Sunday, July 5

नांदेड

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

हिमायतनगर येथील हुजपा महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा – NNL

हिमायतनगर येथील हुजपा महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा – NNL

नांदेड
हिमायतनगर| हुतात्मा जयवंतराव पाटील महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभाग व क्रीडा विभागाच्या वतीने महाविद्यालयाच्या आदरणीय प्राचार्य डॉक्टर उज्वला सदावर्ते मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली 21 जून रोजी आंतरराष्ट्रीय योगा दिनाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. उज्वला सदावर्ते मॅडम, क्रीडा संचालक डॉ. दिलीप माने, रासेयो कार्यक्रमाधिकारी डॉ. शिवाजी भदरगे, सहकार्यक्रमाधिरी डॉ.एल. बी. डोंगरे व नॅक समन्वय डॉ. गजानन दगडे तसेच कार्यालयीन अधीक्षक श्री संदीप हरसूलकर आणि श्री लक्ष्मण कोलेवाड आदिंच्या उपस्थितीत महाविद्यालयातील अन्य कला, वाणिज्य व विज्ञान शाखेतील सर्व विभाग प्रमुख तसेच सर्व सहकारी प्राध्यापक आणि सर्व कार्यालयीन कर्मचारी आणि विध्यार्थी उपस्थित होते. या प्रसंगी योग प्रशिक्षक महाविद्यालयाचे क्रीडा संचालक डॉ. दिलीप माने यांनी वेगवेगळ्या आजारावर उ...
महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी युनियन (ओंकार) तालुका स्तरीय संघटनेची कार्यकारणी जाहीर – NNL

महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी युनियन (ओंकार) तालुका स्तरीय संघटनेची कार्यकारणी जाहीर – NNL

नांदेड
हिमायतनगर| पंचायत समिती कार्यालय हिमायतनगर अंतर्गत दिनांक 21 जून 2024 रोजी तालुकास्तरीय संघटनेची नवीन कार्यकारणी जाहीर करण्यात आली असून, महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी युनियन (ओंकार) तालुका स्तरीय संघटनेच्या अध्यक्षपदी रविकिरण देवसरकर तर सचिव पदी व्यंकटेश दमकोंडवार सरसमकर व कार्याध्यक्ष पदी संतोष कुलकर्णी यांची निवड करण्यात आली आहे. नुकत्याच संपन्न झालेल्या महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी युनियन (ओंकार) तालुका स्तरीय संघटनेच्या बैठकीत सर्वानुमते अध्यक्ष पदी रवी देवसरकर तर उपाध्यक्ष विकास जाधव, एस.ए. शेख, कार्याध्यक्ष संतोष कुलकर्णी , सचिव व्यंकटेश दमकोंडवार, कोषाध्यक्ष संतोष मोरे, सहसचिव लक्ष्मीकांत ओबरे, बालाजी सातपुते, महिला प्रतिनिधी श्रीमती इंदूताई वाघमारे, सल्लागार पदी पी.डी.गायकवाड, लक्ष्मण आढाव इत्यादींची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. सदरील संघटनेच्या सर्व पदाधि...
आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त इस्लापूर शहरात विविध ठिकाणी योग दिन साजरा -NNL

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त इस्लापूर शहरात विविध ठिकाणी योग दिन साजरा -NNL

नांदेड
किनवट, परमेश्वर पेशवे। आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त इस्लापूर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून वाळकी आरोग्यवर्धिनी केंद्र अंतर्गत येणाऱ्या इस्लापूर येथील अंगणवाडी व कोसमेट आरोग्यवर्धिनी केंद्र अंतर्गत येणाऱ्या कोसमेट भिशी उपकेंद्रांतर्गत येथे व इस्लापूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सावरकर नगर या ठिकाणी दहाव्या जागतिक योग दिनानिमित्त योग शिबिराचे भव्य आयोजन करण्यात आले होते. आरोग्यवर्धिनी केंद्राच्या योग शिक्षिका सौ.अनुराधा पेशवे यांनी योगा संदर्भात मार्गदर्शन करीत असताना योगाचे प्रकार किती आहेत व योगा कशा पद्धतीने कराव्यात याचे महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये सूर्यनमस्कार ,कपालभाती, भ्रमरी, प्राणायाम ,नाडी शुद्धी, ताडासन, गरुड आसन, वृक्षासन वज्रासन, पश्चिमोत्तानासन, यांच्यापासून आरोग्यास होणारे आरोग्यदायी फायदे याचे महत्त्व विद्यार्थ्यांना व लाभार्थ्यांना पट...
ओबीसी आरक्षण मुद्द्यावरून सुरू असलेल्या आमरण उपोषणाला माहुरातून पाठिंबा -NNL

