Tuesday, July 7

नांदेड

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

social afforestation | लोहा -कंधार येथील सामाजिक वनीकरण विभागाचा भोंगळ कारभार; अधिकारी उंटावरून हकतात शेळ्या -NNL

social afforestation | लोहा -कंधार येथील सामाजिक वनीकरण विभागाचा भोंगळ कारभार; अधिकारी उंटावरून हकतात शेळ्या -NNL

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड,अनिल मादसवार। महाराष्ट्र शासन,लागवड अधिकारी, सामाजिक वनीकरण कंधार स्थित लोहा कार्यालयाचा भोंगळा कारभार चालू असून, कर्मचारी व अधिकारी कार्यालयात उपस्थित राहत नसल्याने यांचेवर तात्काळ कार्यवाही करण्यात यावी. अन्यथा बेमुदत अमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत वाघमारे यांनी एका निवेदनातुन दिला आहे. प्रधान मुख्य वनसंरक्षक सामाजिक वनीकरण, महाराष्ट्र राज्य पुणे यांना दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे की, नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील सामाजिक वनीकरण, कंधार स्थित लोहा कार्यालयात भोंगळा कारभार चालविला जातो आहे. कर्मचारी व अधिकारी हे कागदोपत्री मीटिंग, दौरे, दाखवत शिपायाच्या हवाली कार्यालय सोडुन अनेक दिवस,महिने अनुपस्थित राहून या कार्यालयाचा कारभार चालवतात. त्यामुळे शेतकरी लाभार्थी व्रक्ष लागवडीसाठी कार्यालयात नेहमी चकरा मारल्या तरी कर्मचारी व अधिकारी यांचे दर...
Dr. Baban Jogdand | डॉ. बबन जोगदंड यांना राज्यपालांच्या हस्ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर अवॉर्ड – NNL

Dr. Baban Jogdand | डॉ. बबन जोगदंड यांना राज्यपालांच्या हस्ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर अवॉर्ड – NNL

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड| नांदेडचे भूमिपुत्र तथा यशदा पुणे येथील अधिकारी डॉ. बबन जोगदंड यांच्या सामाजिक, शैक्षणिक योगदानाची दखल घेऊन पीपल्स एज्युकेशन सोसायटी मुंबईच्यावतीने त्यांना नुकताच डॉ. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर अवॉर्ड महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते मुंबईत प्रदान करण्यात आला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या वतीने यावर्षी विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या महाराष्ट्रातील निवडक १८ व्यक्तींना हा अवॉर्ड देण्यात आला. त्यामध्ये डॉ. बबन जोगदंड यांचा समावेश होता. या कार्यक्रमाला केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले, विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. सुखदेव थोरात, ज्येष्ठ सरकारी वकील ॲड.उज्वल निकम, ॲड.बी.के. बर्वे, पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे सचिव डॉ. वामन आचार्य, कार्यकारी समिती अध्यक्ष चंद्रशेखर कांबळे यांची उपस्थिती होती. यशवंत...
drain blockage | हिमायतनगरच्या वार्ड क्र ४ मधील नालीचे बाधकामास तत्काळ करून विहिरीचे कडे टाकून द्या – NNL

drain blockage | हिमायतनगरच्या वार्ड क्र ४ मधील नालीचे बाधकामास तत्काळ करून विहिरीचे कडे टाकून द्या – NNL

नांदेड
हिमायतनगर| नगरपंचायत वार्ड क्र ४ मधील नालीचे बाधकामास तत्काळ करून विहिरीचे कडे टाकून द्यावे. आणि या भागातील नागरिकांना पाणी टंचाईच्या समस्येपासून मुक्त करा. अन्यथा समस्थ नेहरूनगर नागरिकांना घेऊन नगरपंचायत कार्यालयापुढे बंड बाजा वाजवीत प्रशासनाच्या नाकर्तेपणाचा निषेध करण्यात येईल. असा इशारा एका निवेदनाद्वारे काशिनाथ गड्डमवार यांनी दिला आहे. हिमायतनगर नगरपंचायत अंतर्गत येणाऱ्या वार्ड क्र ४ मधील नालीचे पक्के बांधकाम करण्यात यावे म्हणून सातत्याने नगरपंचायत कार्यालयाला गेल्या दोन वर्षांपासून निवेदन देण्यात आले आहेत. परंतु आत्तापर्यंत कार्यालयाकडून प्रत्यक्षरित्या वॉर्ड क्रमांक ४ मधील कामास सुरुवात झाली नाही. आमच्या भागातील नागरिकाच्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी जनहितार्थ मागणी निवेदन अर्ज सातत्याने वारंवार देत आहे. परंतु जाणीवपूर्वक निवेदनाची दखल घेतल्या जात नाही. तसेच नगरपंचायत कार्यालया...
tree planting | धर्माबाद तालुक्यात सुरू झालेला वृक्ष लागवड अभियानाच देगलूर तालुक्यात समारोप – NNL

