Saturday, July 4

नांदेड

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

नांदेड जिल्ह्यात पाच वर्षांच्या चिमुकलीला चॉकलेटचे अमिष दाखवून अत्याचार; गुन्हा दाखल -NNL

नांदेड जिल्ह्यात पाच वर्षांच्या चिमुकलीला चॉकलेटचे अमिष दाखवून अत्याचार; गुन्हा दाखल -NNL

क्राईम, नांदेड
नायगाव/नांदेड। जिल्ह्यातील नायगाव येथे एका पाच वर्षांच्या चिमुरडीला चॉकलेटचे अमिष दाखवून दुकानात अत्याचार करणा-या नराधमाविरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपी दुकानदारास अटक करण्यात आली आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, नांदेड जिल्ह्यातील नायगाव तालुक्यातील मौजे मरवाळी परिसरात गुरुवार दिनांक 06 रोजी एका पाच वर्षांच्या चिमुरडीला चॉकलेटचे अमिष दाखवून दुकानात अत्याचार केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी महेबुब उर्फ सोहेल मुस्तपा शेख या नराधमाला शनिवारी दिनांक 8 रोजी ताब्यात घेण्यात आले आहे. नायगावातील मरवाळी येथील महेबुब शेख याच्या दुकानात निरमा पुडा घेण्यासाठी पाच वर्षीय चिमुरडी आली होती. यावेळी तिला चॉकलेट देतो, म्हणून या नराधमाने दुकानाच्या आत बोलवले. आणि तिच्यावर अत्याचार केला. चिमुरडीने या घटनेबद्दल नातेवाईकांना सांगितले. पीडी5चिमिकलीचे वडील बाहेरगावी असल्याने कु...
माहूर तालुक्यात कपाशी बियाणे व कीटकनाशकांची चढ्या दराने विक्री करणाऱ्या कृषी संचालकांवर कारवाई करा -NNL

माहूर तालुक्यात कपाशी बियाणे व कीटकनाशकांची चढ्या दराने विक्री करणाऱ्या कृषी संचालकांवर कारवाई करा -NNL

नांदेड
श्रीक्षेत्र माहूर, राज ठाकूर। माहूर तालुक्यात कपाशी बियाण्याची व कीटकनाशकाची चढ्या दराने विक्री करून शेतकऱ्यांची फसवणूक होत असल्याने शेतकऱ्यांची लुट करणाऱ्या कृषी दुकानावर कारवाया करावी अन्यथा दि. १०/०६/२०२४ रोजी सकाळी १० वा. किनवट माहूर रोडवरील वाई बा.फाटा येथे रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा माहूर तालुका गोरसेनेच्या वतीने तालुका कृषी अधिकारी बालाजी मुंडे यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांची खरीप लागवडीची लगबग सुरु झाली असून शेतकरी बि बियाणे खरेदी करता बाजारात गर्दी करीत आहेत. काही बियाणे वाणास व औषधीस शेतकरी जास्त पसंती देत असल्याने ज्या कपाशी बियाण्याच्या वाणास कीटक नाशकास शेतकऱ्यांची जास्त पसंती त्या वाणाचा कृषी साहित्य विक्रेते जाणीवपूर्वक तुटवडा निर्माण करत असून प्रती पॉकेटवर १००० ते १५०० रुपया पर्यत जास्त मोबदला दिल्यास उपलब्ध करून देत आहेत. शेतकऱ्यांना म...
हदगाव, हिमायतनगर विधानसभा मतदारसंघात आमदार जवळगावकर विरुद्ध कोहळीकर यांच्यात होणार लढत !  NNL

हदगाव, हिमायतनगर विधानसभा मतदारसंघात आमदार जवळगावकर विरुद्ध कोहळीकर यांच्यात होणार लढत ! NNL

