Sunday, July 5

महाराष्ट्र

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

23 Help Centers of Municipalities to accept applications | मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील अर्ज स्विकारण्यासाठी मनपाचे 23 मदत केंद्र -NNL

23 Help Centers of Municipalities to accept applications | मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील अर्ज स्विकारण्यासाठी मनपाचे 23 मदत केंद्र -NNL

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड| मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत वार्ड समिती केंद्रामार्फत पात्र लाभार्थी महिलाचे अर्ज संकलित करण्याचे कामकाज नांदेड महानगरपालिकेच्या 23 मदत केंद्रामार्फत सुरु आहे. तसेच अंगणवाडी सेविकाही घरोघरी जावून पात्र महिलांचे अर्ज भरुन घेण्याचे काम प्राधान्याने करीत आहेत. आतापर्यत मनपाच्या मदत केंद्रावर ऑफलाईन 5 हजार व ऑनलाईन 1 हजार 500 असे एकूण 6 हजार 500 अर्ज प्राप्त झाले आहेत. तसेच अंगणवाडी सेविकांनी घरोघरी भेट देवून 5 हजारावर अर्ज संकलित केले आहेत. आजपर्यत असे जवळपास 12 हजारावर अर्ज प्राप्त झाले आहेत. तरी जास्तीत जास्त पात्र महिलांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत आपले अर्ज भरावेत, असे आवाहन मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांनी केले आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील अर्ज स्विकारण्यासाठी शहरी भागात वार्डनिहाय समित्या गठीत केल्या आहेत. तसेच मनपाच्यावतीने 23 मदत केंद...
Chief Minister Tirtha Darshan Yojana | “मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना” साठी समाज कल्याण विभागाकडे अर्ज दाखल करा -NNL

Chief Minister Tirtha Darshan Yojana | “मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना” साठी समाज कल्याण विभागाकडे अर्ज दाखल करा -NNL

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड| राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना देशातील मोठ्या तीर्थस्थळांना भेटी देणे सुकर व्हावे यासाठी राज्यातील सर्व धर्मातील ज्येष्ठ नागरिकांना जे 60 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे आहेत त्यांना राज्य आणि भारतातील तीर्थ क्षेत्रांना मोफत दर्शनाची संधी देण्यासाठी "मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना" सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचा 18 जुलै 2024 रोजीच्या शासन निर्णयान्वये सुरू करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांनी 25 जुलै ते 31 ऑगस्ट 2024 या कालावधीत सहाय्यक आयुक्त समाज कल्याण नांदेड येथे अर्ज सादर करावेत, असे आवाहन समाज कल्याणचे सहायक आयुक्त शिवानंद मिनगिरे यांनी केले आहे. या योजनेमध्ये महाराष्ट्र राज्य व भारत देशातील प्रमुख तीर्थ स्थळांचा समावेश राहील. यात निर्धारित तीर्थस्थळांपैकी एकाच स्थळाच्या यात्रेकरिता पात्र व्यक्तीला या योजनेचा एक वेळ लाभ घेता येईल. प्रवास खर्चाची कमाल...
हिमायतनगर, पळसपूर, सिरपल्ली अंतर्गत रस्त्याचे काम रखडल्याने प्रवाश्यांची हेळसांड – रस्त्याचे काम वेगाने पुर्ण करा -NNL

हिमायतनगर, पळसपूर, सिरपल्ली अंतर्गत रस्त्याचे काम रखडल्याने प्रवाश्यांची हेळसांड – रस्त्याचे काम वेगाने पुर्ण करा -NNL

नांदेड, महाराष्ट्र
हिमायतनगर,दत्ता शिराणे। हिमायतनगर ते पळसपूर, डोल्हारी सिरपल्ली या अंतर्गत रस्त्याचे काम गेल्या तिन वर्षांपासून अतिशय कासव गतीने करण्यात येत आहे. छत्रपती संभाजीनगर येथील एका ठेकेदाराकडून हे काम म्हणायला सुरू आहे. परंतू कामाला कुठलीच गती नसल्याने काम थांबूनच आहे. रस्ता फक्त खोदकाम करून ठेवला असल्यानै प्रवाश्यांची मोठ्याप्रमाणात हेळसांड होत आहे. या अंतर्गत रस्त्याचे काम दर्जात्मक पद्धतीने वेगाने पुर्ण करूण प्रवाश्यांना दिलासा द्यावा. अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे तालुकाध्यक्ष सुनील पतंगे यांनी केली आहे. मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचे कार्यकारी अभियंता यांना दिलेल्या निवेदनात पतंगे यांनी म्हटले आहे की, हिमायतनगर, पळसपूर, डोल्हारी, सिरपल्ली या अंतर्गत रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झाली आहे. मुख्य मंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत या कामाला जवळपास तिन वर्षापुर्वी मंजूरी मिळाली. ...
Suresh Patil Solanke | कुणबी मराठा महासंघाच्या नांदेड जिल्हा कार्याध्यक्षपदी सुरेश पाटील सोळंके यांची निवड -NNL

Suresh Patil Solanke | कुणबी मराठा महासंघाच्या नांदेड जिल्हा कार्याध्यक्षपदी सुरेश पाटील सोळंके यांची निवड -NNL

नांदेड, महाराष्ट्र
किनवट,परमेश्वर पेशवे। महाराष्ट्र राज्य कुणबी मराठा महासंघाच्या नांदेड उत्तरच्या जिल्हा कार्याध्यक्षपदी सुरेशराव सोळंके पाटील रा. किनवट यांची प्रदेश अध्यक्ष गिरीश जाधव यांनी निवड करून त्यांच्या हस्ते नियुक्ती पत्र दिले आहे. निवड झाल्या बद्दल त्यांचेवर समाज बांधवातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. छत्रपती शिवाजी हायस्कूल बेल्लोरी धानोराचे संस्थापक सुरेशराव सोळंके पाटील यांचे संस्थेच्या माध्यमाध्यमातून समाज कार्याचे काम चालुच आहे. त्या सोबतच कुणबी मराठा समाजातील जनतेसाठी ही त्यांचे कार्य नेहमीच चालु असते. या सर्व कार्याची दखल घेवून महाराष्ट्र राज्य कुणबी मराठा महासंघाच्या नांदेड उत्तरच्या जिल्हा कार्याध्यक्षपदी सुरेशराव सोळंके पाटील यांची निवड प्रदेश अध्यक्ष गिरीश जाधव यांनी करून त्यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले. यावेळी राज्य सचिव व्यंकटराव जाधव, राज्य कार्याध्यक्ष डॉ. राजेंद्र वा...
माजलगाव उपविभागीय दक्षता कमिटी जाहीर; ॲड दशरथ मकसरे,श्री.राजेश घोडे,संपादक अनिल वाघमारे यांच्या निवडी जाहीर -NNL

माजलगाव उपविभागीय दक्षता कमिटी जाहीर; ॲड दशरथ मकसरे,श्री.राजेश घोडे,संपादक अनिल वाघमारे यांच्या निवडी जाहीर -NNL

महाराष्ट्र
बीड। माजलगाव उपविभागातील महत्त्वाची असणारी दक्षता कमिटी नुकतीच जाहीर करण्यात आली असून या कमेटी वर ॲड दशरथ मकसरे, श्री.राजेश घोडे, डोंगरचा राजा चे संपादक अनिल यांच्या निवडी जाहीर करण्यात आल्या. याबाबत अधिक वृत्त असे की, बीड जिल्ह्यातील माजलगाव उपविभागाची महत्त्वाची असणारी दक्षता कमिटी नुकतीच जाहीर करण्यात आली. जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार उपविभागीय अधिकारी माजलगाव यांच्या मान्यतेने ही समिती गठीत करण्यात आली असून या समितीमध्ये समाज कल्याण सह आयुक्त छत्रपती संभाजीनगर, उपविभागीय पोलिस अधिकारी माजलगाव, तहसीलदार माजलगाव, तहसीलदार वडवणी, तहसीलदार धारूर, समाजकल्याण अधिकारी बीड, पोलिस निरीक्षक माजलगाव शहर, पोलिस अधीक्षक माजलगाव ग्रामीण, पोलिस निरीक्षक वडवणी, पोलिस निरीक्षक धारुर, पोलिस निरीक्षक दिंद्रुड, ॲड दशरथ मकसरे, श्री.राजेश घोडे, डोंगरचा राजा चे संपादक अनिल वाघमारे यांच्या निवडी...
CEO Meenal Karanwal’s visit to Umri Panchayat Samiti | सीईओ मीनल करनवाल यांची उमरी पंचायत समितीला भेट -NNL

CEO Meenal Karanwal’s visit to Umri Panchayat Samiti | सीईओ मीनल करनवाल यांची उमरी पंचायत समितीला भेट -NNL

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड| नांदेड जिल्हा परिषदेच्या प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी आज मंगळवार दिनांक २३ जुलै रोजी उमरी पंचायत समिती येथे भेट देऊन विविध कामांचा आढावा घेतला. त्यांनी पंचायत समितीच्या कामकाजातील अडचणी, सद्यस्थिती आणि आगामी योजनांबद्दल चर्चा केली. यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांच्या हस्ते पंचायत समिती परिसरात वृक्ष लागवड करण्यात आली. दौऱ्या दरम्यान, मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी दुर्गानगर गावास भेट दिली. यावेळी त्यांनी जल जीवन मिशन योजनेची कामे, घरकुल बांधकाम, दलित वस्ती योजनेतील रस्त्याची पाहणी केली. तसेच अंगणवाडीस भेट देवून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत भरण्यात येणाऱ्या अर्जांची पाहणी करुन येथील महिलांशी संवाद साधला. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप केले, ज्य...
Blacklist the name of the contractor | हिमायतनगर ते पळसपूर, डोल्हारी, सिरपल्ली अंतर्गत रस्त्यांच्या कामांत दिरंगाई करणाऱ्या ठेकेदारांचे नांव काळ्या यादीत टाका – NNL

Blacklist the name of the contractor | हिमायतनगर ते पळसपूर, डोल्हारी, सिरपल्ली अंतर्गत रस्त्यांच्या कामांत दिरंगाई करणाऱ्या ठेकेदारांचे नांव काळ्या यादीत टाका – NNL

नांदेड, महाराष्ट्र
हिमायतनगर| हिमायतनगर ते पळसपूर, डोल्लारी, या अंतर्गत रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झाली असून, प्रवाश्यांना या अंतर्गत रस्त्यावरून जिव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. आणी म्हणून संबंधित गुतेदार (सिद्दीकी, छत्रपतीसंभाजीनगर) यांना काळ्या यादीत टाकण्यात यावे. अशी मागणी भ्रष्टाचार विरोधी जन आक्रोश महाराष्ट्र राज्यांच्या मराठवाडा कार्याध्यक्षा सौ.सिमा स्वामी लोहराळकर यांनी केली आहे. याबाबत त्यांनी जिल्हाधिकारी व कार्यकारी अभियंता मुख्यमंत्री ग्राम सडक योजना कार्यालय नांदेड यांना दिलेल्या निवेदनात सिमा स्वामी बोराळकर यांनी म्हटले आहे की, हिमायतनगर ते पळसपूर, डोल्हारी, सिरपल्ली या अंतर्गत रस्त्यांच्या कामांसाठी मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत कोट्‌यावधी रूपयांचा विकास निधी मंजूर झाला. परंतु जवळपास तिन वर्षांचा कार्यकाळ संपला असून, या रस्त्याचे काम अतिशय संथ गतीने सुरु आहे. या अंतर्गत या रस्त...
Free the locked statue of Chhatrapati Shivaji and erect it with dignity | छत्रपती शिवरायांचा बंदिस्त पुतळा मुक्त करून सन्मानाने उभारा; उमरखेड कडकडीत बंद – NNL

Free the locked statue of Chhatrapati Shivaji and erect it with dignity | छत्रपती शिवरायांचा बंदिस्त पुतळा मुक्त करून सन्मानाने उभारा; उमरखेड कडकडीत बंद – NNL

उमरखेड, महाराष्ट्र, हिंगोली
उमरखेड, अरविंद ओझलवार| छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा मागील तीन वर्षापासून नगरपरिषद च्या प्रांगणातील शेडमध्ये बंदिस्त करून ठेवला आहे . सदर पुतळ्यासंदर्भात मागील तीन वर्षात अनेक उपोषण व आंदोलन झाले परंतु प्रशासनाने कोणतीही कारवाई न केल्यामुळे आज 22 जुलै रोजी जन आंदोलन करण्याचा इशारा शिवप्रेमींनी दिला होता. त्यानुसार आज सकाळी 11 वाजता शिवप्रेमींनी नगरपरिषद मध्ये जाण्याचा प्रयत्न केला परंतु नगर परिषदेचे मुख्य द्वारावर पोलिसांचा तगडा बंदोबस्त असल्याने गेट जवळ थांबून ठिय्या आंदोलन सुरू केले. दरम्यान न . प. मुख्याधिकारी यांनी शिवप्रेमींना दोन महिन्याचा कालावधीचे पत्र दिले असताना ते नकारात त्वरित कार्यवाही करण्याची मागणी करत पत्र फाडून टाकण्यात आले यावेळी आक्रमक झालेल्या शिवप्रेमींना पोलिसांनी अडवल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते .दरम्यान आज शिवप्रेमींनी दिलेल्या शहरा...
Himayatnagar railway gate road potholes suffer motorists | हिमायतनगर रेल्वे फाटक रस्त्याच्या खड्डयांमुळे वाहनधारक त्रस्त; अपघाताची शक्यता वाढली  – NNL

Himayatnagar railway gate road potholes suffer motorists | हिमायतनगर रेल्वे फाटक रस्त्याच्या खड्डयांमुळे वाहनधारक त्रस्त; अपघाताची शक्यता वाढली – NNL

नांदेड, महाराष्ट्र, व्हिडीओ
हिमायतनगर,अनिल मादसवार| किनवट - भोकर या राष्ट्रीय महामार्गावरील असलेल्या हिमायतनगर शहराजवळील रेल्वे फाटक रस्त्यावर खड्डेच खड्डे निर्माण झाले आहेत. येथून जाताना रस्त्यात खड्डा आहे कि... खड्ड्यात रस्ता हे कळणे अवघड बनले आहे. यामुळे अपघाताला निमंत्रण मिळत आहे. संबंधित विभागाने या जीवघेण्या रस्त्याकडे लक्ष देऊन किमान पावसाळ्यात त्रास होऊ नये यासाठी तात्काळ खड्डे बुजवून संभाव्य धोका टाळावा अशी मागणी केली जाते आहे. नांदेड जिल्ह्यातील धनोडा ते भोकर या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६१ ची निर्मिती करताना हिमायतनगर जवळील रेल्वे फाटकावरून उड्डाण पूल मंजूर करण्यात आला होता. दरम्यान ठेकेदारने हिमायतनगर ते धानोडा आणि भोकर ते रेल्वे फाटक दरम्यानच्या रस्त्याचे काम पूर्ण केले. मात्र संबंधित ठेकेदाराने हिमायतनगर शहरानजीक असलेल्या रेल्वे फाटक पासून उड्डाण पुलाचे काम जाणीवपूर्वक केले नाही. त्यामुळे रेल्व...
Chief Executive Officer Meenal Karanwal | सामुदायीक प्रयत्‍नातून यश मिळविता येते – मुख्‍य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल -NNL

Chief Executive Officer Meenal Karanwal | सामुदायीक प्रयत्‍नातून यश मिळविता येते – मुख्‍य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल -NNL

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड| गेल्या वर्षभरात जिल्हा परिषदेने वैविध्यपूर्ण कामे केली आहेत. ज्या क्षेत्रामध्ये आम्ही मागे होतो त्यामध्ये टॉप होण्यासाठी धडपड केली, नियोजन केले आणि कामांना गती दिली, हे सर्व यश माझे एकटीचे नसून तुम्हा सर्वांच्‍या सामूहिक प्रयत्नामधूनच मिळवता आले, असे प्रतिपादन नांदेड जिल्हा परिषदेच्या प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी केल नांदेड जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून मीनल करनवाल यांना एक वर्ष पूर्ण झाल्याच्या औचित्‍याने जिल्हा परिषदेच्या विविध विभागाच्यावतीने आज जिल्‍हा परिषदेच्‍या यशवंतराव चव्‍हाण सभागृहात वर्षपूर्ती कार्यक्रमाचे आयोजन करण्‍यात आले होते. त्याप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी जिल्‍हा परिषदेचे अतिरिक्‍त मुख्‍य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, जिल्‍हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्‍प संचालक डॉ. संजय तुबाकले, सामान्‍य प्रशासन विभागाचे उप मु...
error: Content is protected !!