tree planting | धर्माबाद तालुक्यात सुरू झालेला वृक्ष लागवड अभियानाच देगलूर तालुक्यात समारोप – NNL

नांदेड
नांदेड| बाबांच्या त्यागाला पर्याय नाही. "बाबा तुमच्यासाठी...!" ह्या नावीन्यपूर्ण उपक्रमा अंतर्गत होत असलेल्या वृक्ष लागवडीसारख्या चांगल्या बाबींसाठी धर्माबाद पंचायत समिती प्रशासन अत्यंत सकारात्मक आहे असे प्रतिपादन नवनियुक्त गटविकास अधिकारी तोटावाड यांनी केले. ते सीमावर्ती भागाचे प्रमुख समन्वयक तथा जेष्ठ पत्रकार श्री गोविंद मुंडकर यांच्या संकल्पनेतून दरवर्षी राबविण्यात येणारा कृतज्ञता पित्याची, "बाबा तुमच्यासाठी..." हा उपक्रम यावर्षी चार जुलै 2024 रोजी सुरू करण्यात आला. बाबा तुमच्या साठी..! या उपक्रमा अंतर्गत दि. १० जुलै रोजी धर्माबाद तालूक्यातील महादेवाचे प्रसिद्ध असलेल्या मौजे संगम येथील संगमेश्वर मंदिरात, ग्राम पंचायत संगम यांच्या वतीने साहेबराव जाधव यांच्या पुढाकाराने आयोजित वृक्ष लागवड कार्यक्रम प्रसंगी बोलत होते.या कार्यक्रमाच्या प्रारंभी मनामनातील श्रावण बाळ जागृत करण्यासाठी संगम ...
MLA Ram Patil Ratolikar | हणेगाव येथे विशेष बाब म्हणून 30 खाटांचे ग्रामीण रुग्णालय मंजूर – आ. रातोळीकरांच्या पाठपुराव्याला यश- NNL

MLA Ram Patil Ratolikar | हणेगाव येथे विशेष बाब म्हणून 30 खाटांचे ग्रामीण रुग्णालय मंजूर – आ. रातोळीकरांच्या पाठपुराव्याला यश- NNL

नांदेड
नांदेड। देगलूर तालुक्यातील हणेगाव येथील आरोग्य केंद्राला ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा देवून या रुग्णालयात 30 खाटांचा समावेश करावा, यासाठी गावच्या सरपंच सौ.शारदादेवी शंकरराव राठोड यांच्या मागणीचा आ. राम पाटील रातोळीकर यांनी शासनाकडे सातत्यपूर्ण पाठपुरावा केल्याने शासनाने अखेर या गावाला विशेष बाब म्हणून 30 खाटांच्या ग्रामीण रुग्णालयास तत्वतः मान्यता दिली आहे. आ. रातोळीकरांनी केलेल्या प्रयत्नांना यश आल्याबद्दल सरपंचासह ग्रामस्थांनी त्यांचे आभार मानले आहेत. हणेगांव ता.देगलूर हे गांव महाराष्ट्र, तेलंगणा व कर्नाटक या तीन राज्यांच्या सिमावर्ती भागातील 15 हजार लोकवस्तीचे एक मोठे गांव आहे. या परिसरातील सुमारे 40-45 खेडेगावांचे हे मध्यवती ठिकाण आहे. रुग्णांच्या उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र असले तरी या केंद्रात अपुर्या सोयीसुविधा असल्यामुळे येथील रुग्णांची प्रचंड हेळसांड होत असल्याने या आरोग्य क...
Golegaon theft | गोळेगाव‌ (तपोवन) येथे‌ हॉटेल‌ व‌ पान टपऱ्या चोरट्यांनी फोडल्या, रोख रकमेसह १३ हजारांचा‌ ऐवज‌ लंपास -NNL

