Monday, July 6

नांदेड

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

नव-याला जिवे मारण्याची धमकी देवून विवाहितेवर अत्याचार.. सिंदखेड पोलीसांत गुन्हा दाखल; आरोपीस अटक -NNL

नव-याला जिवे मारण्याची धमकी देवून विवाहितेवर अत्याचार.. सिंदखेड पोलीसांत गुन्हा दाखल; आरोपीस अटक -NNL

क्राईम, नांदेड
श्रीक्षेत्र माहूर, राज ठाकूर। नव-याला जिवे मारण्याची धमकी देवून विवाहितेवर अत्याचार केल्याची खळबजनक घटना दि. १ जुलै रोजी घडल्याचे उघडकीस आले असून याप्रकरणी सिंदखेड पोलीसांत गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपीस अटक करण्यात आली आहे.. माहूर तालुक्यातील सिंदखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मौजे सेलू - गंगाजीनगर येथील एका ३३ वर्षीय विवाहितेने सिंदखेड पोलीस ठाण्यात दिलेल्या जबाबाप्रमाणे ती विवाहिता दि. १ जुलै २०२४ रोजी सेलू वरून गंगाजीनगरकडे जात असताना सेलू येथील आरोपीच्या जुन्या घराजवळ ती महिला आल्यानंतर आरोपीने तिच्या नव-याला जिवे मारण्याची धमकी दिली. तद्नंतर त्या महिलेला आरोपीच्या रस्त्यालगत असलेल्या जुन्या घरी नेवून अत्याचार केल्याची फिर्याद सदर पिडीत विवाहीतेने सिंदखेड पोलीस ठाण्यात दिली आहे.. दरम्यान विवाहितेच्या तक्रारीवरून सिंदखेड पोलीस ठाण्यात गु.र.नं. ५७/२४ कलम ६४ (१), १२७ (२), ३५१ (२) (३)...
पत्रकार शेख इरफान यांच्यावर प्राण घातक हल्ला करणाऱ्या वर कारवाई करण्याची मागणी -NNL

पत्रकार शेख इरफान यांच्यावर प्राण घातक हल्ला करणाऱ्या वर कारवाई करण्याची मागणी -NNL

नांदेड, क्राईम
उमरखेड, अरविंद ओझलवार। येथील शेख इरफान यांच्यावर दिनांक 23 रोजी रात्री नऊच्या दरम्यान नांदेड रोडवरील एम के स्टार कॉम्प्लेक्स समोर वाढदिवस साजरा करून घरी जात असताना शेख मजहर शेख अलाउद्दीन शेख अजहर शेख अलाउद्दीन अरिष खतीब यांनी एकत्र येऊन शेख इरफान, पत्रकार यांच्यावर प्राणघातक करून हल्ला करून डोक्यावर चाकू मारून गंभीर जखमी केले व जीवे मारण्याची धमकी दिली. याविषयी उमरखेड पोलीस स्टेशनला तक्रार दिली परंतु उमरखेड पोलिसांनी आरोपींना वाचवण्यासाठी कारवाई केली नसल्याने पिढीत शेख इरफान यांनी मुख्यमंत्री गृहमंत्री जिल्हाधिकारी जिल्हा पोलीस अधीक्षक उपविभागीय अधिकारी उपविभागीय पोलीस अधिकारी तहसीलदार व सर्व संबंधितांना आरोपीवर कारवाही करावी अन्यथा दि.2/जुलैपासून आमरण उपोषण करणार असल्याचे कळविले होते. निवेदन देऊनही कारवाई ना झाल्याने आज दिनांक 02/07/2024 पासून आमरण उपोषण चालू केले आहे. हल्ले करणाऱ्...
राज्यातील 44 लाख 60 हजार विद्यार्थ्यांना शालेय गणवेश – मंत्री दीपक केसरकर – NNL

