Sunday, July 5

नांदेड

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

ग्रामीण पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षक अशोकराव केंद्रे ३५ वर्ष प्रदिर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त -NNL

ग्रामीण पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षक अशोकराव केंद्रे ३५ वर्ष प्रदिर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त -NNL

नांदेड
नविन नांदेड। ग्रामीण पोलीस स्टेशन येथे उपनिरीक्षक असलेले अशोकराव गोविंदराव केंद्रे हे ३५ वर्षाच्या प्रदिर्घ सेवेनंतर ३० जुन रोजी वयोमना नुसार सेवानिवृत्त होत आहेत. १९ ऑगस्ट ८९ रोजी नांदेड जिल्हा पोलीस मुख्यालय येथे पोलीस कॉन्स्टेबल प्रथम नियुक्ती पोलीस मुख्यालय येथे झाली, त्यानंतर वजिराबाद पोलीस स्टेशन येथे दोन वर्षे व ऊपविभागीय ग्रामीण पोलीस अधिकारी,वाहतूक शाखा, पोलीस मुख्यालय,व नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशन येथे सेवा बजावली आहे. २५ ऑगस्ट रोजी उपनिरीक्षक पदी पदोन्नती मिळाली आहे. दि. ३० जुन रोजी नियमित वयोमान नुसार ३५ वर्ष २ महिने ११ दिवस प्रदिर्घ सेवा करून सेवानिवृत्त होत असल्याबद्दल मित्र मंडळ यांच्या वतीने अभिनंदन होत असून आगामी भावी आयुष्यास शुभेच्छा देण्यात आल्या आहेत....
जिल्हा परिषद कर्मचारी युनियनच्या माहूर तालुका अध्यक्षपदी जयराम केंद्रे यांची निवड -NNL

जिल्हा परिषद कर्मचारी युनियनच्या माहूर तालुका अध्यक्षपदी जयराम केंद्रे यांची निवड -NNL

नांदेड
श्रीक्षेत्र माहूर, राज ठाकूर। महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी युनियन (ओंकार) जिल्हा शाखा नांदेड अंतर्गत माहूर तालुका अध्यक्षपदी जयराम केंद्रे यांची निवड करण्यात आली. दि,२६ जून रोजी पंचायत समिती माहूरच्या कै, वसंतराव नाईक सभागृहामध्ये आयोजित करण्यात आलेल्या बैठकीमध्ये प्रमुख पाहुणे म्हणून कर्मचारी नेते बाबुराव पुजरवाड,कर्मचारी युनियनचे राज्य सहसचिव देवेंद्र देशपांडे, जिल्हाध्यक्ष धनंजय गुम्मलवार,सचिव राघवेंद्र मदनूरकर,तसेच संतोष मठपती, बालाजी महाजन, शेख मुकरम, व कर्मचाऱ्यांरी उपस्थित होते. या मध्ये सर्वानूमते माहूर पंचायत समितिचे लिपिक जयराम नागनाथ केंद्रे यांची निवड करुन नियुक्ति पत्र देण्यात आले. कार्यकारणी मध्ये सचिव म्हणून सोनवणे, कार्याध्यक्ष राजगुरू, संघटक मार्गमवार, कोषाध्यक्ष दुमारे, उपाध्यक्ष प्रवीण काळेगोरे, सहसचिव काळबांडे, सल्लागार तावडे, नागेश सिंदगीकर, महिला...
करिअर मार्गदर्शन कार्यक्रमाचे 30 जून रोजी मातोश्री सभागृहात आयोजन; पहिल्यांदाच इंद्रजीत देशमुख यांचे नांदेडमध्ये व्याख्यान -NNL

करिअर मार्गदर्शन कार्यक्रमाचे 30 जून रोजी मातोश्री सभागृहात आयोजन; पहिल्यांदाच इंद्रजीत देशमुख यांचे नांदेडमध्ये व्याख्यान -NNL

नांदेड
नांदेड। इयत्ता 10 वी, 12वी आणि पदवीनंतर कोणत्या क्षेत्रात करिअर करावे याबाबत सर्वांनाच चिंता असते. विद्यार्थ्यांनी यशाचा मार्ग कसा निवडावा यावर मार्गदर्शन करण्यासाठी मातोश्री प्रतिष्ठाण या संस्थेने करियर गायडन्स कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. विद्यार्थी व पालकांच्या मनातील सर्व शंकांचे निरसन करणारा परिपूर्ण कार्यक्रम म्हणजे करिअर गायडन्स प्रोग्राम आणि या कार्यक्रमास मार्गदर्शक म्हणून ग्रामविकास विभागाचे मा. अति मुख्य कार्यकारी अधिकारी तथा सुप्रसिद्ध कवी - कथाकार, प्रेरणादायी व्याख्याते इंद्रजीत देशमुख विद्यार्थी व पालकांशी संवाद साधण्यासाठी उपस्थित राहणार आहेत. विद्यार्थ्यांसाठी दिशादर्शक - मार्गदर्शक आणि सन्मान सोहळ्याचे आयोजन दिनांक 30 जून 2024 रोजी सकाळी 10.30 वाजता जिजाऊ नगर, लातूर रोड, खूपसरवाडी, विष्णुपुरी, नांदेड- लातूर रोड येथिल मातोश्री प्रतिष्ठानच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये आयोजित...
भारतीय जनता पार्टीला काॅग्रेसची माणसे मारायची आहेत; माजी केंद्रीय राज्यमंत्री सुर्यकांता पाटील यांचा हल्लाबोल -NNL

भारतीय जनता पार्टीला काॅग्रेसची माणसे मारायची आहेत; माजी केंद्रीय राज्यमंत्री सुर्यकांता पाटील यांचा हल्लाबोल -NNL

नांदेड
नांदेड। गत दहा वर्षापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला सोडचिठ्ठी देऊन रागाच्या भरात मी भारतीय जनता पार्टी पक्षात प्रवेश केला पण दहा वर्षात भाजपाकडे काही मागितलेलं नाही व कोणती निवडणुकही लढवली नाही.परंतू,भारतीय जनता पार्टीला मात्र कॉंग्रेसची माणसे मारायची असून त्या माणसांना त्यांना जगवायचे नाही असा थेट हल्लाबोल माजी केंद्रीय राज्यमंत्री सुर्यकांताताई पाटील यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी- शरदचंद्र पवार पक्षात स्वगृही घरवापसी केल्यानंतर नांदेड रेल्वे स्थानकावर पत्रकारांशी बोलतांना केला. राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार पक्षाचे संस्थापक अध्यक्ष खा.शरदचंद्र पवार व प्रदेशाध्यक्ष आ.जयंत पाटील यांच्या उपस्थितीत माजी राज्यमंत्री सुर्यकांताताई पाटील यांनी मुंबई येथे दि.२५ जून रोजी प्रवेश केला.त्यानंतर प्रथमच त्यांचे आज नांदेडमध्ये आगमन झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी- शरदचंद्र ...
माता रत्नेश्वरीला साकडे घालण्यासाठी अमरनाथ यात्री संघ,भाजप, लायन्स तर्फे रविवार सकाळी ६ वाजता २३ व्या रत्नेश्‍वरी पाऊस दिंडीचे आयोजन -NNL

माता रत्नेश्वरीला साकडे घालण्यासाठी अमरनाथ यात्री संघ,भाजप, लायन्स तर्फे रविवार सकाळी ६ वाजता २३ व्या रत्नेश्‍वरी पाऊस दिंडीचे आयोजन -NNL

नांदेड
नांदेड। मराठवाड्यात पुरेसा पाऊस झाला नसून बळीराजा त्रस्त असल्यामुळे माता रत्नेश्वरीला साकडे घालण्यासाठी अमरनाथ यात्री संघ,भाजप, लायन्स तर्फे रविवार दि.३०जुन रोजी सकाळी ६ वाजता २३ व्या रत्नेश्‍वरी पाऊस दिंडीचे आयोजन करण्यात आले असून रत्नेश्‍वरी गडावर अमरनाथ यात्रेकरू हजारो बिया,कोयी पेरणार असल्याची माहिती संयोजक धर्मभूषण अ‍ॅड.दिलीप ठाकूर यांनी दिली आहे. बालाजी मंदिर हनुमानटेकडी येथून सुरू होणार्‍या या पाऊस दिंडीचे यंदाचे तेविसावे वर्षे आहे.तेविसावी अमरनाथ यात्रा ५ जुलै ला व चोवीसावी अमरनाथ यात्रा १९ जुलैला दिलीप ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली नांदेडहून रवाना होणार आहे. अवघड असलेली अमरनाथ यात्रा सुलभ व्हावी या दृष्टीने ३ महिन्यापासून पायी चालण्याचा व प्राणायामचा सराव दिलीप ठाकूर हे दरवर्षी घेतात. यात्रेकरूंची तयारी कितपत झाली याची चाचपणी या पाऊस दिंडी मध्ये करण्यात येते. रस्त्यामध्ये जागोजागी...
राष्ट्रीय अनुसूचित जनजाती आयोगाकडून यवतमाळच्या जिल्हाधिकाऱ्याला नोटीस -NNL

राष्ट्रीय अनुसूचित जनजाती आयोगाकडून यवतमाळच्या जिल्हाधिकाऱ्याला नोटीस -NNL

नांदेड, महाराष्ट्र
किनवट, परमेश्वर पेशवे। नांदेड व यवतमाळ जिल्ह्यातील 95 गावातील आदिवासी शेतकऱ्यांना देशोधडीला लावणाऱ्या निम्न पैनगंगा चिमटा धरण प्रकल्प कामाला पेसा कायदा डावलून मंजुरी दिल्या प्रकरणी एक चिमटा धरण रद्द करण्यात यावे यासाठी राष्ट्रीय अनुसूचीत जनजाती आयोग दिल्ली यांनी गंभीर दखल घेतली असून या संदर्भात पंधरा दिवसात उत्तर जिल्हाधिकारी यवतमाळ यांनी देण्याची नुकतीच नोटीस बजावली आहे. निम्न पैनगंगा चिमटा धरण प्रकल्प पुढील क्षेत्रात नांदेड व यवतमाळ जिल्ह्यातील 95 गावे येत असून 42 गावे अनुसूचित आदिवासी पेसा क्षेत्रातील असून त्यापैकी 18 अनुसूचित आदिवासी पेसा गावांची जमीन अधिग्रहणाची महाराष्ट्र राज्य सरकारकडून अधिसूचना 11 1 जारी करण्यात आली आहे. त्या 18 गावांपैकी 17 गावे अनुसूचित आदिवासी क्षेत्र पेसा अंतर्गत येतात यामधील 11 गावे यवतमाळ जिल्ह्यातील तर नांदेड जिल्ह्यातील 7 गावांचा समावेश आहे. पुनर्वसन, भू...
किटकनाशक कंपन्यांच्या मनमानी विरोधात शेतकरी व व्यापाऱ्यांचा मोर्चा यशस्वी-NNL

किटकनाशक कंपन्यांच्या मनमानी विरोधात शेतकरी व व्यापाऱ्यांचा मोर्चा यशस्वी-NNL

नांदेड
नांदेड। सिटु जिल्हा कमिटीच्या वतीने अदामा, गोदरेज, एमएमसी, बीएएसएफ या कीटनाशक कंपन्या बेकायदेशीर रित्या नवा मोंढा येथील व्यापारी सचिन कासलीवाल यांच्या दुकानांमध्ये जिल्हा कृषी अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीत कासलीवाल यांच्या दुकानाची तपासणी करून अवमान केल्याच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढत निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांना निवेदन देण्यात आलेयावेळी व्यापारी सचिन कासलीवाल यांच्यासह सिटु संघटनेचे अध्यक्ष उज्वला पडलवार, जनरल सेक्रेटरी गंगाधर गायकवाड, पप्पू जाधव, संतोष गव्हाणे, पंजाब काळे, बालाजी आबादार, रणजीत देशमुख आदींसह सिटु संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या मोर्चा व निवेदनाव्दारे अदामा, गोदरेज, एफएमसी, बीएएसएफ सारख्या किटक नाशके कंपन्या बेकायदेशीरस्यिा पेस्टीसाईड दुकानांमध्ये तपासणी करीत आहेत आणि त्यांच्या सोबत कृषी विभागाचे कुणीही अधिका...
सामाजिक न्याय दिनानिमित्त समता दिंडी व व्याख्यान – NNL

सामाजिक न्याय दिनानिमित्त समता दिंडी व व्याख्यान – NNL

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड| समाज कल्याण कार्यालयाच्यावतीने आज राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या 150 व्या जयंती निमित्त सामाजिक न्याय दिन साजरा करण्यात आला. सामाजिक न्याय दिनानिमित्त आज सकाळी 8 वाजता समता दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. या दिंडीस आमदार बालाजी कल्याणकर व सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगिरे यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून सुरवात करण्यात आली. या दिंडीच्या माध्यमातून सामाजिक न्यायाचा संदेश देत राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या विचारांचा जागर करण्यात आला. सुरवातीला आमदार बालाजी कल्याणकर व सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगिरे यांनी महात्मा ज्योतीबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या पुर्णाकृती पुतळयास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. या समता दिंडीचा मार्ग महात्मा ज्योतिबा फुले पुतळा स्नेहनगर ते छत्रपती राजर्षी शाहू महाराज पुतळा असा होता. या दिंडीत आमदार बालाजी कल्याणकर, सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगिरे, जिल्...
शेतकऱ्यांनो पेरणीची घाई करू नका : जिल्हाधिकारी अभिजीत राऊत – NNL

शेतकऱ्यांनो पेरणीची घाई करू नका : जिल्हाधिकारी अभिजीत राऊत – NNL

नांदेड
नांदेड| जमिनीत ओल धरून ठेवेल असा मुरवणी पाऊस अद्याप जिल्ह्यामध्ये सर्वदूर झालेला नाही. त्यामुळे पेरणीसाठी घाई करू नका. मुबलक पाऊस झाल्यानंतरच पेरणीला सुरुवात करावी. अद्यापही पेरणी करण्याचे दिवस गेलेले नाहीत, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे. जिल्ह्यामध्ये ग्रामीण भागात काही ठिकाणी शेतकऱ्यांनी पावसाची वाट न बघता पेरणीला सुरुवात केली आहे. मात्र जमिनीत चांगले पाणी मुरल्याशिवाय उत्तम पाऊस झाल्याशिवाय अशा पद्धतीचे धाडस करणे चुकीचे ठरू शकते, असा सल्ला कृषी विभागाने दिला आहे. त्यामुळे कृषी तज्ञाच्या सल्ल्यावरून जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी अजूनही पेरणीसाठी वाट बघितली जाऊ शकते. तूर्तास पेरणी करू नका,असे आवाहन जिल्ह्यातील शेतकऱ्यांना केले आहे. जिल्ह्यात नायगाव, उमरी, हदगाव, भोकर, देगलूर, माहूर, हिमायतनगर आदि तालुक्यामध्ये अद्यापही 100 मिलीमिटर पेक्षा कमी पाऊस झाला आहे. संपू...
आत्महत्याग्रस्त कुटुंबाना जिल्‍हाधिकाऱ्यांच्या हस्ते कृषि निविष्ठा सामुग्रीचे वाटप – NNL

आत्महत्याग्रस्त कुटुंबाना जिल्‍हाधिकाऱ्यांच्या हस्ते कृषि निविष्ठा सामुग्रीचे वाटप – NNL

नांदेड
नांदेड| जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त कुटुबांना उत्पादन खर्च कमी करण्यासाठी वापरावयाच्या संवेदनशील कृषि निविष्ठा सामुग्रीचे (क्रिटीकल इनपुट किट) चे वाटप आज जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्‍हाधिकारी अभिजित राऊत यांचे हस्ते प्रातिनिधीक स्वरुपात करण्यात आले. यावेळी जिल्‍हा अधिक्षक कृषि अधिकारी तथा प्रकल्‍प संचालक (आत्‍मा) भाऊसाहेब बऱ्हाटे, व्यवस्थापक नाबार्ड दिलीप दमयावार, जिल्हा कृषि अधिकारी जिल्हा विजय बेतीवार, उपविभागीय कृषि अधिकारी दत्तकुमार कळसाईत, नोडल अधिकारी (स्मार्ट प्रकल्प) तथा प्रकल्प उपसंचालक (आत्मा), अनिल शिरफुले, तालुका कृषि अधिकारी, एस. बी. मोकळे, कृषि सहाय्यक, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक सी डी कदम व आत्माचे श्रीहरी बिरादार व नंदीग्राम शेतकरी उत्पादक कंपनीचे संदीप डाकुलगे, के-फर्टस लॅबचे बी. बी. पेंडकर व नांदेड तालुक्यातील मौजे. तळणी येथील आत्महत्याग्रस्त कुटूंबीय उपस्थित होते. ...
error: Content is protected !!