Tuesday, July 7

नांदेड

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

Dambree Road | डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक लातूर फाटावर आंदोलन ईशाऱ्यानंतर डांबरीकरण कामास सुरुवात – NNL

Dambree Road | डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक लातूर फाटावर आंदोलन ईशाऱ्यानंतर डांबरीकरण कामास सुरुवात – NNL

नांदेड
नवीन नांदेड| नांदेड लातूर राष्ट्रीय महामार्ग वरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक सिडको नांदेड येथे राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या वतीने होत असलेल्या ओव्हर ब्रिजमुळे आंबेडकर चौकात पाडकाम व खोदकाम केल्यामुळे हा वाहतूक रस्ता नादुरुस्त झाला. परिणामी अनेक वाहन धारकासह नागरीकांना त्रास सहन सोसावा लागत असल्याने माजी नगरसेविका सौ.वैजयंती भिमराव गायकवाड, ठाकरे शिवसेना गटाचे सिडको शहर संघटक प्रमोद मैड यांनी १ जुलै पासून आंदोलन करण्याचा ईशारा दिला होता. या अनुषंगाने ग्रामीण पोलीस स्टेशन येथे पोलीस निरीक्षक नागनाथ आयलाने व संबंधित विभागाच्या अधिकारी आंदोलन कर्ते यांच्यात झालेल्या बैठकी नंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले असून रस्ता ११ जुलै रोजी डांबरीकरण काम करण्यात आले. यामुळे वाहनधारकांना दिलासा मिळाला आहे. नांदेड लातूर राष्ट्रीय महामार्गावर डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक येथे नांदेड वरून सिडको कडे व वसरणी मा...
Sant Rohidas Scheme | संत रोहिदास चर्मोद्योग महामंडळाच्या एनएसएफडीसीच्या योजनासाठी कर्ज प्रस्ताव दाखल करा – NNL

Sant Rohidas Scheme | संत रोहिदास चर्मोद्योग महामंडळाच्या एनएसएफडीसीच्या योजनासाठी कर्ज प्रस्ताव दाखल करा – NNL

नांदेड
नांदेड| संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ मर्या. नांदेड जिल्हा कार्यालयास सन 2024-25 या आर्थिक वर्षासाठी एन.एस.एफ.डी.सी यांच्या योजनांचे भौतीक उद्दीष्ट प्राप्त झाले आहे. या योजनांचा कर्जप्रस्ताव महामंडळाच्या विहित नमुन्यात 1 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज कार्यालयीन वेळेत (सकाळी 9.30 ते सायं 6.15 वाजेपर्यंत) जिल्हा कार्यालय डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन ग्यानमाता शाळेसमोर तळमजला, कामठा रोड, नांदेड येथे स्विकारले जातील. विशेष घटक योजना 20 , बीज भांडवल 16, मुदती कर्ज योजना 5 लाख- 2 महिला अधिकारीता योजना 5 लाख- 2, महिला समृध्दी योजना 1.40- 10 लघुऋण वित्त योजना 1.40, शैक्षणिक कर्ज योजना 10, मुदती कर्ज योजना 2 लाख- 40 महिला समृध्दी योजना 50 हजार- 20 लघुऋण वित्त योजना 50 हजार- 18 असे एकूण 122 उद्दीष्ट प्राप्त झाले आहे. या सर्व योजना एन.एस.एफ.डी.सी नवी दिल्ली यांच्या मार्फत राबव...
sports competition | जिल्हास्तरीय सुब्रतो मुखर्जी फुटबॉल क्रीडा स्पर्धेत बिलोली तालुक्याचे वर्चस्व – NNL

sports competition | जिल्हास्तरीय सुब्रतो मुखर्जी फुटबॉल क्रीडा स्पर्धेत बिलोली तालुक्याचे वर्चस्व – NNL

