Homeनांदेड‘रिव्हर्ट बॅक’ची विद्यार्थ्यांनी संधी 30 जूनपर्यंत ऑनलाईन सादर करता येणार अर्ज -...

‘रिव्हर्ट बॅक’ची विद्यार्थ्यांनी संधी 30 जूनपर्यंत ऑनलाईन सादर करता येणार अर्ज – NNL

नांदेड| शैक्षणिक सत्र 2023-24 मध्ये महाडीबीटी या ऑनलाईन पोर्टलवर शिष्यवृत्ती योजनेस पात्र असणा-या काही विद्यार्थ्यांकडून अनभिज्ञतेमुळे ‘राईट टू गिव्ह अप’ हा विकल्प नजरचुकीने, अनावधानाने निवडण्यात आलेला आहे. महाडीबीटी पोर्टलवर ज्या विद्यार्थ्यांकडून अनवधानाने अथवा नजरचुकीने राईट टू गिव्ह अप हा पर्याय निवडून त्यांचे शिष्यवृत्तीचे अर्ज रद्दबातल झाले असतील केवळ अशा विद्यार्थ्यांना शासनातर्फे 30 जूनपर्यंत अंतिम संधी देण्यात आलेली आहे.

विद्यार्थ्याने आपल्या महाविद्यालयाच्या प्राचार्याशी संपर्क साधून महाविद्यालयांच्या प्राचार्य लॅाग ईनमधून आपला अर्ज रिव्हर्ट बॅक करून घेणे आवश्यक आहे. रिव्हर्ट बॅक झालेला अर्ज विहित वेळेत विद्यार्थ्याच्या लॅाग इन मधून ऑनलाईन फेरसादर करणे आवश्यक राहील. विहित वेळेत विद्यार्थ्याने अर्ज फेरसादर न केल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी विद्यार्थ्यांची राहील. विहीत वेळेत यासंबंधाने आवश्यक कार्यवाही करण्याची दक्षता घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी व संपर्कासाठी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण विभाग, नांदेड संपर्क साधावा.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments