Sunday, July 5

नांदेड

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

जिल्‍हयात विविध ग्रामपंचायत व शाळांमध्‍ये योग दिन साजरा – NNL

जिल्‍हयात विविध ग्रामपंचायत व शाळांमध्‍ये योग दिन साजरा – NNL

नांदेड
नांदेड| आज जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायती आणि शाळांमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन मोठया उत्साहाने साजरा करण्यात आला. सकाळपासूनच विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. ग्रामपंचायतींनी स्थानिक नागरिकांसाठी योग शिबिरांचे आयोजन केले, ज्यामध्ये योगाचे महत्त्व व त्याचे फायदे विषद करण्यात आले. शाळांमध्ये विद्यार्थ्यांनी योगासने सादर केली. शिक्षकांनी योगा दिनाचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून दिले आणि रोजच्या जीवनात योगाचे महत्त्व कसे आहे याबद्दल मार्गदर्शन केले. काही शाळांमध्ये पालकांनी देखील या कार्यक्रमात सहभाग घेतला. पंचायत समिती, ग्रामपंचायत, शाळा, महाविद्यालय आदी ठिाकाणी दहावा आंतरराष्‍ट्रीय योग दिन साजरा करण्‍यात आला. शारीरिक व मानसिक आरोग्‍य सुधारण्‍यासाठी डासासन, वृक्षासन, भुजंगासन, धनुरासन, बज्रासन आदी योगासने करण्‍यत आली. आंतरराष्‍टीय योग दिन साजरा करण्‍याचे आवाहन जिल्हा परिषद...
योगामध्ये सातत्य म्हणजेच ठणठणीत आयुष्य -कुलगुरू डॉ. मनोहर चासकर – NNL

योगामध्ये सातत्य म्हणजेच ठणठणीत आयुष्य -कुलगुरू डॉ. मनोहर चासकर – NNL

नांदेड
नांदेड| २१ जून हा जागतिक योगा दिन आहे. यानिमित्त भारतातून उगम पावलेल्या योगाचे जगभरात सादरीकरण होत असते. फक्त योगा दिनानिमित्त योगा करून आरोग्यामध्ये काही फरक पडणार नाही तर त्यासाठी नियमितपणे योगा करणे आवश्यक आहे. तरच निरोगी आयुष्य जगता येईल. म्हणून योगामध्ये सातत्य म्हणजेच ठणठणीत आयुष्य होय. असे मत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांनी व्यक्त केले. ते आज दि. २१ जून रोजी जागतिक योगा दिनाच्या निमित्ताने विद्यापीठाच्या इनडोअर हॉलमध्ये आयोजित शिबिरास मार्गदर्शन प्रसंगी मत मांडत होते. याप्रसंगी महाराष्ट्रीय मंडळ सीएसीपीई चे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे योग प्रशिक्षक डॉ. पल्लवी कव्हाने या उपस्थितांना योगाचे धडे देत होत्या. योगा दिनाच्या पूर्वसंध्येस डॉ. पल्लवी यांचे ‘अथ योगानुशासनम: जीवन जगण्याची कला’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्याप्रसंगी डॉ. पल्लवी म्हणाल्या मानवी जीवनामध...
जिल्ह्यातील सर्व शासकीय इमारतींमध्ये रेनवॉटर हार्वेस्टिंग सिस्टीम अनिवार्य  -मुख्‍य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल – NNL

जिल्ह्यातील सर्व शासकीय इमारतींमध्ये रेनवॉटर हार्वेस्टिंग सिस्टीम अनिवार्य -मुख्‍य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल – NNL

नांदेड
नांदेड, अनिल मादसवार| जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी जिल्ह्यातील पाणीटंचाई कमी करण्यासाठी जिल्‍हा परिषदे अंतर्गत सर्व शासकीय इमारतींमध्‍ये रेनवॉटर हार्वेस्टिंग सिस्टीम अनिवार्य करण्‍याचे असे आवाहन केले आहे. पावसाच्या पाण्याचे संकलन आणि संवर्धन करणे काळाची गरज आहे. शाळा खोली बांधकाम, अंगणवाडी, प्राथमिक आरोग्‍य केंद्र, उप केंद्र, पशुवैद्यकिय दवाखाने आदी शासकीय इमारतीचे बांधकाम करतांना यापूर्वी रेनवॉटर हार्वेस्टिंग करणे ऐच्छिक होते. परंतू आता सर्व शासकीय इमारत बांधकामात रेनवॉटर हार्वेस्टिंग अनिवार्य करण्‍यात आले आहे. जिल्ह्यातील सर्व शासकीय इमारतींमध्ये रेनवॉटर हार्वेस्टिंग सिस्टीमची स्थापना केली जाईल. यासाठी बांधकाम विभागाचे अभियंता आवश्यक ते तांत्रिक मार्गदर्शन करणार आहेत. नांदेड, भोकर व देगलूर बांधकाम उप विभागात प्राथमिक आरोग्‍य केंद्र, उप केंद्र, पशु वै...
पंजाबच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य मंत्री गगनदीप कौर उर्फ अनमोल गगन मान यांचा दौरा – NNL

पंजाबच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य मंत्री गगनदीप कौर उर्फ अनमोल गगन मान यांचा दौरा – NNL

नांदेड
नांदेड| पंजाब राज्याच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य मंत्री गगनदीप कौर उर्फ अनमोल गगन मान या 25 जून 2024 रोजी नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे राहील. मंगळवार 25 जून 2024 रोजी हैद्राबाद येथून विमानाने सकाळी 8.45 वाजता नांदेड विमानतळावर आगमन. दुपारी 4.30 वाजता नांदेड येथून हैद्राबादकडे विमानाने प्रयाण करतील. महसूल, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा दौरा राज्याचे महसूल, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा नांदेड जिल्हा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे. शुक्रवार 21 जून 2024 रोजी छत्रपती शिवाजी महाराज, मुंबई विमानतळ येथून श्री गुरू गोविंद सिंहजी विमानतळ नांदेड येथे रात्री 11 वाजता आगमन. रात्री 11.15 वाजता शासकीय विश्रामगृह नांदेड येथे आगमन, राखीव व मुक्काम....
हदगाव उपजिल्हारुग्णालयात रक्ततपासणी ओपीडी त्वरीत उपलब्ध करा – प्रल्हाद पाटील – NNL

हदगाव उपजिल्हारुग्णालयात रक्ततपासणी ओपीडी त्वरीत उपलब्ध करा – प्रल्हाद पाटील – NNL

नांदेड
हदगाव, शेख चांदपाशा| हदगाव शहरातील उपजिल्हारुग्णालय मध्ये रक्त तपासणी ओपीडी नसल्याने रुग्णाचे हाल होत आहे. ती त्वरीत उपलब्ध करुन दयावी अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनाचे तालुका अध्यक्ष प्रल्हाद पाटील हडसणीकर यांनी एक निवेदन देऊन उपजिल्हा रुग्णालयाचे वैधकीय अधिक्षक याच्याकडे केली आहे. दि 21 जुन 2024 रोजी दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, शहरातील उपजिल्हा रुग्णालयामध्ये हदगाव व हिमायनगर तालुक्याच्या व्यतिरिक्त विदर्भातील दररोज हजारो रुग्ण उपचारा करिता येतात. परंतु त्यांना ह्या रुग्णालय मध्ये हव्या त्या आरोग्य सुविधा मिळत नाहीत. ह्यातच रक्त तपासणी करिता ओपीडी नाही रक्ताचे नमुने हदगाव शहरापासुन ५० किमी दुर असलेल्या हिमायनगर शहरात पाठविण्यात येतात. तेथुन रिपोर्ट येण्यासाठी बराच वेळ जातो रिपोर्ट येई पर्यत रुग्णाचे खुप हाल होतात. वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे काही गंभीर घटना घडलेल्या आह...
हिमायतनगर तालुक्यातील एकघरी बिरसा मुंडा चौक ते वाशी अंतर्गत निकृष्ट दर्जाच्या कामाची चौकशी करा – दत्ता  शिराणे – NNL