राज्यातील 44 लाख 60 हजार विद्यार्थ्यांना शालेय गणवेश – मंत्री दीपक केसरकर – NNL

नांदेड
मुंबई| केंद्र शासनाच्या समग्र शिक्षा योजने अंतर्गत तसेच राज्य शासनाच्या गणवेश योजने अंतर्गत शासकीय आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळांमध्ये इयत्ता 1 ली ते 8 वी मध्ये शिक्षण घेणाऱ्या सर्व विद्‌यार्थ्यांना प्रत्येकी दोन गणवेश मोफत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील 44 लाख 60 हजार विद्यार्थ्यांना याचा लाभ होणार असून, येत्या 30 जुलैपर्यंत सर्व शाळांमध्ये गणवेश पोहोचतील. गणवेशाची गुणवत्ता आणि दर्जा उत्कृष्ट असेल याची काळजी घेण्यात आल्याची माहिती, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी आज विधानसभेत दिली. सदस्य रोहित पवार यांनी यासंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती. मंत्री श्री. केसरकर म्हणाले की, चालू शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे गणवेश उपलब्ध होण्याच्या दृष्टीने केंद्र शासनाच्या वस्त्रोद्योग विभागाच्या अखत्यारितील वस्त्रोद्योग कमिटीकडून गणवेशाच्या कापडाचे तांत्रिक न...
एसबीआय बँकेच्या वर्धापन दिनानिमित्त नांदेडच्या मुख्य शाखेत भव्य रक्तदान शिबिर संपन्न -NNL

एसबीआय बँकेच्या वर्धापन दिनानिमित्त नांदेडच्या मुख्य शाखेत भव्य रक्तदान शिबिर संपन्न -NNL

नांदेड
नांदेड। भारतीय स्टेट बँक ही भारतातील अग्रगण्य बँक आहे बँके मार्फत वेगवेगळ्या सेवा ग्राहकांना बँक देत असते त्याबरोबरच सामाजिक भावनेतून वेगवेगळे उपक्रम राबवत असते. याचाच एक भाग म्हणून दिनांक एक जुलै रोजी बँकेच्या 69 व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने. बँकेचे नांदेडचे विभागीय कार्यालय ,क्षेत्रीय कार्यालय अधिकारी संघटना तसेच कर्मचारी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदानाचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान कार्यक्रमात बँकेच्या अधिकारी आणि कर्मचारी यांनी सामाजिक जबाबदारी जपत अनेकांनी रक्तदान केले. या कार्यक्रमासाठी नांदेड विभागीय कार्यालयाचे उपमहाव्यवस्थापक प्रिया कुमार सरीगला. नांदेड क्षत्रिय कार्यालयाचे क्षत्रिय प्रबंधक पक्काला कालिदासू नांदेड औद्योगिक वसाहत शाखेचे मुख्य प्रबंधक सतीश राऊत ,अधिकारी संघटनेचे किरण जिंतूरकर शशिकांत कुलकर्णी सदाशिव चाळनेवाड तसेच कर्मचारी संघटनेचे रा...
पेनूरच्या जन्मभूमीत भूमिपुत्र डॉ प्रमोद धोंडे यांचे सार्वजनिक ठिकाणीं नारळ झाडांची लागवड -NNL

पेनूरच्या जन्मभूमीत भूमिपुत्र डॉ प्रमोद धोंडे यांचे सार्वजनिक ठिकाणीं नारळ झाडांची लागवड -NNL

नांदेड
लोहा। आपल्या जन्मभूमीसाठी आपण काहीतरी केले पाहिजे असे कर्तृत्ववान भूमिपुत्रांना नेहमीच वाटते. प्रसिद्ध मेंदू विकार तज्ज्ञ डॉ प्रमोद वीरभद्र धोंडे व त्याचे सहकारी हे गेल्या नऊ वर्षा पासून नित्याने पावसाळ्याच्या आरंभी नांदेड शहराच्या लगत , पुर्णा,तालुका , लोहा -कंधार, बनवस या भागात वृक्ष लागवड व त्यास जाळ्या लावतात. त्याचे संगोपण व संवर्धन होते आहे की नाही याची चार -सहा महिन्याला माहिती घेतात. व्यस्थ कामातून वेळ काढत स्वतः तेथे जाऊन पाहणी करतात. असा हा उपक्रम त्यांनीं आपल्या जन्मभूमीत म्हणजे पेनूर येथेही राबविला, नारळाची व सावली देणारे वृक्ष लागवड आदर्श मातापिता वीरभद्र व अरुणाबाई धोंडे यांच्या हस्ते करण्यात आले. पेनूर या मूळ गावी यंदा भूमीपूत्र न्यूरोफिजिसीयन डॉ प्रमोद धोंडे प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉ अजित काबदे यांच्या उपस्थितीत पेनूर या गावात सय्यद बाबा दर्गा परिसर श्री व सौ. अरुणाबाई ...
अति दुर्गम व डोंगराळ भागातील शिक्षण संस्थेचे कर्मचारी वाऱ्यावर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान या बाबीकडे शिक्षण विभाग लक्ष देईल का -NNL

अति दुर्गम व डोंगराळ भागातील शिक्षण संस्थेचे कर्मचारी वाऱ्यावर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान या बाबीकडे शिक्षण विभाग लक्ष देईल का -NNL

नांदेड
किनवट, परमेश्वर पेशवे। अति दुर्गम व डोंगराळ भाग समजल्या जाणाऱ्या आदिवासी बहुल तालुक्यातील इस्लापूर जिल्हा परिषद प्रभागातील व परिसरातील संस्थेमधील कर्मचारी ही संस्थेत गैरहजर राहत असल्याने विद्यार्थ्यास शैक्षणिक नुकसानीस सामोरे जावे लागत असल्याची विदारक दृश्य इस्लापूर परिसरात पहावयास मिळत आहे. गेल्या वीस वर्षापासून आदिवासी बहुल भागाचा फायदा घेऊन राजकीय पुढार्‍यांनी या भागांमध्ये शैक्षणिक संस्थांची बस्तान मांडली. शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातून या राजकीय पुढार्‍यांनी लाखो रुपयाची कमाई केली असल्याचे बोलले जाते. त्यातच ही शैक्षणिक संस्था राजकीय पुढार्‍याच्या आशीर्वादाने चालत असल्याने या शैक्षणिक संस्थेतील मुख्याध्यापिका या संस्थाचालकाच्या जवळील नातेवाईक असल्याने त्या सतत शाळेमध्ये गैरहजर राहत असल्याच्या तक्रारी नेहमी ग्रामस्थांकडून ऐकावयास मिळतात. त्यातच दिनांक१ जुलै रोजी या शाळेच्या मु...
CRIME NEWS – हिमायतनगरचे माजी नगराध्यक्ष कुणाल राठोड यांच्यावर चाकू हल्ला; गंभीर जखमीवर नांदेड येथे उपचार सुरु – NNL

CRIME NEWS – हिमायतनगरचे माजी नगराध्यक्ष कुणाल राठोड यांच्यावर चाकू हल्ला; गंभीर जखमीवर नांदेड येथे उपचार सुरु – NNL

क्राईम, नांदेड
हिमायतनगर| येथील नगरपंचायतीचे माजी नगराध्यक्ष कुणाल राठोड यांच्यावर येथील एका युवकाने चाकू हल्ला केला आहे. या हल्ल्यात कुणाल राठोड हे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर हिमायतनगर ग्रामीण रुग्णलयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी नांदेडला हलविण्यात आले आहे. या घटनेनंतर हिमायतनगर शहरात एकच खळबळ उडाली आहे.  हिमायतनगर येथील शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे माजी नगराध्यक्ष कुणाल राठोड हे नेहमीप्रमाणे आपल्या मित्रासह श्री परमेश्वर मंदिर मंगल कार्यालयाच्या ओट्यावर दिनांक ०२ जुलै रात्री ११ वाजेच्या सुमारास बसून चर्चा करत होते. दरम्यान सोबतच काही मित्र गेले व एक मित्र लघवीसाठी बाजूला गेला होता. ही संधी साधून मोबाईलमध्ये व्यस्त असलेल्या राठोड यांच्यावर भाजप युवा मोर्चाचे माजी तालुका अध्यक्ष राम सूर्यवंशी याने चाकू हल्ला केला आहे. हा प्रकार लक्षात येताच राठोड यांच्या सोबतच्या मित्राने धावत येऊन अ...
शालेय विद्यार्थ्यांना आणण्यासाठी जाणारी मानव विकास मिशनची बस हिमायतनगर / सिरपल्ली चिखलमय रस्त्यामूळ फसली -NNL

शालेय विद्यार्थ्यांना आणण्यासाठी जाणारी मानव विकास मिशनची बस हिमायतनगर / सिरपल्ली चिखलमय रस्त्यामूळ फसली -NNL

