Homeनांदेडहदगाव उपजिल्हारुग्णालयात रक्ततपासणी ओपीडी त्वरीत उपलब्ध करा - प्रल्हाद पाटील - NNL

हदगाव उपजिल्हारुग्णालयात रक्ततपासणी ओपीडी त्वरीत उपलब्ध करा – प्रल्हाद पाटील – NNL

हदगाव, शेख चांदपाशा| हदगाव शहरातील उपजिल्हारुग्णालय मध्ये रक्त तपासणी ओपीडी नसल्याने रुग्णाचे हाल होत आहे. ती त्वरीत उपलब्ध करुन दयावी अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनाचे तालुका अध्यक्ष प्रल्हाद पाटील हडसणीकर यांनी एक निवेदन देऊन उपजिल्हा रुग्णालयाचे वैधकीय अधिक्षक याच्याकडे केली आहे.

दि 21 जुन 2024 रोजी दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, शहरातील उपजिल्हा रुग्णालयामध्ये हदगाव व हिमायनगर तालुक्याच्या व्यतिरिक्त विदर्भातील दररोज हजारो रुग्ण उपचारा करिता येतात. परंतु त्यांना ह्या रुग्णालय मध्ये हव्या त्या आरोग्य सुविधा मिळत नाहीत. ह्यातच रक्त तपासणी करिता ओपीडी नाही रक्ताचे नमुने हदगाव शहरापासुन ५० किमी दुर असलेल्या हिमायनगर शहरात पाठविण्यात येतात. तेथुन रिपोर्ट येण्यासाठी बराच वेळ जातो रिपोर्ट येई पर्यत रुग्णाचे खुप हाल होतात. वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे काही गंभीर घटना घडलेल्या आहेत. रुग्ण दगावत असल्याच ही निवेदनात नमुद केलेले आहे.

दुसरी गंभीर बाब अशी की, रक्ताचे रिपोर्ट रुग्णाने किवा संबंधीताने मागविले असता खाजगी रक्त लँब मध्ये तपासणी करुन घ्या असा सल्ला देण्यात येतो. हदगाव शहरात खाजगी मध्ये रक्त लँबवर कुणाच ही नियंत्रण नसल्याने लँब संचालक मणाला वाटेल तेवढी रक्कम रुग्णाकडुन वसुल करत आसल्याच आरोप ही दिलेल्या निवेदनात करण्यात आलेला आहे. हदगाव शहरातील उपजिल्हा रुग्णालय मध्ये रक्त ओपीडी तसेच महाहेन्द लँब उपलब्ध करुन देण्याची मागणी ही निवेदनात करण्यात आली आहे. या बाबतीत NNL मराठीचे तालुका प्रतिनिधी शेख चांदपाशा यांनी उपजिल्हा रुगाणालयाच्या प्रशासनाशी संपर्क साधण्याच प्रयत्न कैला असता नेहमी प्रमाणे समाधानकारक उतरे मिळु शकलेली नाही. रुग्णाचे रक्ताचे नमुने हिमायनगरला पाठविण्यात येतात इतकेच सागितले. दिलेल्या निवेदनावर प्रल्हाद पाटील हडसणीकर, ज्ञानेश्वर हेद्रे, आकाक्षाताई वायवळ, शिवाजीराव वानखेडे, पंजाबराव देशमुख, विलास महाजन, अर्चना ठोके, सुनील पाटील आदीच्या सह्या आहेत.

विद्यमान आमदार यांनी उपजिल्हा रुग्णालयास भेट दिली होती
मागील वर्षी इथल्या काही पञकारांनी हदगाव विधानसभा क्षेत्राचे आ माधवराव पाटील जवळगावकर. याच्या निर्दशनास सदरील प्रकार आणुन दिला होता. ओपीडी रक्तचे नमुने हिमायनगरला पाठविण्यात येतात या बाबतीत स्वतः विद्यमान आमदार साहेबांनी प्रत्यक्षात त्यावेळचे तात्कालिक वैधकीय आधिक्षक याच्याशी रक्त तपासणी लँबच्या बाबतीत उपजिल्हा रुग्णालय मध्ये चर्चा केली होती. पण त्या चर्चाचा परिणाम माञ आध्याप तरी काहीच दिसुन आलेला नाही. विशेष म्हणजे हदगाव शहरात उपजिल्हा रुग्णालय असुन ही रक्तचाचे नमुने तपसण्या करिता 50 किमी दुर असलेल्या हिमायनगरला शहरात पाठविण्यात येतात. हे उपजिल्हा रुग्णालय प्रशासनाचे न उलगडणारे कोडे असुन, उटावरुन शेळ्या हाकण्याचा हा प्रकार दिसुन येतो आहे. अश्या संतप्त प्रतिक्रिया नागरिकातुन ऐकवायास मिळत आहेत.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments