Friday, May 15

Tag: Chief Minister’s Relief Fund

Chief Minister’s Relief Fund : मुख्यमंत्री सहाय्यता निधी ; गरजू रुग्णांसाठी जीवनदायी आधार !

Chief Minister’s Relief Fund : मुख्यमंत्री सहाय्यता निधी ; गरजू रुग्णांसाठी जीवनदायी आधार !

नांदेड, लेख
राज्यातील गरजू व पात्र रुग्णांना दुर्धर आजारांवरील उपचारासाठी मदत म्हणून मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष यांच्याकडून मदत करण्यात येत आहे. या कक्षाकडून मिळणारी मदत गरजू व पात्र रुग्णांच्या जीवनात आशेचा किरण ठरत असून, अनेक गरजू रुग्णांना या निधीच्या माध्यमातून मदतीचा ओघ दिवसेंदिवस वाढताना दिसून येत आहे. नांदेड जिल्ह्यातही मागील सात महिन्यात 483 रुग्णांना 3 कोटी 99 लाख 49 हजार रुपयांचे अर्थसहाय्य मुख्यमंत्री सचिवालय, मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष, मंत्रालय मुंबई यांच्यामार्फत करण्यात आले. नुकताच नांदेड जिल्ह्यातील लोहा येथे राहणारा रंगनाथ संतराम पवार या 27 वर्षीय युवकाला अपघातात गंभीर झाल्यानंतर त्यांच्यावर शस्त्रक्रीया व उपचारासाठी 1 लाख रुपयांची मदत कक्षाकडून करण्यात आली आहे. ही योजना गरजू पात्र रुग्णांसाठी खूप लाभदायक ठरत असून योग्य वेळ...
Chief Minister’s Relief Fund : मुख्यमंत्री सहाय्यता निधी ठरतेय रुग्णांसाठी नवसंजीवनी !

Chief Minister’s Relief Fund : मुख्यमंत्री सहाय्यता निधी ठरतेय रुग्णांसाठी नवसंजीवनी !

नांदेड, लेख
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून राज्यातील गरजू व पात्र नागरिकांना दुर्धर आजारांवरील उपचारासाठी मदत मिळावी यासाठी जिल्हास्तरावर मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाची स्थापना केली आहे. या कक्षाकडून रुग्णांना आर्थिक सहाय्य तसेच आपत्ती प्रसंगी आर्थिक मदत देण्यात येते. पुर्वी राज्यातील कानाकोपऱ्यातून मदत मिळविण्यासाठी नागरिक मंत्रालयात जात होते. नागरिकांना या सेवा सहजपणे त्यांच्या जिल्ह्याच्या ठिकाणी उपलब्ध व्हाव्यात, रुग्णांना वैद्यकीय उपचाराकरीता अर्थसहाय्य सहज उपलब्ध व्हावे, मुख्यमंत्री सहायता निधीच्या प्रकरणाची माहिती नागरिकांना आपल्या जिल्ह्यातच व्हावी यासाठी राज्यातील सर्व जिल्ह्याच्या ठिकाणी मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाची सुरवात करण्यात आली आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष पात्र व गरजु रुग्णांसाठी वरदान ठरत असून 1 जानेवारी ते 30 जून 2025 या कालावधी...
Chief Minister’s Relief Fund : मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष गरजू रुग्णांसाठी ठरतोय वरदान

Chief Minister’s Relief Fund : मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष गरजू रुग्णांसाठी ठरतोय वरदान

आरोग्य, नांदेड
नांदेड| मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष पात्र व गरजु रुग्णांसाठी वरदान ठरत आहे. 1 जानेवारी ते 30 जून 2025 या कालावधीत मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षातून नांदेड जिल्ह्यात 385 रुग्णांना 3 कोटी 31 लाखांची मदत देण्यात आली. दिवसेंदिवस मदतीमध्ये वाढ होत आहे. गरजू रुग्णांना वेळेत मदत मिळावी, यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. संवेदनशील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनातून जिल्हा स्तरावर कक्ष उपलब्ध झाल्याने रुग्णांना मोठा दिलासा मिळत आहे असे रामेश्वर नाईक, कक्ष प्रमुख, मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष यांनी सांगितले. राज्यातील नागरिकांना दुर्धर आजारांवरील उपचारासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाकडून आर्थिक सहाय्य देण्यात येते. तसेच आपत्ती प्रसंगीही आर्थिक मदत देण्यात येते. यासाठी राज्यातील कानाकोपऱ्यातून मदत मिळविण्या...
Guardian Minister Atul Save : मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मादाय रुग्णालय जिल्हास्तरीय मदत कक्षाचे पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते उद्घाटन

Guardian Minister Atul Save : मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मादाय रुग्णालय जिल्हास्तरीय मदत कक्षाचे पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते उद्घाटन

नांदेड, आरोग्य
नांदेड| मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मादाय रुग्णालयांमार्फत नागरिकांना द्यावयाच्या मदतीसाठी कार्य करणाऱ्या जिल्हास्तरीय मदत कक्षाचे आज राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण, दुग्धाविकास, अपारंपारिक ऊर्जा मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते उद्घाटन झाले. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात हा कार्यक्रम पार पडला. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील प्रशिक्षण भवनच्या इमारतीत हा कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे. यावेळी माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण, खासदार रविंद्र चव्हाण, खासदार डॉ. अजित गोपछडे, आमदार राजेश पवार, आमदार जितेश अंतापूरकर, जिल्हाधिकारी राहुल कर्डीले, अपर जिल्हाधिकारी पी.एस.बोरगावकर, निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर, जिल्हा आरोग्य अधिकारी...
error: Content is protected !!