान : लाल्या रोगाचा प्रादुर्भाव वाढला, शेतकरी चिंतेत
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन

illegal sand mafia : हदगावात अवैध वाळू माफियांवर तहसील प्रशासनाचा धडाकेबाज प्रहार

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Smt Sarubai Gadekar : श्रीमती सरुबाई गाडेकर यांचे वृद्धापकाळाने निधन -NNL

October 28, 2024

माळेगाव यात्रेत बहुमाध्यम प्रदर्शनाचे आयोजन -NNL

December 20, 2022

Meritorious students felicitated : सिडको भावसार समाजातर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार संपन्न -NNL

August 13, 2024

Dr. Geethali V.M. : स्त्री-पुरुष विषमता ही मानवी जगण्याची काळी बाजू – डॉ. गीताली वि.म.

January 19, 2025
Advertisement
टॉप बातम्या

Mundkar : सर्वांनाच सीमेवर जाऊनच देशसेवा करण्याची आवश्यकता नाही – मुंडकर

Dr. Sunil Jadhav : डॉ. सुनील जाधव यांना इंडोनेशियामध्ये दोन आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित

Venkatesh Chaudhary : प्रतिकूल परिस्थितीतही सकारात्मक राहून काम करावे – व्यंकटेश चौधरी -NNL

Gangaprasad Mudiraj ; गंगाप्रसाद मुदिराज पदोन्नती मिळाल्याबद्दल सुंडगी गावकऱ्यांच्या वतीने सत्कार

Blood donation : भाजपा महानगरच्या वतीने मुख्यमंत्री फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित रक्तदान शिबीर

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026

profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?