नांदेड
हिमायतनगर, दत्ता शिराणे| लोकसभा निवडणूकी नंतर आता विधान सभा निवडणुकीची चर्चा होत असून, लोकसभेच्या निवडणुकीत पराभूत झालेले बाबुराव कदम कोहळीकर हे विधान सभेच्या निवडणूकीत उतरणार हे आता जवळपास फिक्स असल्याने आमदार माधवराव पाटील जवळगावकर व कोहळीकर यांच्यातच सत्ता संघर्ष झालेला पहावयास मिळणार असून, ऑक्टोबर मध्ये विधान सभेच्या निवडणूका होणार असल्याने आतापासूनच या निवडणूकीची जोरदार चर्चा होत आहे. महाराष्ट्रात लोकसभेच्या निवडणूका काँग्रेस राष्ट्र वादी शरद पवार गट शिवसेना उद्धव ठाकरे गट महाविकास आघाडी व तसेच भाजप शिवसेना शिंदे गट, राष्ट्र वादी अजित पवार गट व इतर मित्र पक्ष महायुतीकडून एकत्र लढल्या गेल्या, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात जनमत गेल्याने महाराष्ट्रात आघाडीला सुगीचे दिवस पहावयास मिळाले असून, महायुतीला उतरती कळा लागली असल्याचे चित्र राज्यात पहावयास मिळाले. लोकसभे प्रमाणे विधान ...
नवोन्‍मेष आणि सामर्थ्‍यांचे प्रतिक: वर्षा ठाकूर-घुगे NNL

नवोन्‍मेष आणि सामर्थ्‍यांचे प्रतिक: वर्षा ठाकूर-घुगे NNL

नांदेड, लातूर, लेख
लातूरच्या जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांचा दिनांक 10 जून रोजी वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने मिलिंद व्यवहारे यांचा लेख वाचकांसाठी प्रकाशित करत आहोत. विकासाचा केंद्रबिुंदू मानून जिल्‍हाधिकारी वर्षा ठाकूर यांनी विविध कामाच्‍या माध्‍यमातून लातूर जिल्‍हयाला नवा आयाम दिला आहे. जिल्‍हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी आखून दिलेल्‍या कामामध्‍ये अधिकारी आणि कर्मचारी उत्साहाने काम करतात, त्‍यामुळे कामकाजाला गती मिळते. लातूर जिल्ह्याच्या 40 वर्षाच्या प्रशासकीय कारभारात जिल्हाधिकारी म्हणून प्रथमच एका महिलेच्या हाती कारभार देण्यात आला आहे. कर्ता चांगला असेल तर प्रगतीचा मार्ग गतिमान होतो, हे जिल्‍हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी लातूरकरांना दाखवून दिले आहे. वर्षा ठाकूर-घुगे ह्या दिनांक 23 जुलै 2023 रोजी जिल्‍हाधिकारी म्‍हणून लातूर जिल्‍हाधिकारी कार्यालयात रुजू झाल्‍या. त्‍यांनी आपल्‍या कामाच्‍या माध्‍यम...
हिमायतनगरात कुत्र्याच्या तावडीतून शेतकरी युवकाने वाचविले हरणाच्या पाडसाचे प्राण – NNL

हिमायतनगरात कुत्र्याच्या तावडीतून शेतकरी युवकाने वाचविले हरणाच्या पाडसाचे प्राण – NNL

नांदेड
हिमायतनगर,अनिल मादसवार| हिमायतनगर शहरापासून ४ किमी अंतरावर असलेल्या बोरि/घारापूर शिवारात दि.०६ रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास कुत्र्याच्या तावडीत सापडलेल्या हरणाच्या पाडसावर प्रथमोपचार करून वनविभागाच्या स्वाधीन करण्यात आले आहे. शेतकऱ्याची समयसूचकतेमुळे चिमुकल्या हरणाच्या पाडसाला जीवदान मिळाले आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे कि, दि.०६ शनिवारी सकाळी तालुक्यातील राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या सरसम वनपरिक्षेत्राच्या बोरि/घारापूर परिसरात सकाळच्या प्रहरी हरणांचे कळप फिरत होते. दरम्यान कळप पुढे गेल्याने चिमुकलं हरणाचा पाडस पाठीमागे राहिले. त्या पाडसाचा परिसरातील कुत्र्यांनी पाठलाग सुरु केला जीवाच्या आकांताने पाडस सैरावैरा पळत सुटले. मात्र कुत्र्यांनी पाडसावर हल्ला करून जखमी केले. हा प्रकार युवा शेतकरी संतोष देवराय माने यांच्या लक्षात येताच त्यांनी कुत्र्याच्या तावडीतून हरणाचा पाडसाची सुटका केली. ...
नांदेडच्या विमानतळ ठाणे हाद्दीतील लक्ष्मीनगर भागात 8,27,000/- रुपयाचा 41.350 किलो गांजा जप्त -NNL

