Monday, July 6

नांदेड

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

हिमायतनगर तालुक्यातील पारवा खुर्द ते पोटा बु. रस्त्यावर अल्प पाऊस होताच चिखलाचे साम्राज्य विद्यार्थिनीसह नागरिक त्रस्त – NNL

हिमायतनगर तालुक्यातील पारवा खुर्द ते पोटा बु. रस्त्यावर अल्प पाऊस होताच चिखलाचे साम्राज्य विद्यार्थिनीसह नागरिक त्रस्त – NNL

नांदेड
हिमायतनगर| तालुक्यातील मौजे पारवा खुर्द ते पोटा बु.कडे जाणाऱ्या रस्त्यावर अल्पसा पाऊस होताच मोठ्याप्रमाणात चिखल होत आहे. परिणामी पोटा बु. येथे शिक्षणासाठी येणार्या विद्यार्थिनीसह नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. हि समस्या लक्षात घेता लोकप्रतिनिधीं व प्रशासनाने दखल घेऊन गावाजवळील रस्त्यासाठी मंजूर घेऊन रास्ता चांगला करून द्यावा अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे . नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यातील मौजे पारवा खुर्द येथील नागरिकांना बाजारासाठी पोटा बु. येथे येऊन बसने व खाजगी वाहनातून भोकर व हिमायतनगर येथे जावे लागते. तर विद्यार्थिनी विद्यार्थ्याना शिक्षणासाठी पोटा बु जवळगाव हिमायतनगर भोकर येथे जावे लागते. मात्र सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने काही रिमझिम पाऊस बरसात असल्याने पारवा गावाजवळील रास्ता चिखलमय होत आहे. त्यामुळे रस्त्याची घसररगुंडी होत असून, रस्त्याने पायी चालण्...
हिमायतनगर तालुक्यात खरिपाच्या पेरण्या अंतिम टप्प्यात ; दमदार पावसाची प्रतिक्षा – NNL

हिमायतनगर तालुक्यात खरिपाच्या पेरण्या अंतिम टप्प्यात ; दमदार पावसाची प्रतिक्षा – NNL

नांदेड
हिमायतनगर| तालुक्यात चांगल्या प्रकारे पाऊस बरसल्याने खरिपाच्या पेरणीला आता वेग आला आहे. जवळपास ७०% पेरण्या पुर्णत्वास आल्या असून, उर्वरित पेरण्या करण्यासाठी शेतकऱ्याची लगबग सुरू आहे. या वर्षी ३९ हजार ६४४ हेक्टर जमिनीवर खरिपाची पेरणी होणार आहे. यात नगदी पिक सोयाबीनचा पेरा एक नंबर राहणार असून, कपाशी दोन नंबर वर राहणार आहे. तालुक्यातील काही भागात म्हणावा तसा पाऊस झाला नसल्याने अनेक शेतकऱ्यानी सुरुवातीला केलेली पेरणी धोक्यात आली असून, त्यांच्यावर दुबार पेरणीची वेळ येणार आहे. नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यात ४९ हजार ६७८ हेक्टर भौगोलिक क्षेत्र असून पेरणीयोग्य क्षेत्र ३९ हजार ८७० हेक्टर आहे. गेल्या खरिप हंगामात ३९ हजार ६४४ हेक्टर वर खरिपाची पेरणी करण्यात आली होती. गेल्या वर्षी सर्वाधिक १९ हजार ८५७ हेक्टर वर नगदी पिक सोयाबीनचा पेरा करण्यात आला होता. तर कपाशीची लागवड १४ हजार २२४ हेक्टर वर ...
सेतू केंद्र चालकांनी अधिकचे शुल्क आकारल्यास लेखी स्वरुपात तक्रार नोंदवा – जिल्हाधिकारी अभिजीत राऊत – NNL

सेतू केंद्र चालकांनी अधिकचे शुल्क आकारल्यास लेखी स्वरुपात तक्रार नोंदवा – जिल्हाधिकारी अभिजीत राऊत – NNL