हिमायतनगर तालुक्यातील एकघरी बिरसा मुंडा चौक ते वाशी अंतर्गत निकृष्ट दर्जाच्या कामाची चौकशी करा – दत्ता  शिराणे – NNL

नांदेड, महाराष्ट्र, व्हिडीओ
हिमायतनगर, अनिल मादसवार| तालुक्यातील एकघरी, बिरसा मुंडा चौक ते वाशी अंतर्गत सिमेंट काँक्रेट व डांबरी रस्त्याचे काम अतिशय बोगस व निकृष्ट दर्जाचे झाले आहे. सदरचा रस्ता करताना ठेकेदाराने अभियंत्याशी मिलीभगत करून शासनाच्या मुळ अंदाज पत्रकाला बासनात गुंडाळून केले असल्याने डांबरी रस्ता हाताने निघत असून, सिमेंट काँक्रेट रस्त्याला देखील तडे जाऊन अनेक ठिकाणी उखडला आहे. या बोगस व निकृष्ट दर्जाच्या कामाची सखोल चौकशी करून दोषी अभियंते व राजकीय वरदहस्त असलेल्या संबंधित ठेकेदारांवर कारवाई करावी. अशी मागणी भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चाचे तालुकाध्यक्ष दत्ता शिराणे यांनी एका निवेदनाद्वारे केली आहे.   कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग भोकर यांना दिलेल्या निवेदनात दत्ता शिराणे यांनी म्हटले आहे की, तालुक्यातील एकघरी, बिरसा मुंडा चौक ते वाशी अंतर्गत रस्त्यांच्या कामांसाठी शासनाकडून जवळपास ५...
नांदेडमध्य दहावा आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात; जिल्हाधिकारी,सिईओ यांच्यासह अनेक संघटनांचा सहभाग – NNL

नांदेडमध्य दहावा आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात; जिल्हाधिकारी,सिईओ यांच्यासह अनेक संघटनांचा सहभाग – NNL

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड, अनिल मादसवार| जिल्हा प्रशासनाच्यावतीने दहावा आंतरराष्ट्रीय योग दिन शुक्रवार २१ जूनला सकाळी 6.30 वा. श्री गुरुग्रंथ साहिबजी भवन नांदेड येथे उत्सहात साजरा करण्यात आला.शेकडोच्या संख्येने उपस्थित आबालवृद्ध आणि प्रशिक्षकांच्या निर्देशात झालेल्या योग प्रात्यक्षिकाचा सर्वानी अनुभव घेतला.या मुख्य शासकीय समारोहासोबतच शहर व जिल्हयात ठिकठिकाणी दहावा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. सकाळी 7 वाजता श्री. गुरुग्रंथ साहिबजी भवन येथे यासाठी योगाभ्यास करणाऱ्या विविध संस्था व वेगवेगळ्या शाळा महाविद्यालयाचे विद्यार्थी उपस्थित होते. जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेंभरे यांच्या मार्गदर्शनात संपूर्ण चमूने सुदर आयोजन या ठिकाणी केले होते.जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे,जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेंभरे,याच्या उपस्थितीत सकाळी बरो...
मानसिक स्थिरतेसाठी ” योगा ” हे मुख्य साधन – डाँ संतुकराव हंबर्डे -NNL

