Homeक्राईमनांदेडच्या विमानतळ ठाणे हाद्दीतील लक्ष्मीनगर भागात 8,27,000/- रुपयाचा 41.350 किलो गांजा जप्त...

नांदेडच्या विमानतळ ठाणे हाद्दीतील लक्ष्मीनगर भागात 8,27,000/- रुपयाचा 41.350 किलो गांजा जप्त -NNL

नांदेड। जिल्हयात गांजा विक्री करण्याचे प्रमाण वाढल्याने या प्रकारचे गुन्हे करणारे गुन्हेगार यांचा शोध घेवून कार्यवाही करणे कामी पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी स्थानीक गुन्हे शाखा नांदेड येथील पोलीस निरीक्षक यांना आदेश दिले होते. त्यावरून आज विमानतळ ठाणे हाद्दीतील लक्ष्मीनगर भागात छापा टाकला असता 8,27,000/- रुपयाचा 41.350 किलो गांजा स्थानीक गुन्हे शाखेच्या पथकाने जप्त केला आहे. या घटनेमुळे गांजा तस्करात खळबळ उडाली आहे.

स्थानीक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री उदय खंडेराय यांनी त्यांचे शाखेतील पोउपनि श्री आनंद बिचेवार यांची टिम तयार करुन नांदेड शहरात गांजा विक्री करणारे व्यक्ती विरुध्द कायदेशीर कार्यवाही करण्याचे आदेश दिले होते. आनंद बिचेवार पोउपनि स्थागुशा यांचे टिम नांदेड शहरात गोपनिय माहीतगार यांचे कडुन माहीती घेवुन आज दिनांक 08/06/2024 रोजी राजपत्रीत अधिकारी श्री एम.डब्लु. दिगलवार, नायब तहसीलदार नांदेड, श्री उदय खंडेराय, पोलीस निरीक्षक, स्था.गु.शा. नांदेड व श्री गणेश चव्हाण पो.स्टे. विमानतळ सह महेबुबनगर जवळ लक्ष्मी नगर बायपास रोड नांदेड या भागात एका घरात विक्रीसाठी गांजा ठेवल्याची मिळालेल्या माहीती प्रमाणे सदर ठिकाणी छापा टाकला.

यावेळी इसम नामे 1. अहेमदखान पि. अनवरखान वय 28 वर्षे व्यवसाय बेकार रा. रहीमनगर देगलुर नाका नांदेड व 2. शेख अकत्तरी बेगम भ्र. शेख मिया वय 55 वर्षे व्यवसाय घरकाम रा. महेबुबनगर जवळ लक्ष्मीनगर बायपास रोड नांदेड ता.जि. नांदेड यांना पकडुन त्यांचे घरातुन एकुण 41.350 किलो गांजा किमंती 8,27,000/- रुपयाचा जप्त करण्यात आला. सदरचा गांजा हा आरोपीची आई व नंनद नामे जोहराबी ऊर्फ बब्बा खाला भ्र. अन्नवर खान पठाण रा.टायरबोर्ड नांदेड हीने सदरचा गांजा विक्री करण्यासाठी वरील ठिकाणी ठेवल्याचे प्रथम चौकशीत निष्पन्न आहे. दोन आरोपीस पो.स्टे. विमानतळ येथे हजर केले असुन पोउपनि श्री आनंद बिचेवार यांचे फिर्याद वरुन वरील तिन आरोपी विरुध्द पो.स्टे. विमानतळ येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची कार्यवाही ही मा. श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधीक्षक नांदेड, श्री अबिनाश कुमार, अपर पोलीस अधीक्षक नांदेड, श्री खंडेराव धरणे, अपर पोलीस अधिक्षक भोकर यांचे मार्गदर्शनाखाली, श्री उदय खंडेराय, पोलीस निरीक्षक स्थागुशा, पोउपनि / आनंद बिचेयार, पोलीस अमलदार गंगाधर कदम, संजीव जिंकलवाड, विठ्ठल शेळके, मोतीराम पवार, महेश बडगु, राजबंशी, ज्वालासिंग बावरी, मारोती मोरे, गजानन बयनवाड, महील अमलदार सौ. पंचफुला फुलारी, सौ. हेमलता भोयर, चालक अमलदार शंकर केंद्रे, अर्जुन शिंदे यांनी पार पाडली असून सदर पथकाचे मा. पोलीस अधीक्षक यांनी कौतूक केले आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments