Sunday, July 5

नांदेड

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

‘रिव्हर्ट बॅक’ची विद्यार्थ्यांनी संधी 30 जूनपर्यंत ऑनलाईन सादर करता येणार अर्ज – NNL

‘रिव्हर्ट बॅक’ची विद्यार्थ्यांनी संधी 30 जूनपर्यंत ऑनलाईन सादर करता येणार अर्ज – NNL

नांदेड
नांदेड| शैक्षणिक सत्र 2023-24 मध्ये महाडीबीटी या ऑनलाईन पोर्टलवर शिष्यवृत्ती योजनेस पात्र असणा-या काही विद्यार्थ्यांकडून अनभिज्ञतेमुळे ‘राईट टू गिव्ह अप’ हा विकल्प नजरचुकीने, अनावधानाने निवडण्यात आलेला आहे. महाडीबीटी पोर्टलवर ज्या विद्यार्थ्यांकडून अनवधानाने अथवा नजरचुकीने राईट टू गिव्ह अप हा पर्याय निवडून त्यांचे शिष्यवृत्तीचे अर्ज रद्दबातल झाले असतील केवळ अशा विद्यार्थ्यांना शासनातर्फे 30 जूनपर्यंत अंतिम संधी देण्यात आलेली आहे. विद्यार्थ्याने आपल्या महाविद्यालयाच्या प्राचार्याशी संपर्क साधून महाविद्यालयांच्या प्राचार्य लॅाग ईनमधून आपला अर्ज रिव्हर्ट बॅक करून घेणे आवश्यक आहे. रिव्हर्ट बॅक झालेला अर्ज विहित वेळेत विद्यार्थ्याच्या लॅाग इन मधून ऑनलाईन फेरसादर करणे आवश्यक राहील. विहित वेळेत विद्यार्थ्याने अर्ज फेरसादर न केल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी विद्यार्थ्यांची राहील. विहीत वेळेत या...
घरकुल लाभार्थ्यांना दगड व मातीमिश्रित वाळूसाठा पुरविल्या प्रकरणी आमरण उपोषण -NNL

घरकुल लाभार्थ्यांना दगड व मातीमिश्रित वाळूसाठा पुरविल्या प्रकरणी आमरण उपोषण -NNL

नांदेड, क्राईम
श्रीक्षेत्र माहूर, राज ठाकूर। शासनाने प्रधानमंत्री आवास योजना व रमाई घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांना मोफत वाळूसाठा पुरविण्याचे नवीन धोरण राबविले आहे.त्यानुसार माहुर तालुक्यातील केरोळी येथील वाळूडेपो मधून घरकुल धारकांना दगड व मातीमिश्रित वाळू पुरविल्याच्या निषेधार्थ शिवसेनेचे तालुका संघटक विनोद सुर्यवंशी पाटील व सोशल मीडिया प्रमुख प्रशांत पुरी यांनी दि.२७ जून पासून तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. विविध योजनेच्या घरकुल लाभार्थ्यांच्या माथी दगड व मातीमिश्रित वाळूसाठा मारल्या प्रकरणी सुरू केलेल्या आमरण उपोषणाला भाजप तालुकाध्यक्ष कांतराव घोडेकर,तालुका सरचिटणीस अपील बेलखोडे, माजी सभापती नामदेव कातले,वंचित बहुजन आघाडीचे दादाराव गायकवाड, शिवसेना नेत्या टीपकर यांनी भेट देऊन आपला पाठींबा घोषित केला. सर्वच घरकुल लाभार्थ्यांना ५ ब्रास दर्जेदार वाळूसाठा उपलब्ध करून द्या, वाळू ड...
शेतकरी,कष्टकरी व छोटे कृषी केंद्र चालकांच्या हक्कासाठी लढा उभारणार – सचिन कासलिवाल -NNL

शेतकरी,कष्टकरी व छोटे कृषी केंद्र चालकांच्या हक्कासाठी लढा उभारणार – सचिन कासलिवाल -NNL

नांदेड
नांदेड। किटकनाशक क्षेत्रातील मोठ्या कंपन्या असलेल्या अदामा, गोदरेज, एमएमसी, बीएएसएफ या कीटनाशक कंपन्या आपल्या मनमानी कारभारानुसार शेतकरी हितास तिलांजली शेतकऱ्यांकडून मनमानी किंमत वसूल करण्यासाठी बेकायदेशिर रित्या कृषी केंद्र चालकांवर सक्ती करण्यात येत आहे. आज घडीला किटक नाशकाचे दर मोठ्या प्रमाणात आहेत.तसेच शेतकी औषधे विक्रीमध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता होत आहे. औषधी उत्पादन किमतीपेक्षा १००% ते ५००% जास्त दराने शेतकऱ्यांना माल विक्री केला जात आहे यासर्व बाबींवर आपण जाकिटकनाशक कंपन्यांच्या मनमानी विरोधात जन जागृती करणारा मोठा लढा उभारणार असल्याचे सचिन कासलीवाल यांनी यावेळी सांगितले. पुढे ते म्हणाले की, अदामा, गोदरेज, एफएमसी, बीएएसएफ सारख्या किटक नाशके कंपन्या बेकायदेशीरस्यिा पेस्टीसाईड दुकानांमध्ये तपासणी करीत आहेत आणि त्यांच्या सोबत कृषी विभागाचे कुणीही अधिकारी किया कर्मचारी उपस्थित रा...
सेंद्रीय शेतीसाठी पूरक यंत्रणा निर्माणासाठीची सेंद्रीय शेती तज्ञ हर्षल जैन यांची मागणी..! -NNL

सेंद्रीय शेतीसाठी पूरक यंत्रणा निर्माणासाठीची सेंद्रीय शेती तज्ञ हर्षल जैन यांची मागणी..! -NNL

नांदेड
नांदेड। शेतकरी फामर्स प्रोड्युसर कं. लि. सन २०२४-२५ वर्षासाठी सेंद्रीय एनपिओपी मानकानुसार प्रमाणित झाली आहे कंपनीचे ४८ शेतकरी सदस्य आहेत. तसेच नदिड जिल्ह्यातील विविध तालुक्यातून अनेक सेंद्रिय शेतकरी आमच्या सोवत सभासद होत आहेत. त्यानुसार भविष्यातही आम्ही हि सेंद्रिय शेती चळवळ आपल्या जिल्ह्यात राबवावी यासाठी शेतकरी फार्मर्स प्रोड्युसर च्या वतीने कंपनीचे संचालक श्री भगवान इंगोले व जी - नेक्स्ट ऑर्गानिक सेल्स अँड सर्विसेस चे संचालक श्री हर्षल जैन यांनी सेंद्रिय शेतीसाठी पूरक असलेल्या विविध मागण्यांचे निवेदन आत्मा चे प्रकल्प संचालक भाऊसाहेब बोराटे यांना देण्यात आले आहे. या निवेदनाव्दारे सेंद्रीय उत्पादित भाजीपाला तसेच इतर उत्पादने विक्रीसाठी कायमस्वरुपी नांदेड शहर व तालुका ठिकाणी स्वतंत्र जागा उपलब्ध करुन देण्याबरोबरच सेंद्रिय शेतकऱ्यांना निंबोळी भरडण्यासाठी मशीन अनुदानात्मक उपलव्ध करुन द्या...
वाशी गावाजवळील सिमेंट रस्त्यावर स्टील वापरले नाही शासनाच्या अंदाज पत्रकाला फाटा -NNL

वाशी गावाजवळील सिमेंट रस्त्यावर स्टील वापरले नाही शासनाच्या अंदाज पत्रकाला फाटा -NNL

नांदेड, महाराष्ट्र
हिमायतनगर| तालुक्यातील एकघरी, बिरसा मुंडा चौक अंतर्गत रस्त्यावर वाशी गावाजवळ सिमेंट रस्ता बनविण्यात आला आहे. या कामात स्टील वापरणे अनिवार्य होते. परंतू ठेकेदारांनी तसे न करता नुसते सिमेंट काँक्रीटचे थातुर माथूर तेही अत्यल्प मटेरियलचा वापर करूण काम पुर्ण केले आहे. या कामाबाबत असंख्य तक्रारी होवूनही प्रशासनाकडून गंभीर दखल घेतली जात नसल्याने मोठे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या रस्ता कामाची चौकशी गुलदस्त्यात ठेऊन उपअभियंत्याकडून ठेकेदारचे देयके काढण्याचा प्रयत्न सुरु असल्यामुळे तक्रारकर्ते दत्ता शिराणे हे आमरण उपोषण करण्याच्या मार्गावर आहे. नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यातील तेलंगणा बॉर्डरकडे जाणाऱ्या एकघरी, बिरसा मुंडा चौक ते वाशी या अंतर्गत रस्त्यांच्या कामासाठी शासनाकडून ५ कोटी रूपयांचा विकास निधी मंजूर झाला. आणी या कामाची प्रत्यक्षात सुरूवात झाली ठेकेदाराने दिलेल्या मुदतीपूर्वी र...
कंत्राटी शिपाई पदाच्या भरतीसाठी संस्थानी 10 जुलैपर्यत अर्ज करण्याचे आवाहन – NNL

कंत्राटी शिपाई पदाच्या भरतीसाठी संस्थानी 10 जुलैपर्यत अर्ज करण्याचे आवाहन – NNL

नांदेड
नांदेड| जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, नांदेड या कार्यालयासाठी सहा महिन्यासाठी कंत्राटी तत्वावर शिपाई पदाची भरती (शिपाई पदासाठी कामवाटप) करावयाची आहे. ज्या नोंदणीकृत सेवा सोसायट्यांनी नोंदणी प्रमाणपत्र अद्ययावत केले आहे आणि ज्या संस्थेचे ऑडीट रिपोर्ट अद्यायावत आहे अशा संस्थांनी त्यांचे प्रस्ताव 10 जुलै 2024 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यत जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रास सादर करावेत, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाच्या सहाय्यक आयुक्त रेणूका तम्मलवार यांनी केले आहे. बेरोजगारांच्या सेवा सहकारी सोसायट्यांना आर्थिकदृष्टया सक्षम करण्याच्या उद्देशाने 3 लाख इतक्या रकमेची कामे विनानिविदा उपलब्ध करुन देण्यासाठी रोजगार व स्वयंरोजगार विभागात शासन निर्णयान्वये कामवाटप समिती स्थापन करण्यात आली आहे . त्या अनुषंगाने कामवाटप समितीकडे कौ...
प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे तालुक्याच्या ठिकाणी शिकाऊ व पक्के अनुज्ञप्ती शिबिराचे आयोजन -NNL

प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे तालुक्याच्या ठिकाणी शिकाऊ व पक्के अनुज्ञप्ती शिबिराचे आयोजन -NNL

नांदेड
नांदेड| प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे शिकाऊ व पक्के अनुज्ञप्ती साठी माहे जुलै ते डिसेंबर 2024 या कालावधीत तालुका शिबिर कार्यालयाचे आयोजन करण्यात येणार आहे. या शिबिरासाठी जागा उपलब्धतेच्या आधीन राहून ऑनलाईन अपॉईटमेंट महिना सुरुवात होण्याच्या 5 दिवस आधी कार्यालयीन वेळेत सुरु करण्यात येईल. तरी अपॉईटमेंट घेतलेल्या अर्जदारांनी यांची नोंद घेवून शिबिर कार्यालयास उपस्थित राहावे, असे आवाहन प्रभारी सहा. प्रादेशिक परिवहन अधिकारी रेणुका राठोड यांनी केले आहे. तालुकानिहाय कॅम्पचे ठिकाण व दिनांक पुढीलप्रमाणे आहे. कंधार येथे 3 जुलै, 2 ऑगस्ट, 3 सप्टेंबर, 3 ऑक्टोबर, 4 नोव्हेंबर, 4 डिसेंबर रोजी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. धर्माबाद येथे 8 जुलै, 7 ऑगस्ट, 6 सप्टेंबर, 7 ऑक्टोबर, 7 नोव्हेंबर, 6 डिसेंबर या दिवशी आयोजन करण्यात आले आहे. किनवट येथे 10 जुलै, 9 ऑगस्ट, 10 सप्टेंबर, 10 ऑक्टोबर, 11 नोव्हेंबर, 10 ...
प्रत्येक स्टॉलवर लोकराज्य अंक उपलब्ध विद्यार्थी, अभ्यासक व शाळांनी मागणी करावी -NNL

प्रत्येक स्टॉलवर लोकराज्य अंक उपलब्ध विद्यार्थी, अभ्यासक व शाळांनी मागणी करावी -NNL

नांदेड
नांदेड| राज्य शासनाचे मुखपत्र असलेले लोकराज्य हे शासकीय योजना व महत्वाची माहिती देणारे मासिक आहे. स्पर्धा परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना अत्यंत उपयुक्त असलेले लोकराज्य नव्या जोमाने प्रसिध्द होणार असून प्रत्येक विद्यार्थ्यांनी, अभ्यासक, लेखक व सर्व क्षेत्रातील मान्यवरांनी आपला अंक राखून ठेवावा , असे आवाहन जिल्हा माहिती अधिकारी प्रवीण टाके यांनी केले आहे. आज पहाटे नांदेड जिल्ह्यातील वृत्तपत्र वितरण संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी त्यांनी संवाद साधला. यावेळी महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघाचे कार्याध्यक्ष तथा नांदेड जिल्ह्याचे अध्यक्ष बालाजी पवार, राज्य संघटनेचे कार्यकारी सदस्य चंद्रकांत घाटोळ, उपाध्यक्ष गणेश वडगावकर, कोषाध्यक्ष बाबू जल्देवार सह पदाधिकारी व वृत्तपत्र विक्रेते मोठ्या संख्येने उपस्थित होते. लोकराज्यचा अंक प्रत्येक स्टॉलवर उपलब्ध केल्यास विद्यार्थ्यांना सहज खरेदी करणे शक्य ...
शिवछत्रपती क्रीडापीठांतर्गत विविध क्रीडा प्रबोधीनीत सरळ प्रवेश व खेळनिहाय कौशल्य चाचणीद्वारे निवासी व अनिवासी प्रवेश प्रक्रिया  -NNL

शिवछत्रपती क्रीडापीठांतर्गत विविध क्रीडा प्रबोधीनीत सरळ प्रवेश व खेळनिहाय कौशल्य चाचणीद्वारे निवासी व अनिवासी प्रवेश प्रक्रिया -NNL

नांदेड, स्पोर्ट्स
नांदेड| राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडविण्यासाठी राज्यात प्रतिभावंत खेळाडूंची निवड करुन शास्त्रोक्त प्रशिक्षण, शिक्षण, भोजन, निवास, अद्ययावत क्रीडा सुविधा, क्रीडा प्रबोधीनीच्या अंतर्गत खेळाडूंना देण्यात येत आहेत. राज्यातील क्रीडा प्रबोधीनीमध्ये सरळ सेवा प्रवेश व खेळनिहाय कौशल्य चाचण्यांद्वारे निवासी व अनिवासी खेळाडूंना प्रवेश देण्यात येणार आहे. यासाठी चाचण्यांचे आयोजन करण्याचे प्रस्तावित करण्यात येत आहे. तरी जिल्हयातील खेळाडूंनी चाचणीसाठी आपले अर्ज 5 जुलै, 2024 पर्यंत श्रीमती शिवकांता देशमुख (राज्य क्रीडा मार्गदर्शक ॲथलेटिक्स-9657092794 ) यांचेकडे सादर करावेत, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेंभरे यांनी केले आहे. क्रीडा प्रबोधीनीमध्ये सरळसेवा प्रवेश प्रक्रिया या खेळनिहाय कौशल्य चाचणीबाबत अर्हता खालीलप्रमाणे आहे. खेळनिहाय प्रवेश मर्यादा विचारात घेऊन प्रवेश देण्यात ये...
बांबू लागवड शेतकऱ्यांच्या फायद्याची; शेतकऱ्यांनी बांबू लागवडीसाठी पुढाकार – जिल्हाधिकारी – NNL

बांबू लागवड शेतकऱ्यांच्या फायद्याची; शेतकऱ्यांनी बांबू लागवडीसाठी पुढाकार – जिल्हाधिकारी – NNL

नांदेड
नांदेड| बांबू जगातील सगळयात वेगाने वाढणारी व एक बहुपयोगी वनस्पती आहे. मानवी जीवनात विविधांगी उपयोग असणाऱ्या बांबू या वनस्पतीमध्ये महाराष्ट्रातल्या हजारो गावांचे अर्थकारण, रोजगार निर्मिती, कृषि संपन्नता, किफायतशिर घरबांधणी, फर्निचर, इंधन, ऊर्जा, हस्तव्यवसाय, निसर्ग पर्यटन, औषध अन्न प्रक्रीया, उद्योग इ. बांबू लागवडीमुळे शेतकऱ्यांना आर्थिक फायद्या निश्चित होणार असून यासोबत पर्यावरणाचे रक्षण व संवर्धन होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी बांबू लागवड करण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे. बांबूच्या बहुउपयोगीत्वाबरोबरच त्याच्या आर्थिकदृष्टया असलेल्या महत्वामुळे त्यास हिरवे सोने समजले जाते. मानव जातीच्या लाकूड विषयक मुलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी सहज उपलब्ध होणारी व परवडणारी ही वनस्पती डोंगराळ व सपाट प्रदेशात आढळून येते. जलदगतीने वाढणारी, सदाहरित व दीर्घा...
error: Content is protected !!