Golegaon theft | गोळेगाव‌ (तपोवन) येथे‌ हॉटेल‌ व‌ पान टपऱ्या चोरट्यांनी फोडल्या, रोख रकमेसह १३ हजारांचा‌ ऐवज‌ लंपास -NNL

क्राईम, नांदेड
उस्माननगर, माणिक भिसे। लोहा तालुक्यातील गोळेगाव (तपोवन) येथे‌ अनुक्रमे नांदेड - बिदर ‌ व‌ मारतळा‌ ते‌ हळदा मार्गावर असलेल्या दोघा व्यावसायिकांचे हॉटेल व पाणटपऱ्यांचे‌ कुलूप लोखंडी राॅडने‌ तोडले‌ व‌‌ आत मधील एका‌ ठिकाणचे रोख ४ हजार व‌ हॉटेलातील‌ ५ हजाराचे खाद्यपदार्थ तर‌ दुसऱ्या रोख एक हजार आणि ३ हजाराचे सामान असा एकूण १३ हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी ‌सोमवारी ( दि.८) रात्री लंपास केल्याची घटना घडली. दरम्यान घटनास्थळी पोलीस दाखल झाले पाहणी केली मात्र अद्याप या प्रकरणी चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल‌ करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली नव्हती. उस्माननगर पोलीस स्थानकांतर्गत गोळेगाव येथील नांदेड - बिदर टी पॉइंटवर रामेश्वर कसबे यांचे हॉटेल व पान शॉप असून नेहमीप्रमाणे ते दिवसभर व्यापार करून ‌ हॉटेल बंद करून ते घराकडे गेले. मात्र रात्री अंदाजे अकराचे दरम्यान चोरट्याने पान टपरी व हॉटेलचे कुलूप तोडून आतील ...
peak insurance plan | एक रुपयात पीक विमा योजना काढण्याचे शेवटचे 4 दिवस बाकी -NNL

peak insurance plan | एक रुपयात पीक विमा योजना काढण्याचे शेवटचे 4 दिवस बाकी -NNL

नांदेड
नांदेड| केवळ 1 रुपयामध्ये शेतातील पिकाचा पीक विमा काढला जातो. केंद्र व राज्य सरकार मोठ्या प्रमाणात यासाठी आर्थिक तरतूद करते. त्यामुळे जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांनी आपले पीक संरक्षित केले नसतील त्यांनी तातडीने पीक विमा योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. यासंदर्भात आज जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे यांनी व्हिडिओ संदेश जारी करतांना स्पष्ट केले की, गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेचा लाभ यावर्षी घेतला आहे. यावर्षी 97 टक्के पाऊस आतापर्यंत आला असून पिके संरक्षित करणे आवश्यक आहे. गेल्यावर्षी पीक विमा योजनेमध्ये 11 लाख शेतकऱ्यांनी भाग घेतला होता. मात्र यावर्षी गुरूवार 11 जुलै पर्यंत 7 लाख 45 हजार शेतकऱ्यांनीच पीक विमा योजनेचा लाभ घेतला आहे. या योजनेतून नांदेड जिल्ह्यामध्ये 400 कोटीपेक्षा अधिक लाभ शेतकऱ्यांना झाला आहे. योजनेची प्रभावी अंमल...
Tulja Bhavani Temple | श्री तुळजा भवानी मंदिर संस्‍थानच्या पदभरती परीक्षा केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश -NNL

Tulja Bhavani Temple | श्री तुळजा भवानी मंदिर संस्‍थानच्या पदभरती परीक्षा केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश -NNL

नांदेड
नांदेड| श्री तुळजा भवानी मंदिर संस्‍थान तुळजापुर जिल्‍हा धाराशिव येथे सरळ सेवेने वर्ग 3 व वर्ग 4 मधील विविध पदे भरण्‍यासाठी आयबीपीएस IBPS कंपनीमार्फत ऑनलाईन पद्धतीने दि. 13 व 14 जुलै रोजी तीन सत्रात परीक्षा होणार आहेत. परीक्षेदरम्‍यान कोणताही अनुचीत प्रकार घडू नये याकरीता परीक्षा केंद्राच्‍या परिसरात प्रतिबंधात्‍मक आदेश जिल्हादंडाधिकारी अभिजीत राऊत यांनी निर्गमीत केला आहे. ही परीक्षा आरजीसी हिटेक डिजिटल झोन नांदेड द्वारा राजीव गांधी कॉलेज कॅम्पस विद्युतनगर नांदेड, श्री डिजिटल झोन आयडीझेड विष्णुपुरी एसएस इंदिरा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी विष्णुपुरी गेट नंबर 18 आणि 22 नांदेड, श्री संभाजी कॉलेज ऑफ मॅनेजमेंट अँड टेक्नॉलॉजी नांदेड शामल एज्युकेशनल कॅम्पस देऊळगाव रोड नांदला दिग्रस खडकुट या तीन केंद्रावर घेण्यात येणार आहे. भारतीय नागरीक सुरक्षा संहिता-2023 चे कलम 163 अन्वये जिल्हादंडाधिकारी ...
स्व. कालिदास मस्के नाईक यांची पुण्यतिथी निमित्ताने विविध उपक्रम -NNL

स्व. कालिदास मस्के नाईक यांची पुण्यतिथी निमित्ताने विविध उपक्रम -NNL

नांदेड, हिंगोली
हिंगोली। येथील नाईक हॉस्पिटलचे संचालक डॉ. रमेश मस्के नाईक यांचे ज्येष्ठ बंधू स्व. कालिदास मस्के नाईक (अण्णा )यांचे १४ वे पुण्यस्मरण हे विविध उपक्रम राबविण्यात आले स्वर्गीय कालिदास यांचे लहान बंधू डॉ. रमेश मस्के नाईक हे मागील तेरा वर्षांपासून पुण्यतिथीच्या दिवशी नाईक हॉस्पिटल हिंगोली येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे तसेच रक्तदान शिबिराचे आयोजन करत असतात. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी स्व.कालिदास मस्के यांच्या पुण्यतिथी निमित्ताने भव्य आरोग्य तपासणी शिबीराचे व रक्तदान शिबिराचे आयोजन करून गरजू रुग्णांना विनामूल्य आरोग्य सेवा उपलब्ध करून देत स्व.कालिदास मस्के यांनी आम्हा भावंडास दिलेले प्रेम आणि आर्शिवाद या परोपकारी भावनेतनू आम्ही हे वेगवेगळी उपक्रम राबवून हा दिवस साजरा करीत असतो अशी प्रतिक्रिया डॉ.रमेश मस्के नाईक यांनी या प्रसंगी दिली. पुण्यतिथी निमित्ताने यावर्षी आरोग्य व रक्तदान शिबीरासोब...
Meenal Karanwal | विद्यार्थी हे देशाचे भविष्य: सर्व क्षेत्रात पुढे राहावे – मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल -NNL

Meenal Karanwal | विद्यार्थी हे देशाचे भविष्य: सर्व क्षेत्रात पुढे राहावे – मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल -NNL

नांदेड
नांदेड| विद्यार्थी हे देशाचे भविष्य आहेत. त्या अनुषंगाने, त्यांनी सर्व क्षेत्रात पुढे राहिले पाहिजे. यासाठी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणात उत्कृष्टता साधण्याची आणि विविध क्षेत्रात अग्रगण्य होण्याची प्रेरणा द्यावी, असे प्रतिपादन नांदेड जिल्हा परिषदेच्या प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी कले. देगलूर तालुक्यातील येरगी येथे आज गुरुवार दिनांक ११ जुलै रोजी बालीका पंचायत व ग्रामपंचायतीच्या वतीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलत होत्या. यावेळी तहसीलदार राजाभाऊ देशमुख, गट विकास अधिकारी शेखर देशमुख, नायब तहसीलदार नागमवाड, तालुका आरोग्य अधिकारी रमेश गवाले, बाल विकास प्रकल्प अधिकारी राजुरे, सरपंच सुनीता मठवाले, सदस्य संतोष पाटील, उपसरपंच मारोती तलारवार, विठ्ठाबाई बरसमवार, सुशिलाबाई सोमवार, कोंडाबाई वाघमारे, अशोक वाघमारे, विश्वनाथ बागेवार, पोस्ट कार्यालय, वन विभागा...
error: Content is protected !!