नांदेड, स्पोर्ट्स
नांदेड| सुब्रतो मुखर्जी फुटबॉल चषक स्पर्धेमध्ये नांदेड जिल्ह्यात बिलोली तालुक्याने पुन्हा आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. यावर्षीही या स्पर्धेमध्ये या तालुक्यातील शिवाजी हायस्कूलने आपली आगेकूच कायम ठेवली आहे. सुब्रतो मुखर्जी स्पोर्टस एज्युकेशन सोसायटी, नवी दिल्ली,आयुक्त, क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय,नांदेड, जिल्हा क्रीडा परिषद,नांदेड मार्फत सन 2024-25 या शैक्षणिक वर्षातील जिल्हास्तरीय सुब्रतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धा अंतर्गत सबज्युनियर 15 वर्षे मुले व ज्युनियर 17 वर्षे मुले-मुलींचे स्पर्धाचे आयोजन दि. 11 व 12 जुलै,2024 या कालावधीत ऑक्सफर्ड द ग्लोबल स्कूल, निळा रोड, नांदेड येथील मैदानावर करण्यात आले होते. या स्पर्धेचे उदघाटन शिनेजो जोसे, प्राचार्य, ऑक्सफर्ड द ग्लोबल स्कूल, निळा रोड, नांदेड व जयकुमार टेंभरे, जिल्हा क्रीडा अधिकारी...
Vanchit Bahujan Alliance | नंदगावमध्ये वंचित बहुजन आघाडी शाखा उदघाटन व नामफलक अनावरण – NNL

Vanchit Bahujan Alliance | नंदगावमध्ये वंचित बहुजन आघाडी शाखा उदघाटन व नामफलक अनावरण – NNL

नांदेड
किनवट, परमेश्वर पेशवे| आज दिनांक ईस्लापुर पासून जवळचं असलेल्या नंदगाव येथ निखिल वागमरे जगदीश हनवते गौरव कदम यांच्या मार्गदर्शनाखाली वंचित बहुजन आघाडीची शाखा स्थापन करण्यात आली. या शाखेचे उद्घाटन वंचितचे किनवट तालुका अध्यक्ष निखिल वाघमारे यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी शाखा अध्यक्ष म्हणून संदीप लव्हाळे, उपाध्यक्ष चांगदेव भडंगे/यशवंतराव टारपे, सचिव देविदास भडंगे, सहसचिव दत्तात्रय डुकरे, कोषाध्यक्ष सोमनाथ टारपे , संघटक लक्ष्मण लव्हाळे, सहसंघटक शिवाजी टारपे आणि सल्लागार विशाल लव्हाळे आदींची निवड करण्यात आली. या कार्यक्रमाला वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रवीण दादा गायकवाड , दिनेश कांबळे ,खंडेराय कांबळे, भारत लव्हाळे, बाबू भंडगे, प्रकाश भडंगे, विनोदबोड्डेवार,परमेश्वर गायकवाड, शंक बोड्डेवार यांच्यासह अनेक महिला व पुरुष कार्यकर्ते उपस्थित होते...
Gorasena| …..तर बंजारा समाजाच्या भरवशावर निवडूण जाणार्‍या ६२ आमदारांना घरचा रास्ता दाखवणार -गोरसेना – NNL

Gorasena| …..तर बंजारा समाजाच्या भरवशावर निवडूण जाणार्‍या ६२ आमदारांना घरचा रास्ता दाखवणार -गोरसेना – NNL

नांदेड
हिमायतनगर| गोरबंजारा समाजावर प्राप्त आरक्षण वाचवण्याचे संकट असून, समाजातील नव्हे तर बंजारा समाजाच्या मतावर निवडूण येणारे एकही आमदार मंत्री विधीमंडळात तोंड उघडत नाही. तेव्हा फक्त निवडणूकीत गोरबंजारा समाजाचा केवळ मतासाठी वापर करणार्‍या नेता पुढार्याना येत्या विधानसभेच्या निवडणूकीत जोरदार धडा शिकवून चारी मुंड्या चित करु असा इशारा गोरसेनेने दिला आहे. विमुक्त जाती अ मध्ये राजपूत भामटा या अत्यल्प लोकसंख्या असलेल्या जातीचा सामावेश असून नाम साधर्म्याचा फायदा घेत सवर्ण राजपूत, मिना, छप्परबंद या खुल्या प्रवर्गातील जनसमुदाय यांनी खुलेआम घुसखोरी करीत अभियांत्रिकी, वैद्यकीय, सह शासकीय नोकरभरतीत लाभ घेत आहे. राजपूत जातीतील लोक भामटा शब्द लावून भामटेगिरी करत असल्याने मुळ विमुक्त जाती अ प्रवर्गातील १४ तत्सम जाती आरक्षणाचे अतोनात नुकसान होत आहे. म्हणून गोरसेना या संघटनेतर्फे संपूर्ण महाराष्ट्रात 2019 पा...
Vanchit Bahujan Aghadit entry | हिमायतनगर तालुक्यातील माजी सभापतीचे यजमान दिलीप राठोड यांचा वंचित मध्ये प्रवेश – NNL

Vanchit Bahujan Aghadit entry | हिमायतनगर तालुक्यातील माजी सभापतीचे यजमान दिलीप राठोड यांचा वंचित मध्ये प्रवेश – NNL

नांदेड
नांदेड/हिमायतनगर| हिमायतनगर तालुक्यातील पंचायत समितीच्या माजी सभापती सौ. मायाताई राठोड यांचे यजमान दिलीप राठोड यांनी विधानसभा निवडणूकीच्या तोंडावर काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देऊन वंचित बहुजन आघाडी मध्ये जाहीर प्रवेश केला आहे. राठोड यांच्या पक्ष प्रवेशाने वंचित आघाडीमध्ये नव चैतन्य निर्माण झाले असून, काँग्रेसला मात्र आत्मपरीक्षण करण्याची गरज निर्माण झाली असल्याचे काँग्रेसच्याच निष्ठावंत कार्यकर्त्यांतून बोलल्या जात आहे. हिमायतनगर तालुक्यात काँग्रेसचे आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांच्या सोबत दरेसरसम येथील राठोड बंधू गेल्या अनेक वर्षांपासून काम करतात. माजी जिल्हा परिषद सदस्य सुभाष राठोड हे आमदार जवळगावकर यांचे पहिल्या फळीतील विश्वासू सहकारी म्हणून सुपरिचित आहेत. तसेच त्यांचे बंधू दिलीप राठोड हे काँग्रेस पक्षातच राहून काम करीत आले आहेत. गेल्या पंचवार्षिक मध्ये पंचायत समितीच्या निवडणुकीत दि...
national highway | हिमायतनगर शहराजवळ राष्ट्रीय महामार्गाचा साईड पट्टीचा डांबरी रस्ता महिनाभरातच खचला – NNL

national highway | हिमायतनगर शहराजवळ राष्ट्रीय महामार्गाचा साईड पट्टीचा डांबरी रस्ता महिनाभरातच खचला – NNL

नांदेड, महाराष्ट्र
हिमायतनगर,अनिल मादसवार। शहरानजीक पेट्रोल पंपाच्या पुलापाशी महिन्याभरापूर्वी करण्यात आलेल्या डांबरी साईड रस्ता खचला आहे. यामुळे भरधाव वेगात येणाऱ्या वाहनाचा अपघात होण्याची शक्यता वाढली आहे. हि बाब लक्षात घेता तात्काळ संबंधित ठेकेदाराने केलेल्या रस्त्याच्या कामाची चौकशी करून त्याला अभय देणाऱ्या अभियंत्यावर कार्यवाही करावी अशी मागणी शहरवासीय नागरिक व वाहनधारकांतून केली जात आहे. हिमायतनगर शहर हे तालुक्याचे ठिकाण आहे, मागील पाच वर्षांपूर्वी हिमायतनगर शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाला मंजुरी मिळाली. या रस्त्याकामचे उद्घाटन रस्ते विकास मंत्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले होते. त्यावेळी गडकरी यांनी रस्त्याचे काम दर्जेदार करावे बोगस कामाचा प्रकार आढळून आल्यास ठेकेदारावर कडक कारवाई केली जाईल असे भर सभेत माहूर येथे ठणकावून सांगितले होते. त्यानंतर किनवट ते हिमायतनगर आणि हिमायतनगर ते...
Student honor | गोर सेनेच्या वतीने विद्यार्थी गौरव सोहळ्याचे आयोजन -NNL

Student honor | गोर सेनेच्या वतीने विद्यार्थी गौरव सोहळ्याचे आयोजन -NNL

नांदेड
श्रीक्षेत्र माहूर, राज ठाकूर। तालुक्यातील बंजारा समाजातील 10 वी, 12वी, (75 टक्के गुण घेतलेले) जेइइ, नीट, एम पी एस सी, यू पी एस सी, नेट सेट परीक्षेत यश प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा गुण गौरव समारंभाचे रविवार दि. 14 जुलै रोजी माहूर शहरातील कपिल मंदिर (कपिल नगर ) येथे आयोजन गोर सेना माहूर शाखेच्या वतीने करण्यात आले आहे. महाराष्ट्र साहित्य दल प्रमुख रतन राठोड, डॉ. मिनेश आडे (नायक ), अनिल चव्हाण, एस. एन. राठोड, अतुल नायक, गोर सेना जिल्हा सचिव अर्जुन पवार, समनक जनता पार्टी तालुकाध्यक्ष रवी राठोड यांच्या प्रमुख उपस्थितिमध्ये गुणवंत विदर्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. तालुक्यातील गुणवंत विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन गोर सेनेचे माहूर तालुकाध्यक्ष आशिष राठोड, सचिव प्रल्हाद राठोड, समनक जनता पार्टीचे प्रसिद्धी प्रमुख अरविंद राठोड, आशिष आडे, वसंत ...
Welcome | तिरुमला परकामनी सेवा केल्या बदल उमरी येथे कर्मचारी यांचा स्वागत व सत्कार -NNL

Welcome | तिरुमला परकामनी सेवा केल्या बदल उमरी येथे कर्मचारी यांचा स्वागत व सत्कार -NNL

नांदेड
उमरी। श्री तिरुमला तिरुपती देवस्थान (टीटीडी) आंध्र प्रदेश येथे श्रीवरी परकामनी सेवा उमरीचे भुमिपुत्र,आरोग्य सेवेतील हिवताप विभागाचे राज्य पदाधिकारी, ग्रामीण रुग्णालय भोकरचे आरोग्य निरीक्षक सत्यजीत टिप्रेसवार यांच्या नेतृत्वात, नियोजनानुसार व पुढाकारातून २० अधिकारी व कर्मचारी यांनी दि. ८ जुलै ते ११ जुलै या कालावधीत तिरुमला, तिरुपती येथे श्रीवरी परकामनी सेवा ( हुंडी मधील रक्कम मोजदाद ) शासकीय व निमशासकीय अधिकारी व कर्मचारी यांच्या मधून निवड करण्यात आलेल्या कर्मचारी यांनी श्रीवरी परकामनी सेवा केल्या बदल उमरी येथील मित्र परिवार व बालाजी टिप्रेसवार परीवार यांच्याकडून सत्कार व स्वागत करण्यात आले. जिल्हा हिवताप कार्यालय नांदेड अंतर्गत कर्मचारी आरोग्य निरीक्षक सत्यजीत टिप्रेसवार, माणिक गिते, माधव कोल्हे, आरोग्य पर्यवेक्षक गंगाधर गन्लेवार, कैलास लंकलवाड, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी बालाजी चांड...
national highway bad | राष्ट्रीय महामार्ग बनला मृत्यूचा सापळा, ठिकठिकाणी खड्डे अन् भेगा होऊन झालेय भगदाड – NNL

national highway bad | राष्ट्रीय महामार्ग बनला मृत्यूचा सापळा, ठिकठिकाणी खड्डे अन् भेगा होऊन झालेय भगदाड – NNL

नांदेड, महाराष्ट्र
हिमायतनगर,अनिल मादसवार| नांदेड जिल्ह्यातील धनोडा ते भोकर राष्ट्रीय महामार्ग वाहनचालकांसाठी मृत्युचा सापळा बनला असून, इस्लापूर - हिमायतनगर - भोकर दरम्यान सरसम - सोनारी फाटा - याठिकाणी निकृष्ट दर्जाच्या कामामुळे जागोजागी सिमेंट काँक्रेट रस्त्यावर भेगा पडल्या आहेत. या भागांमध्ये दुचाकी वाहनांचे चाक फसून अपघातांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे अनेकांना कायमचे अपंगत्व येत असून, काही जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. जमीन खचल्यामुळे या रस्त्याला तडे जाऊन आणि चार ते सहा इंचाच्या भेगा पडल्याने अपघातास निमंत्रण मिळत आहे. सततच्या अपघातांमुळे राष्ट्रीय महामार्ग मृत्यूचा सापळा बनला आहे. संबंधित कामाची देखरेख करणाऱ्या अभियंत्यांचा स्वार्थीपणा आणि ठेकेदाराकडून झालेल्या निकृष्ट कामाचा हा परिणाम असून, यास जबाबदार कंपनीवर दंडात्मक कारवाई करून कंपनीचे नाव काळ्या यादीत टाकावे. पडलेल्या भेगांची व भगदाडाची थातुरम...
error: Content is protected !!