मानसिक स्थिरतेसाठी ” योगा ” हे मुख्य साधन – डाँ संतुकराव हंबर्डे -NNL

नांदेड
नवीन नांदेड। " योग "हा भारतीय संस्कृतीचा गाभा आहे . योगामुळे अनेक व्याधीवर उपाय म्हणुन पाहिले जाते . परंतु योगामुळे माणसिक स्थिरता माणसाला मिळते . रोज आपण योगामुळे श्वासावर नियंञन मिळते . शरीराचे - मनाचं कनेक्शन एक करते . त्यामुळे एकाग्रता वाढते . यामुळे प्रत्येकांनी योगा रोज करत आपल्यात एकाग्रता वाढवावी . त्यामुळे आपल्यात आभ्यासाची गोडी निर्माण होईल . आणि आपण आपल्या आई - वडीलाची इच्छा पुर्ण करुन यशाच्या शिखरा पर्यत पोहचु . यासाठी योगा हेच एक माध्यम असल्याचे मत सहयोग सेवाभावी संस्थेचे सचिव डाँ संतुकराव हंबर्डे यांनी योगा शिबिरात मार्गदर्शन करताना व्यक्त केले . सहयोग सेवाभावी संस्थेच्यावतीने जागतिक योगादिना निमित्याने संस्थेच्या प्रागंणात दि २१ रोजी योग शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिराचे उदघाटन संस्थेचे सचिव डाँ संतुकराव हंबर्डे यांच्या हस्ते करण्यात आले . या योगा शिबिरास योग शिक्षक र...
सिडको मुख्य रस्त्यावरील भाजीपाला,हातगाडे,फळ विक्रेते यांनी केलेले अतिक्रमण हटविले -NNL

सिडको मुख्य रस्त्यावरील भाजीपाला,हातगाडे,फळ विक्रेते यांनी केलेले अतिक्रमण हटविले -NNL

नांदेड
नवीन नांदेड। नावामनपा सिडको क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत सिडको परिसरातील मुख्य रस्त्यावरील भाजीपाला विक्रेते, हातगाडे यांना गुरूवार बाजार या ठिकाणी पर्यायी जागा असतांनाही मुख्य रस्त्यावर अतिक्रमण करून व मालमत्ता धारकाने केलेल्या पायरा व ओटे अतिक्रमण केल्याने म दैनंदिन जाणारी येणारी वाहतूक खोळ बंळत असल्याने व नागरीकांना होत असलेला त्रास पाहता सिडको क्षेत्रीय कार्यालय, मनपा अतिक्रमण पथक, व ग्रामीण पोलीस स्टेशनने २१ जुन रोजी केलेल्या कार्यवाही मध्ये अतिक्रमण हटवून रस्ता मोकळा केला आहे. नावामनपचा सिडको क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा ते अण्णा भाऊ साठे सिडको दरम्यान भाजीपाला,फळ विक्रेते,हातगाडे यांच्या सह विविध प्रतिष्ठान यांनी रस्त्यावर माल लावून जाणाऱ्या येणारा वाहतूकीस अडथळा निर्माण केले, यामुळे वाहन धारकासह नागरिक शालेय विद्यार्थ्यांना दैनंदिन नाहक ...
१० व्या योग प्रात्यक्षिक शिबिरात ४८ शिबिरार्थींनी सहभाग घेऊन योग व प्राणायामचे धडे गिरविले – NNL

१० व्या योग प्रात्यक्षिक शिबिरात ४८ शिबिरार्थींनी सहभाग घेऊन योग व प्राणायामचे धडे गिरविले – NNL

Blog, नांदेड
नांदेड| जागतिक योग दिनानिमित्त भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांनी आयोजित केलेल्या १० व्या योग प्रात्यक्षिक शिबिरात ४८ शिबिरार्थींनी सहभाग घेऊन योग शिक्षिका मायादीदी अत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली योग व प्राणायामचे धडे गिरविले. भाजपा महानगर नांदेड,अमरनाथ यात्री संघ, लायन्स क्लब नांदेड सेंट्रल यांच्या वतीने सतत अकराव्या वर्षी सिद्धेश्वर मंदिर गोवर्धन घाट नांदेड येथे जागतिक योग दिन साजरा करण्यात आला. या शिबिराचे उद्घाटन भाजपा कामगार आघाडी जिल्हाध्यक्ष सुरेश लोट यांच्या हस्ते संपन्न झाले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान सुभाष देवकते यांनी भूषविले. प्रमुख अतिथी म्हणून नीता दागडिया, संध्या छापरवाल, माजी नगरसेविका जयश्री ठाकूर ह्या उपस्थित होत्या. सुरुवातीला संयोजक दिलीप ठाकूर यांनी आपल्या प्रास्ताविकातून योग दिन साजरा करण्यामागची भूमिका स्पष्ट केली. आर्ट ऑफ लिव्हींग च्या...
error: Content is protected !!