ओबीसी आरक्षण मुद्द्यावरून सुरू असलेल्या आमरण उपोषणाला माहुरातून पाठिंबा -NNL

नांदेड
श्रीक्षेत्र माहूर, राज ठाकूर। अंबड तालुक्यातील वडीगोद्री येथे ओबीसी बचाव आरक्षणासाठी प्रा.लक्ष्मण हाके, नवनाथ वाघमारे तसेच पुणे येथे ॲड. मंगेश ससाणे व ॲड. मृणाल ढोरे पाटील यांनी ७ दिवसापासून आमरण उपोषण सुरू केले आहे.त्याला माहूर तालुक्यातील सकल ओबीसी समाज, बारा बलुतेदार, अलुतेदार,भटक्या विमुक्त जाती व अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदने जाहीर पाठिंबा घोषित केला आहे. दि.२१ जून रोजी तहसीलदार माहुर यांचे मार्फत तसे निवेदन राज्याच्या मुख्यमंत्र्यांना पाठविले आहे. ओबीसी समाजाच्या विविध संघटनेच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठविलेल्या निवेदनात शिष्ट मंडळासह उपोषण स्थळी जावून उपोषणकर्त्यांची भेट घेण्याची व त्यांच्या मागण्या मान्य करण्यासंदर्भात लेखी आश्वासन देण्याची विनंती केली आहे. तसेच ओबीसी आरक्षाला धक्का लागल्यास ओबीसी बांधव मोठ्या संख्येने महाराष्ट्राच्या रस्त्यावर उतरतील ...
मंडळ अधिकारी ला जायमोक्यावर जाऊन चौकशी करायला सहामहीण्या पासून वेळ मिळेना -NNL

मंडळ अधिकारी ला जायमोक्यावर जाऊन चौकशी करायला सहामहीण्या पासून वेळ मिळेना -NNL

नांदेड
श्रीक्षेत्र माहूर, राज ठाकूर। मौजे लांजी ता. माहूर येथील गणेश शेषेराव दामलवार व इतर ३ यांनी दिनांक २८.११.२०२३ रोजी तहसिलदार कार्यालयात रस्ता खुला करुण देणेबाबत विनंती अर्ज केला होता. तरी त्याबाबत मा. तहसिलदार साहेब माहूर यांनी मंडळ अधिकारी, माहूर यांना चौकशी करीता दिनांक २९.१२.२०२३ रोजी पत्र काढले. या प्रकरणात आपण जायमोक्यावर जाऊन विषयाकीन रस्ता खुला करून देण्याची नियमानुसार कार्यवाही करावी व या कार्यालयास अनुपालन अहवाल सादर करावा तसेच संबंधितना अवगत करावे प्रकरणात विलंब करू नये या बाबत दक्षता घ्यावी. पत्र काढून सहा महीने उलटूनही मंडळ अधिकारी व्हि.के.पाईकराव जायमोक्यावर न गेल्याने उलट सुलट चर्चा होत आहे. मौजे लांजी येथील शे.स.न.१९ मध्ये ये-जा करण्यास असलेली भावकी हिस्यातील परंपरागत वहिवाट असलेला व ७/१२ इतर अधिकार रकान्यात नोंद असलेला बैलगाडी रस्ता आडवत असल्याने रस्ता खुला करुण मिळणे ...
१० वा ” जागतिक योग दिवस ” ग्रामीण रुग्णालय भोकर येथे साजरा -NNL