नांदेडच्या विमानतळ ठाणे हाद्दीतील लक्ष्मीनगर भागात 8,27,000/- रुपयाचा 41.350 किलो गांजा जप्त -NNL

क्राईम, नांदेड
नांदेड। जिल्हयात गांजा विक्री करण्याचे प्रमाण वाढल्याने या प्रकारचे गुन्हे करणारे गुन्हेगार यांचा शोध घेवून कार्यवाही करणे कामी पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी स्थानीक गुन्हे शाखा नांदेड येथील पोलीस निरीक्षक यांना आदेश दिले होते. त्यावरून आज विमानतळ ठाणे हाद्दीतील लक्ष्मीनगर भागात छापा टाकला असता 8,27,000/- रुपयाचा 41.350 किलो गांजा स्थानीक गुन्हे शाखेच्या पथकाने जप्त केला आहे. या घटनेमुळे गांजा तस्करात खळबळ उडाली आहे. स्थानीक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री उदय खंडेराय यांनी त्यांचे शाखेतील पोउपनि श्री आनंद बिचेवार यांची टिम तयार करुन नांदेड शहरात गांजा विक्री करणारे व्यक्ती विरुध्द कायदेशीर कार्यवाही करण्याचे आदेश दिले होते. आनंद बिचेवार पोउपनि स्थागुशा यांचे टिम नांदेड शहरात गोपनिय माहीतगार यांचे कडुन माहीती घेवुन आज दिनांक 08/06/2024 रोजी राजपत्रीत अधिकारी श्री एम.डब्लु. दिगल...
पत्रकार दिलीप शिंदे यांच्या’झळा पावसाळा’ आत्मकथनाचे आज प्रकाशन

पत्रकार दिलीप शिंदे यांच्या’झळा पावसाळा’ आत्मकथनाचे आज प्रकाशन

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड। पत्रकार दिलीप शिंदे यांच्या 'झळा पावसाळा' या आत्मकथनाचे आज सायंकाळी माजी कुलगुरू डॉ. सुधीर गव्हाणे यांच्या हस्ते प्रकाशन होणार आहे. यावेळी निवृत्त विभाग प्रमुख प्रा. सुरेश पुरी, प्रा गणी पटेल , ज्येष्ठ साहित्यिक देविदास फुलारी यांची प्रमुख उपस्थिती रहाणार आहे. पिपल्स महाविद्यालयाच्या स्व.नरहर कुरुंदकर सभागृहात सायंकाळी साडेपाच वाजता प्रकाशन सोहळा होणार आहे. अविरत प्रकाशनचे प्रकाशक डॉ. देवदत्त देशपांडे यांनी ही माहिती दिली. मागील पंचवीस वर्षांपासून पत्रकार दिलीप शिंदे प्रसार माध्यमात कार्यरत आहेत. दै. नांदेड सांज, आकाशवाणी तसेच आधुनिक यूट्यूब माध्यमातून त्यांनी पत्रकारिता केली आहे. सामान्य कुटुंबातून येऊन माध्यमात आपली वेगळी ओळख त्यांनी निर्माण केली आहे. झळा पावसाळा या आत्मकथनातून त्यांनी पंचवीस वर्षातील गोड कटू अनुभव मांडले आहेत. बोली भाषेतुन कथानकाच्या स्वरूपातील लेखन हे ...
गावठी पिस्टेल बाळगून विक्री करणाऱ्या तीन गुन्हेगारांना वाजीराबाद गुन्हे शोध पथकाने केली 1लक्ष 22हजार 500 रुपयांच्या मुद्देमालासह अटक -NNL

गावठी पिस्टेल बाळगून विक्री करणाऱ्या तीन गुन्हेगारांना वाजीराबाद गुन्हे शोध पथकाने केली 1लक्ष 22हजार 500 रुपयांच्या मुद्देमालासह अटक -NNL