नांदेड, महाराष्ट्र
हिमायतनगर, अनिल मादसवार| हिमायतनगर येथून सिरपल्ली कडे शालेय विद्यार्थ्यांना आणण्यासाठी जाणारी मानव विकास मिशनची बस रस्त्यावर टाकलेलं मटेरियल व चिखलमय रस्त्यांच्या अडचणीमुळे फसली आहे. बुधवारी सकाळी ७ वाजतपासन तब्बल दोन तास एसटी बस अडकून राहिल्याने शालेय विद्यार्थी व आठवडी बाजारासाठी येणाऱ्या प्रवाशांना ताटकळत बसावं लागलं आहे. यामुळे पुन्हा एकदा हिमायतनगर पळसपुर डोल्हारी मार्ग शिरपल्ली जाणारा प्रधानमंत्री ग्रामसडक रस्त्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. गेल्या दोन वर्षांपासून सुरू असलेल्या रस्त्यावर रिमझिम पावसामुळे चिखल निर्माण झाला असून, यामुळे नागरिक वाहनधारकांना आणि आता एसटी महामंडळच्या बसेसना देखील अडकून पडावे लागत हे. आत्तातरी मूग गिळून गप्प बसलेले राजकीय नेत्यांसह संबंधित गुत्तेदार,अभियंता या रस्त्याचे काम पूर्णत्वाकडे नेन्यासाठी प्रयत्न करतील का..? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. हिंग...
विभागीय व्यस्थापक नीती सरकारच्या दौऱ्यानंतर देखील इंटरसिटी रेल्वे वारंवार रद्द होत असल्याने प्रवाशांचे बेहाल – NNL

विभागीय व्यस्थापक नीती सरकारच्या दौऱ्यानंतर देखील इंटरसिटी रेल्वे वारंवार रद्द होत असल्याने प्रवाशांचे बेहाल – NNL

नांदेड
हिमायतनगर। आदिलाबाद नांदेड इंटरसिटी रेल्वे गेल्या अनेक महिन्यांपासून वेळेवर धावत नाही. कधी कधी तर अचानक बंद असल्याचे रेल्वेच्या जनसंपर्क विभागाकडून सांगून मोकळे होतात, त्यामुळे सर्वसामान्य नागरिक पेअवॉशन ऐन वेळी पुढे जायचं असल्याने अडथळे निर्माण होत असून, या प्रकारामुळे प्रवाशी वर्गातुन रेल्वेच्या ढिसाळ नियोजन बाबत नाराजी व्यक्त केली जाते आहे. एव्हढंच नाहीतर अचानक नांदेड रेल्वे डिव्हिजनच्या विभागीय व्यवस्थापक नीती सरकार यांनी भेट देऊन आढावा घेतला, यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना त्यांनी उत्तर देतांना आता रेल्वे वेळेवर सुरु असल्याचे सांगितले त्यानंतर दोन वेळा आदीलाबाद नांदेड रेल्वे उशिरा धावत असल्याने रद्द झाली हे विशेष. नादेड रेल्वेच्या डिआरएम निती सरकार यांनी २२ जून रोजी हिमायतनगर रेल्वे स्थानकाला अचानक भेट देऊन येथील कामकाज व प्रवाशांना येणाऱ्या अडचणींचा आढावा घेतला. रेल्वे ...
सीईओ मीनल करणवाल यांच्या उपस्थितीत 4 जुलै रोजी हिमायतनगर येथे तक्रार निवारण सभा -NNL

सीईओ मीनल करणवाल यांच्या उपस्थितीत 4 जुलै रोजी हिमायतनगर येथे तक्रार निवारण सभा -NNL

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड| हिमायतनगर पंचायत समिती येथे गुरुवार दिनांक 4 जुलै रोजी तक्रार निवारण दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा परिषदेच्या प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी 11 वाजता पंचायत समितीच्या सभागृहात तक्रार निवारण सभा घेण्यात येणार आहे. हिमायतनगर तालुक्यातील विविध विषयासंदर्भात पंचायत समिती व जिल्हा परिषद स्तरावर प्राप्त झालेल्या तक्रारीचा निपटारा यावेळी करण्यात येणार आहे. ज्या तक्रारदारांनी तक्रारी दिलेल्या आहेत अशा तक्रारदारांना पंचायत समितीच्या वतीने उपस्थित रहाण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल व जिल्हा परिषदेचे सर्व खाते प्रमुख तक्रार निवारण सभेसाठी उपस्थित राहून तक्रारींचा निपटारा करणार आहेत, अशी माहिती सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार मुक्कावार यांनी दिली आहे....
error: Content is protected !!