१० वा ” जागतिक योग दिवस ” ग्रामीण रुग्णालय भोकर येथे साजरा -NNL

नांदेड
भोकर। आज दि.२१ जून " जागतिक योग दिवस " केंद्र शासन,महाराष्ट्र शासन, सार्वजानिक आरोग्य विभाग यांच्या सूचनेनुसार व मा.डॉ. निळकंठ भोसीकर जिल्हा शल्य चिकित्सक नांदेड, मा. डॉ बालाजी शिंदे जिल्हा आरोग्य अधिकारी नांदेड, मा.डॉ प्रताप चव्हाण वैद्यकिय अधिक्षक, ग्रामीण रुग्णालय भोकर, मा. डॉ संदेश जाधव तालुका आरोग्य अधिकारी भोकर यांच्या मार्गदर्शनानुसार ग्रामीण रुग्णालय भोकर व तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय भोकर यांच्या संयुक्त विद्यमाने १० वा " जागतिक योग दिवस " ग्रामीण रुग्णालय भोकर तेथे साजरा करण्यात आला. योग प्रशिक्षक डॉ. विजयकुमार दंडे, डॉ संदेश जाधव, डॉ सारिका जावळीकर यांनी योगा बदल माहिती, योगआसनाचे महत्त्व सांगीतले व प्रात्याक्षिक करून दाखविले. आयुष विभागाचे डॉ विजयालक्ष्मी घोडजकर (किनीकर) यांनी प्रास्ताविक केले आभार प्रदर्शन डॉ थोरवट यांनी केले डॉ मुदशिर यांनी सहकार्य केले. यावेळी ग्रा...
उमरखेड येथील नांदेड व हिंगोली खासदारांचा विठ्ठल बागेत सत्कार ! -NNL

उमरखेड येथील नांदेड व हिंगोली खासदारांचा विठ्ठल बागेत सत्कार ! -NNL

नांदेड, उमरखेड, हिंगोली
उमरखेड,अरविंद ओझलवार। काँग्रेसचे नेते माजी आमदार प्रकाश पाटील देवसरकर यांनी त्यांच्या विठ्ठल बाग निवासस्थानी नांदेडचे खासदार वसंतराव चव्हाण व हिंगोली चे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांचा स्नेह मिलन सोहळा आयोजित केला होता . याप्रसंगी माजी आमदार प्रकाश पाटील देवसरकर यांच्या कुटुंबीयांकडून त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला . यावेळी बोलताना प्रकाश पाटील देवसरकर यांनी सांगितले की ,हा सोहळा आयोजित करण्याचे कारण म्हणजे दिल्ली दरबारी अतिशय जवळचे नातेवाईक असलेले दोन खासदार झाल्याने त्यांचा फायदा उमरखेड विधानसभेतील सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी झाला पाहिजे हा उद्देश ठेवून विठ्ठल बागेत त्यांच्या सत्काराचे आयोजन केले आहे . यावेळी बोलतांना नांदेडचे खासदार वसंतराव चव्हाण यांनी मी जरी नांदेडचा खासदार असलो तरी उमरखेड विधानसभेचा विकास करण्यासाठी नेहमी आमच्या महाविकास आघाडीचे खासदार नागेश पाटी...
हिमायतनगर-पळसपूर-डोल्हारी-सिरपल्ली अर्धवट रस्त्याकडे नवनिर्वाचित खा. नागेश पाटील आष्टीकर यांनी लक्ष द्यावे – NNL

हिमायतनगर-पळसपूर-डोल्हारी-सिरपल्ली अर्धवट रस्त्याकडे नवनिर्वाचित खा. नागेश पाटील आष्टीकर यांनी लक्ष द्यावे – NNL

नांदेड, राजकीय
हिमायतनगर,अनिल मादसवार। केंद्र व राज्य शासनाने आमदार खारादाराच्या मागणीची दखल घेऊन हिमायतनगर नडव्यापासून पळसपुर डोल्हारी मार्ग शिरपल्ली जाणारा रस्ता प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतर्गत २०२२ मध्ये मंजूर करून कामाला सुरुवात केली. मात्र एकंबा - सिरपल्ली - डोल्हारी - पळसपूर - हिमायतनगर रस्त्याच अर्धवट काम ठेऊन गुत्तेदाराने पलायन केल्यामुळे सर्वसामान्य नागरीकातून संबंधित ठेकदाराविरुद्ध जनप्रक्षोभ वाढला आहे. संबंधित गुत्तेदाराच्या हलगर्जीपणामुळे व प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे या रस्त्यावरील तिन्ही गावच्या लोकांना नरक यातना सहन कराव्या लागत आहेत. आता पावसाळ्यात देखील रस्त्यावरून ये जा करतांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागणार असून, या अर्धवट रस्त्यामुळे अनेकांना पाठदुखी, कंबरदुखी, मणक्याचे आजार व अपघाताचा सामना करावा लागतो आहे. या रस्त्याच्या अर्धवट कामाकडे नवनिर्वाचित खा. नागेश पाटील आष्टीकर यां...
विद्यार्थ्यांनी ठराविक कोर्सचा आग्रह न धरता स्पर्धा परीक्षेस समोर जावे ! डॉ.गणेश जोशी – NNL