नांदेड
नांदेड| मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना शासनाच्यावतीने नुकतीच सुरु केली आहे. या योजनेत अर्ज करताना नागरिकांना विविध प्रमाणपत्राची आवश्यकता भासणार आहे. ही प्रमाणपत्र, दाखले काढण्यासाठी नागरिकांनी नजीकच्या आपले सरकार सेवा केंद्रावर जावून अर्ज करुन काढून घ्यावेत. ही प्रमाणपत्र काढण्यासाठी सेतू केंद्र चालकांनी निर्धारित सेवा शुल्का व्यतिरिक्त इतर कोणतेही शुल्क आकारल्यास नागरिकांनी संबंधित तहसिलदाराकडे लेखी स्वरुपात तक्रार नोंदवावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे. राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटूंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्याची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु करण्यास मान्यता दिली आहे. या योजनेमध्ये लाभ मिळण्यासाठी अर्जदाराने राज्याचे अधिवास प्रमाणपत्र (रहीवासी प्र...
एक पेड माॅं के नाम सामाजिक वनीकरण विभागाचा उपक्रम – NNL

एक पेड माॅं के नाम सामाजिक वनीकरण विभागाचा उपक्रम – NNL

नांदेड
उस्माननगर| सामाजिक वनीकरण विभाग नांदेड व परिक्षेत्र कंधार सामाजिक वनीकरण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने उस्माननगर येथील समता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या प्रांगणात "एक पेड माॅं के नाम " उपक्रम राबवून वृक्षारोपण करण्यात आले. वृक्ष लागवड ही चळवळ देशभरात मोठ्या प्रमाणात यशस्वी करण्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी " एक पेड माॅं के नाम " मोहिमाचा शुभारंभ केला व वृक्षारोपण कार्यक्रम जाहीर केला . परिक्षेत्र कंधार सामाजिक वनीकरण विभाग व वनविभागाच्या वतीने ३० सप्टेंबर दरम्यान वृक्षारोपण लागवड मोहीम राबविण्यात येत आहे. सामाजिक वनीकरण विभाग नांदेड संदीप चव्हाण, सहाय्यक वनसंरक्षक श्रीकांत जाधव, वनपरिक्षेत्र अधिकारी शितल डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली " एक पेड माॅं के नाम " वन महोत्सव अंतर्गत मौजे उस्माननगर येथील समता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील वृक्ष लागवडी बाबत वृक्ष दि...
किनवट पंचायत समिती मनरेगाच्या विभागाच्या कारभाराला जनता वैतागली  – NNL

किनवट पंचायत समिती मनरेगाच्या विभागाच्या कारभाराला जनता वैतागली – NNL

नांदेड
किनवट, परमेश्वर पेशवे| किनवट पंचायत समितीच्या "मनरेगा" विभागाचे सहायक कार्यक्रम अधिकारी (एपीओ), कनिष्ठ अभियंता व संगणक चालकांच्या कारभाराला आता जनता वैतागली आहे. मनसे जिल्हाध्यक्ष रवि राठोड यांनी माहितीच्या अधिकारातून माहिती मागितल्यानंतर कसलाही प्रतिसाद मिळत नाही. जवळपास शेतकर्‍यांच्या विहिरी, पाणंदरस्त्यासह विविध विकास कामांचा कारभाराची चावी त्यांच्याच हाती असल्याने हा विभाग सर्वाधिक भ्रष्टाचाराचे कुरण ठरले आहे. पारदर्शी प्रशासनाचा आव आणणार्‍या गटविकास अधिकार्‍यांनी किमान शेतकर्‍यांची तरी लूट होणार नाही याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे अनेक सामाजिक कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. किनवट पंचायत समितीच्या कार्यकक्षेत जवळपास चारशे विहिरींच्या आसपास अत्यल्प भूधारक, अल्पभूधारकांशिवाय अन्य लाभार्थी शेतकर्‍यांचा अंतर्भाव आहे. पाणंदरस्त्याचीही कामे मोठ्या प्रमाणात अाहेत. सहायक कार्यक्रम अधिकारी (ए...
अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांतील लाभार्थ्यांनी मार्जिन मनी योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन – NNL

अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांतील लाभार्थ्यांनी मार्जिन मनी योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन – NNL

नांदेड
नांदेड| केंद्र शासनाच्या स्टँड अप इंडिया योजनेत अनुसूचित जाती व नवबौध्द समाजाच्या घटकांसाठी मार्जिन मनी योजना सुरु करण्यात आलेली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी अटी व शर्ती निश्चित करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील या योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक लाभार्थ्यांनी समाज कल्याण कार्यालयाचे समाज कल्याण निरीक्षक एस.एम.कदम (मो. क्र. 8830316553) यांचेशी संपर्क साधावा, असे आवाहन सहायक आयुक्त शिवानंद मिनगिरे यांनी केले आहे. अनुसूचित जातीच्या उद्योजकांने हाती घेतल्याचा प्रकल्पाचा प्रकल्प अहवाल व अर्जदारास बँकेने प्रकल्पासाठी कर्ज मंजुर केलेले असावे. तसेच अर्जदाराकडे उद्योग आधार, मागील तीन वर्षाचे विवरण, यापुर्वी इतर शासनाच्या योजनांचा लाभ घेतला नसल्याचे शपथपत्र, तसेच पाचशे रुपयाच्या बाँडपेपरवर दोन साक्षीदारांच्या सहयासह हमीपत्र, प्रकल्पाव्दारे उत्पादित होणाऱ्या वस्तु, उत्पादन याबाबत विक्रेत्याचे मागणी...
विविध विकास कामामुळे इरेगाव सारख्या खेडेगावाची समृद्धीकडे वाटचाल -NNL

विविध विकास कामामुळे इरेगाव सारख्या खेडेगावाची समृद्धीकडे वाटचाल -NNL

नांदेड
किनवट, परमेश्वर पेशवे। अतिदुर्गम आदिवासी बहुल व अविकसित समजल्या जाणाऱ्या व जेमतेम 721 मतदान असणाऱ्या इरेगाव सारख्या खेडेगावाने आता विकासाची कात टाकली . गेल्या वीस ते पंचवीस वर्षाच्या कालावधीमध्ये दुर्गम भागात असणाऱ्या इरेगाव सारख्या गावांना विकासापासून कोसोदूर राहावे लागले होते. त्यातच ग्रामपंचायतला पुरेसा निधी मिळत नसल्याने या गावाच्या विकासास चालना मिळत नव्हती. त्यामुळे उन्हाळा असो की पावसाळा की हिवाळा या तिन्ही ऋतूमध्ये येथील लोकांना घाणीचा व दुर्गंधीचा सामना करावा लागत होता. व चिखलातून रस्त्याची वाट काढावी लागत होती. त्यातच येतील महिला सरपंच सौ रत्नमाला अमोल गोरे उपसरपंच श्रीराम गंटलवाड गावचे ग्रामसेवक जी एन धसकनवाड यांच्या प्रयत्नातून महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत 30 लाख रुपये चा रस्ते बांधकामासाठी निधी प्राप्त झाला. त्याचबरोबर पाणीपुरवठा घनकचरा व्यवस्थापन...
पावसाळयात धोकादायक ठिकाणी ग्रुप फोटो व सेल्फी काढण्यास प्रतिबंध -NNL

पावसाळयात धोकादायक ठिकाणी ग्रुप फोटो व सेल्फी काढण्यास प्रतिबंध -NNL

नांदेड
नांदेड| नांदेड जिल्ह्यात आगामी पावसाळयातील पूर परिस्थिती, अतिवृष्टी सारख्या घटनेच्या अनुषंगाने नदीपात्र परिसर, जलाशय, पूरपरिस्थीती पुलावर, रस्त्यांवर तसेच पर्यटन स्थळावर काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 प्रमाणे याठिकाणी प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून 1 जुलै 2024 पासून 30 ऑगस्ट 2024 चे मध्यरात्री पर्यंत घोषित करण्यात आले आहे. त्याबाबत जिल्हादंडाधिकारी अभिजीत राऊत यांनी आदेश निर्गमित केले आहेत. नांदेड जिल्ह्यात आगामी पावसाळयातील पूरपरिस्थिती, अतिवृष्टी सारख्या घटनेच्या वेळी नदीपात्र परिसरात, जलाशयावर, पूर परिस्थिती जन्य पुलावर, रस्त्यांवर तसेच पर्यटन स्थळांवर जावून गर्दी करणे तसेच छोटी वाहने घेवून जाणे, शासनाने ठरवून दिलेल्या मर्यादा रेषा ओलांडून पुढे जाणे, धोकादायक ठिकाणी ग्रुप फोटो, सेल्फी काढणे इत्यादी बाबींना फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 14...
कॉम्रेडस् धावपटू चा सिग्माथॉन तर्फे सत्कार -NNL

