Chief Minister’s Relief Fund : मुख्यमंत्री सहाय्यता निधी ; गरजू रुग्णांसाठी जीवनदायी आधार !
राज्यातील गरजू व पात्र रुग्णांना दुर्धर आजारांवरील उपचारासाठी मदत म्हणून मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष यांच्याकडून मदत करण्यात येत आहे. या कक्षाकडून मिळणारी मदत गरजू व पात्र रुग्णांच्या जीवनात आशेचा किरण ठरत असून, अनेक गरजू रुग्णांना या निधीच्या माध्यमातून मदतीचा ओघ दिवसेंदिवस वाढताना दिसून येत आहे.
नांदेड जिल्ह्यातही मागील सात महिन्यात 483 रुग्णांना 3 कोटी 99 लाख 49 हजार रुपयांचे अर्थसहाय्य मुख्यमंत्री सचिवालय, मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष, मंत्रालय मुंबई यांच्यामार्फत करण्यात आले. नुकताच नांदेड जिल्ह्यातील लोहा येथे राहणारा रंगनाथ संतराम पवार या 27 वर्षीय युवकाला अपघातात गंभीर झाल्यानंतर त्यांच्यावर शस्त्रक्रीया व उपचारासाठी 1 लाख रुपयांची मदत कक्षाकडून करण्यात आली आहे.
ही योजना गरजू पात्र रुग्णांसाठी खूप लाभदायक ठरत असून योग्य वेळ...