विद्यार्थ्यांनी ठराविक कोर्सचा आग्रह न धरता स्पर्धा परीक्षेस समोर जावे ! डॉ.गणेश जोशी – NNL

नांदेड
श्रीक्षेत्र माहुर, राज ठाकूर| व्हाईस ऑफ मीडिया तालुका शाखा माहुरतर्फे २०२३-२४ मध्ये उत्कृष्ट गुण घेऊन उत्तीर्ण झालेल्या तालुक्यातील दहावी,बारावी,व स्कॉलरशिच्या विद्यार्थ्यांचा सत्कार जिनियस किड्स इंग्लिश स्कूलच्या माहुरच्या प्रांगणात घेण्यात आला. यावेळी कार्यक्रम अध्यक्ष म्हणून नांदेड महानगर व्हाईस ऑफ मीडिया अध्यक्ष डॉ.गणेश जोशी,तर प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रसंत द.भ.प.साईनाथ महाराज बितनाळकर हे व्यासपीठावर उपस्थित होते . यावेळी डॉ.गणेश जोशी म्हणाले की हल्ली डॉक्टर, इंजिनियर होण्याचे फॅड पालक व विद्यार्थी करीत आहेत, विद्यार्थीनी स्पर्धा परिक्षेत सामील होउन नव्या पिढीने, जिल्हाधिकारी ,पोलीस अधिक्षक,आयकर अधिकारी, उपजिल्हाधिकारी, तहसीलदार व तस्सम राजपत्रित होण्यासाठी स्पर्धा परिक्षेशिवाय पर्याय नाही असे सांगितले. याशिवाय आदिवासी व नक्षलप्रवण माहुर किनवट तालुक्यात व्हाईस ऑफ मीडियाच्या वती...
आर्ट ऑफ लिव्हिंग व श्री रेणुकादेवी महाविद्यालय आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा -NNL

आर्ट ऑफ लिव्हिंग व श्री रेणुकादेवी महाविद्यालय आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा -NNL

नांदेड
श्रीक्षेत्र माहूर, राज ठाकूर। आर्ट ऑफ लिव्हिंग व श्री रेणुका देवी महाविघालय माहूर यांच्या संयुक्त विद्यमाने १० वा आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आला. शुक्रवार दि,२१ जून रोजी सकाळी ६.३० वा, श्री रेणुकादेवी महाविद्यालयाच्या महाविद्यालयाच्या इंडोर हॉलमध्ये प्रथम रवि शंकर याच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. आर्ट ऑफ लिव्हिंग चे प्रशिक्षक डॉक्टर राम कदम यांनी योगाचे प्रकार सांगत आसन,कपाल भाती,नाडिशोधन, भस्त्रिका, भ्रामरी प्राणायाम ध्यान, सुदर्शन क्रिया,असे विविध योगासनाचे प्रशिक्षण देऊन महत्व सागितले ,दररोज एक तास योग,प्राणायाम,ध्यान, केल्याने तनावमुक्त व उत्साही मन ,नकारात्मक भावनांतुन मुक्तता,आत्मविश्वासात वाढ,प्रभावी निर्णयक्षमता,मनाची एकाग्रता,निर्मळ व कुशाग्र बुद्धि,सक्षम आरोग्य,व रोग प्रतिकारक शक्ती वाढतेअसे अनेक शरीराचे फायदे होत असल्याचे सागितले. यावेळी संस्थेच्या, प्राचार...
error: Content is protected !!