कॉम्रेडस् धावपटू चा सिग्माथॉन तर्फे सत्कार -NNL

नांदेड
छत्रपती संभाजी नगर। नुकत्याच दक्षिण आफ्रिका येथे झालेल्या कॉम्रेड मॅरेथॉन मध्ये छत्रपती संभाजीनगर मधले ८ धावपटूनि आपला सहभाग नोंदवला व ८७ कि.मी ची मॅरेथॉन ठराविक वेळेत पूर्ण केली. हि मॅरेथॉन जगातील खडतर माराथोन मधली एक मनाली जाते. कारण कडक ऊन, पाऊस आणि थंड अशे विविध हवामानातून व धावण्यासाठी उंच डोंगराळ भाग देखील लागतो . जगभरातुन हजारोच्या संख्येने धावपटू सहभागी होतात . याचे एक सन्मान म्हणून सिग्माथॉन टीम तर्फे डॉ.उन्मेष टाकळकर, डॉ .मनीषा टाकळकर, . प्रमुख अतिथी डॉ. उज्वला दहिफळे, डॉ प्रफुल्ल जटाळे , श्री मधुकर जाधव श्री शेख रफी यांच्या हस्ते धावपटूनच सत्कार करण्यात आला होते . धावपटू श्री .भाऊसाहेच गवळी, श्री बालाजी नारागुडे,श्री. सुधीर कुलकर्णी,श्री. सतीश यादव ,श्री. उदय देशपांडे,श्री पंडित सोन्ने,श्री. तुषार प्रधान, श्री. प्रशांत राऊत. त्यासोबत एवरेस्ट बेस कॅम्प पूर्ण करणारे यांचे द...
सचिन कासलीवाल यांनी घेतली राजू शेट्टी व पंजाबराव डक यांची भेट -NNL

सचिन कासलीवाल यांनी घेतली राजू शेट्टी व पंजाबराव डक यांची भेट -NNL

नांदेड
नांदेड। येथील नवा मोंढ्यातील पेस्टीसाईड्चे नामाकिंत व्यापारी सचिन कासलीवाल यांनी किटकनाशक क्षेत्रातील मोठ्या कंपन्या असलेल्या अदामा, गोदरेज, एमएमसी, बीएएसएफ या कीटनाशक कंपन्या च्या मनमानी व शेतकरी हितास बाधक असलेल्या गळचेपी धोरणा संदर्भात स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी व हवामान तज्ञ पंजाबराव डक यांची भेट घेऊन त्यांना शेतकऱ्यांच्या प्रश्‍नावरील या लढ्यात सहभागी होण्याची विनंती केली. भेटी दरम्यान श्री सचिन कासलीवाल यांनी निदर्शनास आणून दिले की शेतकऱ्यांना पेस्टिसाइड कंपन्या जाणीव पूर्वक चढ्या दराने किटकनाशकं खरेदी करण्यास भाग पाडतात त्यासाठी मोठ्या कंपन्यांनी आपली यंत्रणा उभारली आहे आणि शेतकऱ्यांसाठी भविष्यात हा मोठा धोका असून कंपन्या म्हणतील त्या दराने किटकनाशकं खरेदी करावे लागतील यावर हवामान तज्ञ पंजाबराव डक यांनी सांगितले की याबाबत मी शेतकऱ्यांना माझ्या यूट्यूबचैनल,व्हा...
error: Content is protected !!