नांदेडमहाराष्ट्र

Devkrupa Goshalales Work Remarkable ; देवकृपा गोशाळेचे कार्य महाराष्ट्रात उल्लेखनीय आहे – जयेशभाई शाह

हिमायतनगर,अनिल मादसवार। तालुक्यातील मौजे पवना येथील देवकृपा गोशाळेचे प्रमुख किरण बिच्चेवार आणि त्यांचे कार्यकर्ते अतिशय प्रतिकुल परिस्थितीचा सामना करत आपला जिव धोक्यात घालून गोरक्षणाची चळवळ चालवत आहेत. अशाप्रकारचे काम सबंध महाराष्ट्रात पहावयास मिळत नाही. आम्ही बिच्चेवार यांच्या गोसेवेच्या व गोरक्षेच्या कार्यासाठी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. असे गौरउदगार जयेशभाई शाह यांनी काढले.

ते हिमायतनगर तालुक्यातील गोशाळेच्या शेडच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. यावेळी श्री परमेश्वर मंदिर ट्रस्टचे उपाध्यक्ष महावीरचंद श्रीश्रीमाळ, आ हेमंत पाटील यांचे पिआरओ गोविंद गोडसेलवार, गजानन मांगूळकर, लिंगमपल्ले आदींसह अनेक मान्यवर व पत्रकार नागरिक उपस्थित होते. यावेळी बोलताना उद्धवजी नेरकर, सदस्य, गोसेवा आयोग महाराष्ट्र राज्य यांनी सांगितले की, नांदेड जिल्ह्यामध्ये किरण बिच्चेवार यांनी सुरू केलेली अलौकीक गोरक्षणाची लढाई आज महाराष्ट्रात “नांदेड पॅटर्न ” म्हणुन लवकरच नावारूपाला आलेली पहावयास मिळेल असे सांगितले. गोसेवा आयोग सदैव किरण बिच्चेवार यांच्या सोबत असुन ते अतिशय चिकाटीने कायद्याच्या चौकटीत राहुन गोरक्षणाचे कार्य करतात. त्यांचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक गोरक्षक कार्यकर्त्यांचे विमा संरक्षण गोसेवा आयोग लवकरच करणार असल्याचे ते म्हणाले.

IMG 20250203 WA0018 Devkrupa Goshalales Work Remarkable ; देवकृपा गोशाळेचे कार्य महाराष्ट्रात उल्लेखनीय आहे - जयेशभाई शाह

भाऊरावजी कुदळे, क्षेत्र गोरक्षा प्रमुख, विश्व हिंदु परिषद यांनी सांगितले. सर्व शेतकऱ्यांनी आपल्या गोवंशाचा अखेरपर्यंत सांभाळा केला पाहिजे, गोवंश हे आपले खरे धन असून, आज शेणखताला मोठ्या प्रमाणावर मागणी वाढत आहे. आणि त्या तुलनेमध्ये बाजारात शेणखत मिळत नाही, भविष्यात शेण चोरीला जाईल अशी परिस्थिती निर्माण होणार आहे. गोवंशावर आधारित शेती चा प्रचार आणि प्रसार गावागावात झाला पाहिजे. जेणेकरून आपल्याकडील अनमोल गोवंशाचा ठेवा कसायांच्या हाती लागणार नाही.

पोलीस आमचे दुश्मन नाहीत त्यांनी स्वयंस्फुर्तपणे कायद्याची अंमलबजावणी करावी. तसेच कसाई देखील आमचे दुश्मन नाहीत त्यांनी गोहत्तेचा धंदा बंद करून इतर धंद्याचा स्वीकार करावा असे झाले तर संघर्ष होणारच नाहीत. गोरक्षा करण्यापेक्षा गोरक्षणातुन वाचवलेल्या प्राण्यांचे संगोपन करणे खूप खर्चिक झालेले आहे. एवढी मोठी जबाबदारी पार पाडताना किरणला झोप कशी लागते की, असा मला प्रश्न पडला आहे. त्यामुळे आपण सर्वांनी किरण बिच्चेवार यांच्या पाठीशी उभे टाकले पाहिजे. यावेळी यवतमाळ, लातुर, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यातील गोशाळा संचालक, गोरक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात किरण बिच्छेवार म्हणाले की, आधीजीन युवक चॅरिटेबल ट्रस्ट मुंबई यांची गोशाळेच्या यशामध्ये मोठी भुमिका राहिली आहे. आजपर्यंत आमच्या गोशाळेला मोठे चारा गोदाम, संपुर्ण गोशाळेला कंपाऊंड, मोठे चाप कटर, अभयदान , रिपर आणि वेळोवेळी चाऱ्यासाठी आमच्या मदतीला आदिजीन युवक चॅरिटेबल ट्रस्ट धावुन आलेली आहे. आदी जीन युवक चॅरिटेबल ट्रस्टच्या प्रयत्नातून 60 बाय 100 आकाराच्या शेडचे अनावरण आपणा सर्वांच्या साक्षीने संपन्न होत आहे. श्री आदी जिन युवक चॅरिटेबल ट्रस्ट मुंबई ही संस्था महाराष्ट्र गुजरात मधील तळागाळातल्या गोशाळांना सढळ हाताने मदत करून गो सेवेच्या कार्यास प्रोत्साहन देणारी महाराष्ट्रातली एकमेव मोठी संस्था आहे.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!