क्राईम, नांदेड
नांदेड। गावठी पिस्टल बाळगुन तीची विक्री करणाऱ्या तीन गुन्हेगारांना वजीराबाद गुन्हे शोध पथकाने तीन गावठी पिस्टल, 05 जिवंत काडतुस असा एकुण 1,22,500/- रुपयाचा ऐवजसह अटक केली आहे, पोलिसांच्या धडाकेबाज कार्यवाही बद्दल सर्व स्तरातील नागरिकांतून अभिनंदन केले जाते आहे. नांदेड जिल्हयामध्ये गुन्हेगारी कृत्यांना आळा घालण्याचे दृष्टीने ) श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधिक्षक, नांदेड, अविनाश कुमार, अपर पोलीस अधिक्षक, नांदेड, किरतीका एम.एस. सहाय्यक पोलीस अधिक्षक, उप विभाग, नांदेड शहर, ) सुशीलकुमार नायक, उप विभागीय पोलीस अधिकारी, उप विभाग ईतवारा नांदेड यांनी नांदेड शहरातील गुन्हे शोध पथकाचे अधिकारी व अंमलदार यांना रेकॉर्डवरील गुन्हेगारांच्या हालचालीवर लक्ष देऊन त्यांना नियमीतपणे चेक करण्याच्या सुचना दिल्या होत्या. सदर सुचनांचे अनुषंगाने आज दिनांक 07.06.2024 रोजी परमेश्वर कदम, पोलीस निरीक्षक, पोलीस ठाणे व...
खुरगावला महिलांच्या श्रामणेर प्रशिक्षण शिबिरास सुरुवात; २८ बौद्ध उपासक, उपासिकांना श्रामणेर दीक्षा

खुरगावला महिलांच्या श्रामणेर प्रशिक्षण शिबिरास सुरुवात; २८ बौद्ध उपासक, उपासिकांना श्रामणेर दीक्षा

नांदेड
नांदेड| येथील ऋषिपठण बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचलित खुरगाव नांदुसा परिसरातील श्रामणेर प्रशिक्षण केंद्रात दसदिवशीय महिलांच्या श्रामणेर प्रशिक्षण शिबीरास प्रारंभ झाला असून अखिल भारतीय भिक्खू संघाचे जिल्हाध्यक्ष तथा धम्मगुरु संघनायक भदंत पंयाबोधी थेरो, श्रीलंकेच्या भिक्खूनी आर्याजी उपलवन्ना तसेच आर्याजी प्रजापती यांनी एकूण २८ बौद्ध उपासक, उपासिकांना श्रामणेर दीक्षा दिली. यात दहा महिलांचा समावेश आहे. सदरील शिबिर १९ जूनपर्यंत चालणार असल्याची माहिती भदंत पंयाबोधी थेरो यांनी दिली. यावेळी भिक्खू संघासह उपप्राचार्य साहेबराव इंगोले, इंजि. भरतकुमार कानिंदे, विपश्यनाचार्य गौतम भावे, रत्नमाला भावे, माया पाईकराव, प्रा. यशवंत पाईकराव, डॉ. प्रतिक्षा कोल्हे, दिनेश कोल्हे, सिद्धांत इंगोले, अपेक्षा इंगोले, प्रज्ञाधर ढवळे, आप्पाराव नरवाडे, नागोराव नरवाडे आदींची उपस्थिती होती. तालुक्यातील खुरगाव नांदुसा...
अनु. जाती व जमातीच्या शेतकऱ्यांसाठी योजनाच्या माहितीबाबत विशेष मेळाव्यांचे आयोजन -NNL

अनु. जाती व जमातीच्या शेतकऱ्यांसाठी योजनाच्या माहितीबाबत विशेष मेळाव्यांचे आयोजन -NNL

नांदेड
नांदेड| कृषि विभागामार्फत एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान व प्रधानमंत्री कृषि सिंचन योजना  अंतर्गत अनु. जाती व अनु. जमातीच्या शेतकऱ्यांसाठी तालुका स्तरावर या 6 जून ते 20 जून 2024 या पंधरवड्यात विशेष मेळाव्यांचे आयोजन करण्यात येत आहेत. जिल्ह्यातील अनु. जाती व अनु. जमाती संवर्गातील शेतकऱ्यांसाठी लक्षांक उपलब्ध असून या योजनेअंतर्गत लक्षांकापेक्षा कमी अर्ज प्राप्त झालेले आहे. तरी जिल्ह्यातील अनु. जाती व अनु. जमातीच्या जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनांचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी नजीकच्या तालुका कृषि अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे यांनी केले आहे. कृषि विभागामार्फत तालुकास्तरावर आयोजित मेळाव्यामध्ये एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान  व प्रधानमंत्री कृषि सिंचन योजने अंतर्गत लाभ देण्यात येणाऱ्या विविध घटकांची माहिती देण्यात येणार आहे. ...
error: Content is protected !!