Tuesday, July 7

नांदेड

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

Chief Minister my beloved sister | मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी नांदेड जिल्ह्यात 48 हजारावर अर्ज दाखल -NNL

Chief Minister my beloved sister | मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी नांदेड जिल्ह्यात 48 हजारावर अर्ज दाखल -NNL

नांदेड
नांदेड| महिला सबलीकरणाच्या दृष्टीने क्रांतिकारी पाऊल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी जिल्ह्यातील 47 हजार 827 महिला भगिनींनी आपले अर्ज दाखल केले आहे. तथापि, जिल्ह्यातील सर्व पात्र महिला भगिनींना हा अर्ज भरण्याची संधी मिळणार असून गोंधळ व गडबड करू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे. राज्य शासनाने प्रत्येक पात्र महिलेला सुलभतेने हा अर्ज भरता यावा यासाठी या योजनेमध्ये आणखी काही बदल केले आहे. या संदर्भात आज राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी मंत्रालयातून संपूर्ण महाराष्ट्राचा आढावा घेतला. नांदेड जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल, महिला व बालविकास उपमुख्य कार्यकारी अधिकारी रेखा कदम यांच्यासह महिला व बालकल्याण विभाग व अन्य विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. सोबतच जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील ...
Chief Minister Vyoshree Yojana | “मुख्यमंत्री वयोश्री योजना” लाभार्थ्यांना अर्ज करण्याचे आवाहन -NNL

Chief Minister Vyoshree Yojana | “मुख्यमंत्री वयोश्री योजना” लाभार्थ्यांना अर्ज करण्याचे आवाहन -NNL

नांदेड
नांदेड| राज्यातील 65 वर्षे वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना वयोमान परत्वेयोणाऱ्या अपंगत्व, अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य साधने/ उपकरणे उदा : चष्मा, श्रवणयंत्र, ट्रायपॉड, स्टिक व्हिल चेअर, फोल्डिंग वॉकर, कमोड खुर्ची, नि-ब्रेस, लंबर बेल्ट, सर्वाइकल कॉलर इत्यादी. खरेदी करण्याकरीता राज्य शासनाने "मुख्यमंत्री वयोश्री योजना" शासन निर्णयान्वये सुरु केली आहे. पात्र रक्कम 3 हजार रुपये पर्यंतची रक्कम साहित्य खरेदीसाठी महाडिबीटीद्वारे त्यांचे बँक खात्यात रक्कम जमा करण्यात येणार आहे. लाभार्थ्यांना सदर योजनेचा लाभ मिळण्यासाठी दिनांक 10 ते 25 जुलै 2024 या कालावधीत सहाय्यक आयुक्त समाज कल्याण नांदेड येथे अर्ज सादर करावेत. अर्जासोबत पुढील कागदपत्रे आवश्यक दिनांक 31 डिसेंबर 2023 अखेर पर्यंत वयाची 65 वर्षे पुर्ण केलेली असा...
Rabindra Singh Modi | अष्टपैलू व्यक्तिमत्व रविन्द्रसिंघ मोदी -NNL

Rabindra Singh Modi | अष्टपैलू व्यक्तिमत्व रविन्द्रसिंघ मोदी -NNL

नांदेड, लेख
नांदेड शहराच्या विकासात येथील शीख समाजाचा मोठा वाटा आहे. येथील सुप्रसिद्ध धार्मिकस्थल गुरुद्वारा तखत सचखंड हजुरसाहेब मुळे नांदेडची कीर्ति समस्त जगतात आहे. नांदेडचा शीख समाज धार्मिक आस्थावान आणि परंपरेला समर्पित असा समाज आहे. येथील शीख समाजात सक्रिय व्यक्तिमत्व असलेले स. रविन्द्रसिंघ मोदी हे अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणून परिचित आहेत. रविंद्रसिंघ मोदी यांचे कार्य समाजान्तर्गतच आहे असे नसून सामान्य माणसासाठी आणि सार्वजनिक हितासाठी झटणारा कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख आहे. त्या व्यतरिक्त रविंद्रसिंघ मोदी यांची एक पत्रकार, कवि, हिन्दी साहित्यिक, वक्ता आणि यूट्यूबर म्हणून एक आगळी - वेगळी ओळख कायम आहे. मागील तीस वर्षांपासून रविंद्रसिंघ मोदी हे मराठी, हिन्दी आणि पंजाबी वर्तमान पत्रांसाठी पत्रकारिता करीत आहेत. गुरुद्वाराच्या बातम्या असो की स्थानीक शीख समाजाच्या बातम्या असो ते वर्तमान पत्रांच्या मा...
Sonography free | बिलोली उपजिल्हा रुग्णालयात सोनोग्राफीची सेवा उपलब्ध – वैद्यकिय अधिक्षक डॉ.पावडे -NNL

Sonography free | बिलोली उपजिल्हा रुग्णालयात सोनोग्राफीची सेवा उपलब्ध – वैद्यकिय अधिक्षक डॉ.पावडे -NNL

नांदेड
बिलोली| बिलोली येथील शासकीय उपजिल्हा रुग्णालयात सोनोग्राफी (मशीन) सेंटर ची सेवा उपलब्ध झाली असून गरोदर मातांच्या नियमित तपासणी अंतर्गत गरजेनुसार गरोदर मातांची सर्व गरोदर सोनोग्राफी करण्यात येणार असल्याची माहिती उपजिल्हा रुग्णालय चे वैद्यकीय अधीक्षक डॉ.पांडुरंग पावडे यांनी दिली. बिलोली शासकीय उपजिल्हा रुग्णालयात सोनोग्राफी सेंटर ची मागणी होती .त्या अनुषंघाने जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.नीलकंठ भोसीकर यांच्या मार्गदर्शनानुसार बिलोली शासकीय रुग्णालयांचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.पांडुरंग पावडे यांनी सर्व प्रशासकीय बाबींची पुर्तता पूर्ण करून सोनोग्राफी सेंटर ची सेवा सुरु केले असून दि.12 जुलै रोजी उदघाटन सौ.दीक्षा वाघमारे नावाच्या गरोदर मातेच्या हस्ते करण्यात आले. यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ.पांडुरंग पावडे यांनी उपजिल्हा रुग्णालयात बिलोली येथे दर बुधवारी डॉ.विजय कुमार मोरे स्त्री रोग तज्ञ यांच्याकडून...
Ashadhi Ekadashi । आषाढी एकादशीनिमित्त १७ जुलै रोजी नांदेड येथे “भव्य माऊली दिंडी” प्रती पंढरपूर आयोजन – डॉ. रमेश नारलावार -NNL

Ashadhi Ekadashi । आषाढी एकादशीनिमित्त १७ जुलै रोजी नांदेड येथे “भव्य माऊली दिंडी” प्रती पंढरपूर आयोजन – डॉ. रमेश नारलावार -NNL

नांदेड
नांदेड। नांदेडमध्ये आषाढी एकादशीनिमित्त १७ जुलै रोजी नांदेड येथे "भव्य माऊली दिंडी" प्रती पंढरपूर आयोजन करण्यात आले असून, माऊली दिंडीचे मुख्य संयोजक डॉ. रमेश नारलावार यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. शोभा यात्रेची पूर्ण तयारी झाली आहे. शोभा यात्रेत विठ्ठल रुखुमाईचा देखावा. टाळकरी, विणेकरी, मृदुंगधारी यांचा समावेश राहणार आहे. देखावा म्हणून लेझीम पथक, झाशीची राणी व लहान मुलाचे शौर्य पथकाचे प्रात्यक्षिक आहे. या दिंडीचे प्रमुख दोन उद्देश आहेत. भव्य सांस्कृतिक कार्यक्रम व हिंदू जनजागरण व हिंदू एकत्रीकरण (हिंदू म्हणजे जैन, बुद्ध, शीख व इतर हिंदू) ज्या योगे हिंदूनी आपल्यावरील अन्यायाचा प्रतिकार करावा. तसेच सर्व डॉक्टर संघटना सर्व व्यापारी व समाज संघटना भजनी, महिला मंडळ, राजस्थानी महिला मंडळ, आर्य वैश्य महिला मंडळ व इतर अनेक संघटनांनी शोभायात्रेत सहभागी होण्यासाठी आव्हान केले आहे. तसेच नानकसा...
Ashadhi Ekadashi । नांदेडमध्ये 17 जुलै रोजी “गजर हरिनामाचा” पांडुरंगाच्या भक्ती गीतांचा अविट नजराना -NNL

Ashadhi Ekadashi । नांदेडमध्ये 17 जुलै रोजी “गजर हरिनामाचा” पांडुरंगाच्या भक्ती गीतांचा अविट नजराना -NNL

नांदेड, मनोरंजन
नांदेड| आषाढी एकादशीच्या पावन पर्वावर दिनांक 17 जुलै 2024 रोजी सायंकाळी ७ वाजता येथील कुसुम सभागृहात कलांगण प्रतिष्ठान आणि दैनिक प्रजावाणी यांच्या संयुक्त विद्यमाने आषाढी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून त्यानिमित्य गजर हरिनामाचा हा विठ्ठल गीतांचा कार्यक्रम संपन्न होणार आहे . या कार्यक्रमात सुप्रसिद्ध गायक त्यागराज खाडिलकर मुंबई आणि सुर नवा ध्यास नवा 2022 ची उपविजेती ,संज्योती जगदाळे हे उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाची संकल्पना निर्मिती आणि निवेदन ॲड गजानन पिंपरखेडे यांचे असून त्यांना निवेदनाची साथ देत आहेत डॉ. वैशाली गोस्वामी. तर निर्मिती सहाय्य रमेश मेगदे यांनी केले आहे . Gorasena| …..तर बंजारा समाजाच्या भरवशावर निवडूण जाणार्‍या ६२ आमदारांना घरचा रास्ता दाखवणार -गोरसेना – NNL या कार्यक्रमात आषाढीच्या पावन पर्वावर रसिकांना विठ्ठल गीतांच्या वर्षावात व हरिनामाच्या गजरात चिंब भ...
Champatrao Dakore | दिव्यांगानी जिवाची पर्वा न करता मंत्रालय घेरावा आंदोलनात भाग घेतला – चंपतराव डाकोरे – NNL

Champatrao Dakore | दिव्यांगानी जिवाची पर्वा न करता मंत्रालय घेरावा आंदोलनात भाग घेतला – चंपतराव डाकोरे – NNL

नांदेड
नांदेड| मुंबईत अति पावसामुळे घराबाहेर पडु नये असे शासनाने सुटि देऊन जाहिर केले असताना शुरविर दिव्यांगानी जिवाची पर्वा न करता मंत्रालय घेरावा आंदोलनात भाग घेतला. आणि शासकीय सुविधांचा लाभ मिळत नसल्याने आपल्या पोटाची आग कशी असते ते दाखवून दिले ? आतातरी शासन जागे होईल काय? असा प्रश्न चंपतराव डाकोरे पाटिल कुंचेलीकर यांनी विचारला आहे. महाराष्ट्रातील दिनदुबळे उपेक्षित दिव्यांचा ना हक्क मिळत नसल्यामुळे शासन प्रशासनास जागे करण्यासाठी दि.१० जुलै २०२४ रोजी मंत्रालय घेराव आंदोलनात भर पावसात शासनाने अतिपावसामुळे सार्वजनिक सुट्टी जाहिर करुन जनतेनी घराबाहेर पडु नये असे आव्हान केले. असे असताना आपल्या जिवाची पर्वा न करता महाष्ट्रातुन दिव्यांचा बांधव मंत्रालयावर धडकताच पोलिस बळाचा वापर करुन दिव्यांगाना अटक करून आझाद मैदानावर नजर कैदेत ठेवले. तर अनेक ठिकाणी दिव्यांगाना अटक केली तरी अनेक दिव्यांग मंत्रालय ...
Wild animal attack | आखड्यावर बांधून असलेल्या बैलावर वन्य प्राण्यांचा हल्ला बैल ठार..NNL

Wild animal attack | आखड्यावर बांधून असलेल्या बैलावर वन्य प्राण्यांचा हल्ला बैल ठार..NNL

नांदेड
किनवट, परमेश्वर पेशवे। शेतात बांधलेल्या बैलावर वन्य प्राण्यांनी हल्ला करून बैल ठार केल्याची घटना गुरुवारी 11 जुलै 2024 रोजी उघडकीस आल्याने रिठा येथील शेतकरी सुरेश गणपत कांबळे यांनी इस्लापूर येथील वन परिक्षेत्र कार्यालयाकडे वन्य प्राण्याच्या हल्ल्यात बैल ठार झाल्याची तक्रार 12 जुलै 2024 रोजी केली आहे. किनवट तालुक्यातील रिठा येथील शेतकरी सुरेश गणपत कांबळे वय 50 वर्षे धंदा शेती हा शेतकरी 9 जुलै 2024 रोजी मंगळवारी जंगलालगत असलेल्या शेतीमध्ये बैल चारून शेतात बैल बांधून घराकडे जेवण करण्यासाठी गेला होता आणि पुन्हा चार वाजल्याच्या सुमारास बैल चारण्यासाठी शेताकडे आला असता दोन्हीही बैल बांधलेल्या ठिकाणी आढळून आले नसल्याने त्यांनी दोन्ही बैलांचा शोध घेतला मात्र दोन्ही बैल आढळले नाही आणि सायंकाळची वेळ झाल्याने तो पुन्हा घराकडे परत आला त्यावेळेस त्यातील एक बैल घरी आल्याचे दिसले. सदरील गायब झालेल्...
Greenworm infestation | कापूस सोयाबीनच्या कोवळ्या पिकावर हिरव्या अळीचा प्रादुर्भाव शेतकरी हैराण -NNL

Greenworm infestation | कापूस सोयाबीनच्या कोवळ्या पिकावर हिरव्या अळीचा प्रादुर्भाव शेतकरी हैराण -NNL

नांदेड
किनवट,परमेश्वर पेशवे। कापूस सोयाबीनच्या कोवळ्या पिकावर हिरव्या आळीचा प्रादुर्भाव झाल्याने सोयाबीनची कोवळी पिके फस्त केली जात असल्याने किनवट तालुक्यातील इस्लापूर कोसमेट वाळकी कोल्हारी शिवनी जलधरा बोधडी भागातील शेतकरी हैराण असल्याचे पहावयास मिळत आहेत. मृर्ग नक्षत्रापासून सर्वसाधारण पावसाला सुरुवात झाली असताना या वर्षी मात्र कमी प्रमाणात पाऊस पडत आहे. या अनुषंगाने शेतकरी पहिलाच हैराण असताना मात्र नांदेड किनवट तालुक्यातील इस्लापूर कोसमेट शिवणी जलधारा बोधडी या भागातील कापुस,सोयाबीन या कोवळ्या पिकावर तूडतूडा व हिरव्या आळीचा प्रादुर्भाव झाल्याने सोयाबीनची कवळी पिके फस्त केली जात आहेत. सोयाबीन व कापसावर झालेला अळ्यांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शेतकऱ्यांकडून विविध औषधांच्या फवारण्या करून या अळ्यांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शेतकऱ्याचे शर्यतीचे प्रयत्न चालू आहेत. यावर्षी पाऊस कमी प्रमाणात पड...
Train collision | रेल्वेच्या धडकेत एका वन्य प्राणी रोहीचा मृत्यू – NNL

Train collision | रेल्वेच्या धडकेत एका वन्य प्राणी रोहीचा मृत्यू – NNL

नांदेड
किनवट, परमेश्वर पेशवे| रेल्वेच्या धडकेत एका वन्य प्राणी रोहीचा मृत्यू झाल्याची घटना दिनांक 12 जुलै रोजी सकाळी अकरा वाजल्याच्या सुमारास उघडकीस आली आहे सदरील ही घटना 11 जुलै च्या रात्री सहस्त्रकुंड रेल्वे स्टेशनच्या हद्दीतील हरण खरब येथील रेल्वे ट्रॅकवर घडली असावी असा अंदाज वर्तवला जात आहे. या घटनेची माहिती रेल्वे ट्रॅकला लागून असलेल्या शेतीतील एका शेतकऱ्याने दिली आहे. या घटनेची माहिती इस्लापूर येथील प्रादेशिक वन विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी सचिन धनगे यांना मिळताच सचिन धनगे यांनी या घटनेची माहिती वरिष्ठाला कळवली आणि येथील संबंधित कर्मचाऱ्याला ही माहिती दिल्याने वन कर्मचाऱ्यांनी जाय मोक्यावर जाऊन रेल्वेच्या धडकेत वन्यप्राणी रोहीचे झालेले दोन तुकड्यांचे पंचनामे करून मृत्त झालेल्या रोहीचे दोन्ही अवयव ताब्यात घेतले. मृत्त रोजची अंतिम क्रिया करण्यासाठी वनरक्षक सय्यद अकबर युसुफ यांनी वन...
error: Content is protected !!